मुंबई - राज्यातील आर्थिक दुर्बल घटकांना शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला असा मोठा गाजावाजा केला होता. मग तो इतका अभ्यास करुनही न्यायालयासमोर त्यांचे सरकार फेल कसे झाले, असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाबरोबरच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने फडणवीस सरकारला आज चांगलेच फटकारले असल्याने त्यावर पाटील यांनी टीका केली. आधी मराठा व आता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या वैद्यकीय शिक्षणातील आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे हे स्पष्ट झाल्याचे पाटील म्हणाले.