ETV Bharat / state

महागाईबद्दल महिलांच्या वेदना निर्मला सीतारामन यांनी समजून घेतल्या नाहीत - जयंत पाटील - प्रतिक्रिया

देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी शुक्रवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जयंत पाटील
author img

By

Published : Jul 5, 2019, 8:01 PM IST

मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी शुक्रवारी जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.


देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही अशी जोरदार टिका जयंतराव पाटील यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील


शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे. किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसणार आहे असे जयंतराव पाटील म्हणाले.


अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात. मात्र, निर्मला सीतारामन यांना हे माहितीच नाही असे दिसते, अशी टीकाही जयंतराव पाटील यांनी केली. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने अर्थसंकल्पामध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.

Intro:मुंबई -
अर्थमंत्री निर्मला सीतारामन या महागाईबद्दल महिलांच्या वेदना समजून घेऊन महागाई कमी करण्यासाठी काहीतरी करतील असे अपेक्षित होते. मात्र महागाई कमी करण्यासाठी या अर्थसंकल्पात काहीही नाही. युवा वर्गालाही नाराज करणारा हा अर्थसंकल्प आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी आज जाहीर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.Body:देशाचा आज जाहीर झालेला अर्थसंकल्प गोंधळलेला अर्थसंकल्प वाटतो. नक्की कोणत्या क्षेत्राला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे याची स्पष्टता या अर्थसंकल्पात नाही अशी जोरदार टिका जयंतराव पाटील यांनी केली. शेतीशी संबंधित योजनांना भरीव निधी देणे या अर्थसंकल्पातून अपेक्षित होते. देशात प्रचंड मोठ्या प्रमाणावर कंपन्या बंद पडत आहेत, त्यावरही कोणताच उपाय या अर्थसंकल्पात केलेला नाही. कालच्या आर्थिक पाहणीत देखील गोलमाल वाटत आहे. किमान अर्थसंकल्पात तरी देशाच्या विकासाच्या इंजिनाला भरीव गती देणारे निर्णय घेतले जातील असे अपेक्षित होते, मात्र तसे काहीही झालेले नाही. उलट या अर्थसंकल्पाने नैसर्गिक विकास प्रक्रियेला खीळ बसणार आहे असेही जयंतराव पाटील म्हणाले.

अर्थमंत्र्यांनी लोकानूनयी निर्णय घ्यायचे नसतात, उलट देशाची अर्थव्यवस्था सुदृढ राहण्यासाठी आवश्यक त्या कठोर उपाययोजना करायच्या असतात मात्र निर्मला सीतारामन यांना हे माहितीच नाही असे दिसते अशी टीकाही जयंतराव पाटील यांनी केली. काळा पैसा भारतात परत आणण्याची वल्गना करणाऱ्या या सरकारने अर्थ संकल्पामध्ये या विषयाचा नामोल्लेख सुद्धा केलेला नाही असेही जयंतराव पाटील म्हणाले.Conclusion:

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.