ETV Bharat / state

रस्ते विकासाच्या खासगीकरणात मोठा घोळ; जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा आरोप

जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा सार्वजानिक बांधकाम विभागाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

author img

By

Published : Jun 27, 2019, 9:24 PM IST

जयंत पाटिल व चंद्रकांत पाटिल

मुंबई - पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान जमिनीचा गैरव्यवहार सभागृहात पुराव्यानिशी मांडल्यानंतर रस्ते विकासाच्या खासगीकरणातून मोठा घोटाळा झाल्याचे सांगत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा सार्वजानिक बांधकाम विभागाच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे. सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना त्यांनी हा आरोप केला आहे.

बांधकाम विभागात बीओटी ( बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा) ही कल्पना आणली गेली आहे. बीओटी योजनेत सावळा गोंधळ आहे. बांधकाम खात्याची मोठी यंत्रणा असतानाही प्रायव्हेट कंपन्यांना त्यांचे काम दिले गेले आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठीही प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य दिले आहे. या कामासाठी त्यांना दीड ते दोन कोटी रुपये दिले जात आहेत. योजना सरकारी असूनही त्यात मागच्या बाजूने खासगीकरण आणले जात असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी लावला आहे. महाराष्ट्रात सुप्रिटेंडेंट इंजिनिअर, एक्सीक्यूट्यू इंजिनिअर, डेप्युटी इंजिनिअर या पदासाठी पैसे मोजावे लागत असून बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला असल्याचाही आरोपही त्यांनी केला.

कोल्हापूरचे निलंबित तलाठी के. डी. शिंदे यांना पैसे दिल्याशिवाय कामेच होत नाहीत. त्यांचे सेंटर कोल्हापूर आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी आहे. रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे. बीओटीमध्ये जी लायाबलीटी निर्माण झाली ती आपल्याला व्याजासकट वापस करायचे आहे. बांधकाम खात्यात काय सुरू आहे, त्याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा, असे आवाहन यावेळी जयंत पाटलांनी केले. त्याचबरोबर त्यांनी जलसंपदा विभाग, ग्रामविकास विभाग यांना महाराष्ट्रात किती सिंचन झाले, हे सांगायला धाडस नसल्याचा टोलाही मारला.

Intro:Body:MH_MUM_Jayant_Patil_PWDScam_Vidhansabha_7204684

बांधकाम खात्यात भ्रष्टाचार बोकाळला: बिओटीच्या व्याजाचा बोजा राज्याच्या उरावर पडणार : जयंत पाटील

रस्ते विकासाच्या खासगीकरणातून मोठा घोटाळा..

जयंत पाटलांचा चंद्रकांत पाटलांवर पुन्हा सां.बां. घोटाळ्याचा आरोप

मुंबई : पुणे जिल्ह्यातील हवेली व बालेवाडीतील देवस्थान जमिनीचा गैरव्यवहार सभागृहात पुराव्यानिशी मांडल्यानंतर रस्ते विकासाच्या खासगीकरणातून मोठा घोटाळा झाल्याचे सांगत जयंत पाटलांनी चंद्रकांत पाटलांवर पुन्हा सां.बां. घोटाळ्याचा आरोप केला.

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील सार्वजानिक बांधकाम विभागाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलताना म्हणाले,
बांधकाम विभागात बीओटी ही कल्पना आणली गेली आहे. बीओटी व्याजाचा दर लावला आहे. द्यायची रक्कम वाढली आहे. बीओटी योजना सावळा गोंधळ आहे. बांधकाम खात्याची मोठी यंत्रणा असताना प्रायव्हेट कंपन्यांना काम दिले आहे. डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट करण्यासाठीही प्रायव्हेट कंपन्यांना आहेत. त्यांना दीड ते दोन कोटी रुपये दिले जातात. मागच्या बाजूने खासगीकरण आणले जात आहे.

महाराष्ट्रात सुप्रिटेंडेंट इंजिनिअर, एक्सीक्यूट्यू इंजिनिअर, डेप्युटी इंजिनिअर या पदासाठी पैसे मोजावे लागतात, बांधकाम खात्यात भ्रष्टाचाराने धुमाकूळ घातला आहे असं पाटील म्हणाले.

के.डी.शिंदे निलंबित तलाठी कोल्हापूरचे त्यांना पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. याचे सेंटर कोल्हापूर आणि मुंबईत दोन्ही ठिकाणी आहे. रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार आहे. बीओटीमध्ये जी लायाबलीटी निर्माण झाली आहे की आपल्याला व्याजासकट वापस करायचे आहे. बांधकाम खात्यात काय सुरू आहे त्याचा अभ्यास मुख्यमंत्र्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले.
जलसंपदा विभाग, ग्रामविकास विभाग यावर बोलताना शेवटी ते म्हणाले, जलसंपदा विभागात धाडस नाही की महाराष्ट्रात सिंचन किती झाले त्यांना सांगत येत नाही.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.