ETV Bharat / state

Role of Transport Minister : एसटी आंदोलक कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात! - Transport Minister Anil Parab

एसटी कर्मचाऱ्यांनी (ST staff) तीन दिवसापूर्वी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक येथील निवासस्थानाबाहेर आंदोलन तसेच दगड आणि चप्पलफेक करत गोंधळ घातला. ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्या कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका (Role of Transport Minister) परिवहन मंत्री अनिल परब (Transport Minister Anil Parab) यांनी मांडली आहे

Minister Anil Parab
मंत्री अनिल परब
author img

By

Published : Apr 11, 2022, 9:47 AM IST

मुंबई: शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Add. Gunaratna Sadavarte) यांना अटक केली. तर १०९ कर्मचाऱ्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. हे आंदोलन आता संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भोवण्याची चिन्हे आहेत. या कर्मचाऱ्यांवर महामंडळाकडून कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता आहे. आंदोलनात ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे त्या कर्मचाऱ्यांना सेवेत पुन्हा घेता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका परिवहन मंत्री अनिल परब यांनी मांडली आहे.

फौजदारी गुन्हे असणाऱ्यांचे परतीचे दोर कापले! - परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. अनिल परब म्हणाले, येत्या २२ तारखेंपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कोर्टाचे आहेत. २२ तारखेपर्यंत जे कामगार रुजू होतील, त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जाणार नाही. पण या आंदोलनात ज्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांना सेवेत घेता येणे शक्य नाही. त्यामुळे एस टी कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हे असणाऱ्यांचे परतीचे दोर त्यांनी कापले आहेत.

एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का? - परब म्हणाले, '२२ तारखेपर्यंत कामगार कामावर आले नाही तर एसटीमध्ये कंत्राटी खासगीकरण ही करता येईल का? याचा विचार ही केला जाणार आहे. पाच महिने बंद असलेल्या बस पूर्ववत करण्यासाठी बस आगाराने सर्व एसटी गाड्याची तपासणी केली आहे. एसटी महामंडळ बस सेवा सुरू करण्यासाठी पूर्ण पणे सज्ज आहे.

सदावर्ते यांची सात तास चौकशी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील आंदोलनासाठी एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांची काल पोलिसांनी तब्बल सात तास कसून चौकशी केली. सदावर्ते यांना आज सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याची पोलिस कोठडी वाढवून मिळावी यासाठी पोलिसांकडून पुराव्याची जुळवाजुळव केली जात आहे. त्याचबरोबर न्यायालयीन कोठडीतील आंदोलकांपैकी प्रत्यक्ष कटामध्ये सहभागी असलेल्यांची माहिती घेण्यात येत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले आहे.

पवार कुटुंबीयांची सुरक्षा वाढवली - शरद पवार यांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओक वरील हल्ल्यानंतर राज्याच्या गृहविभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आली आल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासुद्धा सुरक्षा व्यवस्थेतही वाढ करण्यात आली आहे. सुप्रिया सुळे यांच्यासोबत आता पोलिसांचे एक वाहन आणि दोन अधिकारी तैनात असणार आहेत.

हेही वाचा - Silver Oak Attack Case : शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गुप्तचर विभागाने तीन महिने आधीच दिला होता इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.