ETV Bharat / state

Jayant Patil ED Inquiry : जयंत पाटलांची ईडीकडून चौकशी; म्हणाले, काही गोष्टी सोसाव्या लागणारच - महाराष्ट्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. ईडीचे अधिकारी जयंत पाटील यांची चौकशी करत आहेत. ईडीने जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. मुंबईसह राज्यातील विविध भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे.

Jayant Patil
जयंत पाटील
author img

By

Published : May 22, 2023, 12:52 PM IST

Updated : May 22, 2023, 4:49 PM IST

मेहबुब शेख, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. कार्यालयात दाखल झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. सांगली-मिरजमध्ये राष्ट्रावादीचे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले आहे. ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागत असल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पक्षाचे कार्यकर्ते इस्लामपूर, सांगली येथे ईडी आणि भाजपाविरोधात तीव्र आंदोलन करणार आहेत. ईडीने जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते हे संतप्त झाले आहेत. ईडी आणि कार्यालयाबाहेर आणि पाटील यांच्या घराबाहेर समर्थकांनी गर्दी केली आहे. दरम्यान चौकशीला जाण्याआधीच जयंत पाटील यांनी ट्विट केले.या ट्विटमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना मुंबईला न येण्याचे आवाहन केले.

माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे की, कोणीही मुंबईला येऊ नये. मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे - जयंत पाटील

कार्यकर्ते मुंबईत दाखल, ईडीविरोधात घोषणाबाजी : जयंत पाटील यांच्या या आवाहनानंतर समर्थकांनी मुंबईचा रस्ता धरला. जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीविरोधात आज मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. राज्यभरातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा झाले आहेत. ईडीच्या कार्यालयाबाहेरच कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधातही या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ईडी आणि भाजपाविरोधात जोरात घोषणाबाजी केली जात आहे. तर ईडीकडून सुडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. ईडी भाजपच्या घरगडी प्रमाणे काम करत असल्याचा आरोपही अनेकांनी केला.

  • माझी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विनंती आहे कि कोणीही मुंबईला येऊ नये.

    मी या चौकशीकामी ईडीला पूर्णपणे सहकार्य करणार असून आपण सर्वांनी माझ्याप्रती दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी आपला आभारी आहे. @NCPspeaks

    — Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

..काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. : दरम्यान ईडीच्या चौकशीला आपण सामोरे जाणार असून त्यांना चौकशी मदत करणार असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ईडीकडून IL&FS प्रकरणी ईडी जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. ईडीच्या कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली. आम्ही विरोधी पक्षात आहोत. त्यामुळे काही गोष्टी सोसावा्या लागणारच, अशी प्रतिक्रिया जयंत पाटीलांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी दिली होती. ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन करत पाटील म्हणाले होते की, काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं.

  • #WATCH | Nationalist Congress Party (NCP) workers protest in Mumbai over ED summon to party leader Jayant Patil in connection with a case related to IL&FS (Infrastructure Leasing and Financial Services Limited) pic.twitter.com/KtO0iaWoZb

    — ANI (@ANI) May 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे प्रकरण? - मिळालेल्या माहितीनुसार,आयएल आणि एफएस या कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचे कंत्राट मिळाले होते. त्यानंतर हे कंत्राट सब कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले होते. सब कॉन्ट्रॅक्टरने कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी निगडीत कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. जयंत पाटील त्या कालावधीत राज्याचे गृहमंत्री होते. या कंपनीमुळे अनेक महत्त्वाचे म्युचअल फंड आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या असल्याचा आरोप आहे.

हेही वाचा -

  1. Satyapal Malik On Lok Sabha Elections : 2019 च्या लोकसभा निवडणुका सैनिकांच्या मुद्द्यावर लढल्याचा सत्यपाल मलिकांचा आरोप
  2. Nana Patole News: कुणीही 'भुट्टा' येईल आणि काहीही सांगून जाईल, लक्ष देऊ नका; नाना पटोलेंचा रोहित पवारांना टोला
  3. Sameer Wankhede News: अतिक अहमद सारखी घटना होण्याची समीर वानखेडेंना भीती; मुंबई पोलीस आयुक्तांकडे मागणार विशेष सुरक्षा

Last Updated : May 22, 2023, 4:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.