मुंबई - ठाणे येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात माजी मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी आपल्या दंडाला धरून आपल्याला बाजूला खेचले. तुझे काय काम आहे तू इथून निघून जा असे ते म्हणाले. त्यांची ही कृती कुणाला सहज वाटत असली तरी तो विनयभंगच ( Jitendra Awhad accused of molestation ) आहे. कारण ही कृती माझ्यासोबत घडली आहे, त्यामुळे याबाबत मीच ठामपणे सांगू शकते हा विनयभंग आहे. हाच माझा आरोप ( Jitendra Awhad Molestation Case ) आहे. म्हणूनच तक्रार दाखल केली आहे अशी माहिती तक्रारदारांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली.
महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देणार - यासंदर्भात राज्य महिला आयोगाने आपल्याला आपण जाणून बुजून आरोप करीत असल्याबाबत नोटीस बजावली आहे का असे विचारताच, माझ्यासोबत काय घडले हे मला माहित आहे. त्यामुळे महिला आयोगाला मी त्या पद्धतीने उत्तर देईल असे, तक्रारदार म्हणाल्या. जितेंद्र आव्हाड यांचे आजवरचे वागणे पाहता यात काही विशेष नाही असेही त्या पुढे म्हणाल्या.
कारवाईवर प्रश्नचिन्ह - राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तिने पतीवर केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत, तर जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तक्रारदार महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ती जामिनावर असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आव्हाडांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या महिलेचा विशिष्ट हेतू असल्याचे ते म्हणाले.
विनयभंगाचा गुन्हा दाखल - मुंब्रा येथील कळवा, ठाणे शहरांना जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय पक्षांचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या घटनेदरम्यान जितेंद्र आव्हाड याने आपला विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.
याला छेडछाड म्हणता येणार नाही - जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे तिचा एक हेतू असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. अंगावर वार करणाऱ्याला बाजूला ढकलणे गुन्हा असेल तर बाजारात, रेल्वेत, रेल्वे पुलावर, गर्दीत शेकडो 'विनयभंग' घडतात, असेही त्या म्हणाले. या महिलेची राजकीय महत्त्वाकांक्षा असून ती काल रात्री कोणालातरी भेटल्याचा आरोप ऋता आव्हाड यांनी केला. त्यांच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. जे काही घडले ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. याला छेडछाड म्हणता येणार नाही असेही ते म्हणाले.