ETV Bharat / state

गुन्ह्यांची माहिती घेऊन निर्णय घेऊ; कोरेगाव-भीमा प्रकरणी जयंत पाटलांचे स्पष्टीकरण - FARMER LOAN WAVER

मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल असे ते म्हणाले. गैरसमज न पसरवण्याचे आवाहन त्यांनी केले.

MUMBAI
जयंत पाटील
author img

By

Published : Dec 4, 2019, 3:57 PM IST

मुंबई - कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कोरेगाव-भीमा, शेतकरी कर्जमाफी, बुलेट ट्रेन आदी मुद्यांवर त्यांनी स्पष्टीकरण दिले. कोरेगाव-भीमा दंगलीतील आरोपींवर असलेले गुन्हे मागे घेण्याविषयी स्पष्ट भूमिका घेण्याचे त्यांनी टाळले.

गुन्ह्यांची माहिती घेऊन निर्णय घेऊ

आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही
कोणते गुन्हे गंभीर आहेत, कोणत्या गुन्ह्यांमध्ये जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टींचा विचार करून निर्णय घेतले जाईल, असे विधान जयंत पाटलांनी कोरेगाव-भीमा प्रकरणी केले. कोरेगाव-भीमा परिषदेनंतर पेटलेल्या दंगलीत अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरे आंदोलकांचे गुन्हा मागे घेतल्यानंतर हेही गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी होत आहे.
संभाजी भिडे हे कोरेगाव-भीमा दंगलीचे प्रमुख आरोपी आहेत. पण, त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. यासंबंधी जयंत पाटलांना विचारण्यात आले असता त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी कुणाला पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जे गुन्हेगार आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल असे ते म्हणाले. गैरसमज न पसरवण्याचे आवाहन त्यांनी केले.

साखर कारख्यान्यांच्या मदतीबाबत
साखर कारखान्यांना देण्यात येणाऱ्या मदतीविषयी पाटील म्हणाले, की आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू. आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही. ज्याला आवश्यक असेल त्याला रिव्ह्यू करून मदत दिली जाईल. शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य आहे.

बुलेट ट्रेनविषयी
सरकारने कोणताही प्रकल्प स्क्रॉप केला नाही. आमचं सरकार कोणत्याही प्रकल्पाला अडचणीत आणणार नाही. आम्हाला महाराष्ट्राची काळजी, महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी आहे. जे प्रकल्प सुरू आहेत ते प्रकल्प बंद करणार नाही. पण, काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि निर्णय घेतले जाईल असे जयंत पाटील म्हणाले.

शेतकरी कर्जमाफीविषयी
आम्ही सगळी माहिती घेत आहोत. आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही, अशी आमची वृत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ

फडणवीसांवरील ४० हजार कोटींच्या आरोपाबाबत
४० हजार कोटींचा निधी केंद्राला पाठवण्यासाठीच फडणवीस ८० तासांचे मुख्यमंत्री झाले, असे विधान भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले होते. त्यावरही जयंत पाटलांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, की महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याबाबत माहिती घेऊ. खासदारांनी वक्तव्य केल्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला. पण, योग्य चौकशी करु.

Intro:Body:mh_ncp_jayant_patil_mumbai_7204684
jayantpatil byte by live 3G 7

जयंत पाटील

ऑन भिमा कोरेगाव

आमचं सरकार कुणावरही अन्याय करणार नाही
कोणते गुन्हे गंभीर आहे, कोणत्या गुन्ह्यांमध्ये जाणिवपूर्वक कार्यकर्त्यांना गुंतवले गेले याची माहिती घेतली जाईल. सगळ्याच गोष्टीचा विचार करून निर्णय घेतले जाईल

ऑन सनातन, संभाजी भिडे

मी अजून खातेवाटपाबाबत निर्णय झाला नाही त्यामुळे मी कुणाला पाठिशी घालतोय असा प्रश्नच उद्भवत नाही, गुन्हे आहेत त्यांना सरकार धडा शिकवेल. गैरसमज पसरवू नये नाही, सर्व अधिकार मा. मुख्यमंत्र्यांचे आहे.

ऑन भाजप साखर कारखाने

आमचं सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे त्यामुळे मदत देण्यासाठी समान धोरण राबवू, आम्ही पक्ष बघून निर्णय घेणार नाही ज्याला आवश्यक असेल त्याला रिव्ह्यू करून मदत दिली जाईल.शेतकऱ्यांना मदत करणे आमचे प्राधान्य.

ऑन बुलेट ट्रेन

सरकारने कोणताही प्रकल्प स्क्रॉप केला नाही, आमचं सरकार कोणत्याही प्रकल्पाला अडचणीत आणणार नाही, आम्हाला महाराष्ट्राची काळजी, महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीची काळजी. जे प्रकल्प सुरू आहे ते प्रकल्प बंद करणार नाही फण काही प्रकल्पांची माहिती घेतली जाईल आणि निर्णय घेतले जाईल

ऑन शेतकरी कर्जमाफी

आम्ही सगळी माहिती घेत आहोत आम्हाला शेतकऱ्यांना ठोस मदत करायची आहे. घोषणा करायची आणि काम करायचे नाही अशी आमची व्रुत्ती नाही. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ

ऑन ४० हजार कोटी

महाराष्ट्राची तिजोरी कुणी कशी खाली केली याबाबत माहिती घेऊ. खासदारांनी वक्तव्य केल्यामुळे लोकांनी विश्वास ठेवला.

ऑन चिदंबरम

समाधान त्यांना जामीन मिळाला, किरकोळ केसमध्ये गुंतवण्यात आलं होतं.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.