ETV Bharat / state

चांगले काम केले तर आमच्या पक्षातील नेत्यांची गरज का पडू लागली? जयंत पाटलांचा सवाल

गेल्या ५ वर्षात भाजप-शिवसेनेने चांगले काम केले असेल तर त्यांना आमच्या पक्षातील नेत्यांची गरज का पडू लागली? असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

जयंत पाटील
author img

By

Published : Aug 30, 2019, 9:59 PM IST

मुंबई - गेल्या ५ वर्षात भाजप-शिवसेनेने चांगले काम केले असेल तर त्यांना आमच्या पक्षातील नेत्यांची गरज का पडू लागली? असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेकजण पक्षांतर करत भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी भाजप-शिवसेनेला लक्ष्य केले.

भाजप अन्य पक्षातील नेत्यांना ईडीकडून चौकश्या करु अशा धमक्या देत असल्याचा आरोप पाटील यांनी केला. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांच्या चौकशा आरोप थांबले आहेत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याचे पाटील म्हणाले.

मुख्यमंत्री लोकांची दिशाभूल करतात
समस्यांनी गांजलेले, तुमच्या अनागोंदी कारभाराने त्रस्त, नापिकी आणि कर्जबाजारीपणाने हताश असलेले शेतकरी तुम्हाला प्रश्न विचारत आहेत. तुम्ही राष्ट्रवादीचे पेरलेले कार्यकर्ते म्हणून त्यांना संबोधता आणि लोकांची दिशाभूल करत विषयाला बगल देण्याचा प्रयत्न करता, असे म्हणत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.