ETV Bharat / state

बांधकाम प्रकल्पासाठी म्हाडा-एसआरएकडून 60 दिवसांत परवानगी; जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन

नव्या प्रकल्पासाठी म्हाडा-एसआरएकडे परवानगी मागितल्यानंतर परवानगी देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे आव्हाड यांनी जाहीर केले आहे.

Awhad said  building permission given in sixty days
60 दिवसांत बांधकाम परवानगी देणार- जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jun 5, 2020, 4:07 PM IST

मुंबई- शहरातील बांधकाम प्रकल्पांना म्हाडा आणि एसआरए या नियोजन प्राधिकरणाकडून ज्या काही बांधकाम परवानग्या लागतात त्या 60 दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे. एका वेबिनारमध्ये त्यांनी हे आश्वासन दिले असून ही बिल्डरांसाठी पर्यायाने रहिवाशी-ग्राहकांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.

नव्या प्रकल्पासाठी म्हाडा-एसआरएकडे परवानगी मागितल्यानंतर परवानगीसाठी मोठा कालावधी लागल्यास लॉकडाऊनमुळे संकटात आलेल्या बिल्डरांना आणि ग्राहक-रहिवाशांना फटका बसू नये म्हणून परवानगी देण्यासाठी कालबध्द कार्यक्रम हाती घेतला जाईल, असे आव्हाड यांनी जाहीर केले आहे.

म्हाडा आणि एसआरएला काही वर्षापूर्वीच नियोजन प्राधिकरणाचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार आता म्हाडा ले आऊटमधील पुनर्विकास प्रकल्पासाठी वा म्हाडाच्या जागेवरील नव्या प्रकल्पासाठी बिल्डरांना म्हाडाकडून बांधकामासाठीच्या विविध परवानग्या घ्याव्या लागतात. एसआरएच्या अखत्यारीतील प्रकल्पासाठीही परवानगी आवश्यक असते. बांधकामासंबंधी कोणत्याही परवानगी मिळवण्यासाठी मोठा कालावधी लागतो हे सर्वज्ञात आहे. अगदी 6 महिने ते 1 वर्षाचाही कालावधी कधी कधी लागतो. परिणामी प्रकल्प रखडतात. वेळेत प्रकल्प पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे खर्च ही वाढतो. अशातच आता गेल्या तीन महिन्यापासून बांधकाम व्यवसाय ठप्प असून मोठ्या आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.

बिल्डरांकडून परवानगीसाठी फाइल गेल्यानंतर 60 दिवसाच्या आत परवानगी दिली जाईल, असे आव्हाड यांनी जाहीर केले आहे.हे अंमलात आले तर नक्कीच बिल्डर, ग्राहक आणि रहिवाशांसाठी आनंदाची बाब ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.