ETV Bharat / state

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या महिलानेत्या आक्रमक; महिलांचा अपमान सहन करणार नाही - जया बच्चन - महिलांचा अपमान सहन करणार नाही

बेताल मंत्र्यांविरोधात महाविकास आघाडीच्या महिलानेत्या आक्रमक ( Aggressive women leaders of Mahavikas Aghadi ) झाल्या. महिलांचा अपमान सहन करणार नाही, जया बच्चन म्हणाल्या. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यानी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मंत्रिमंडळातून अशा मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन केली.

Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या महिलानेत्या आक्रमक
author img

By

Published : Nov 14, 2022, 1:37 PM IST

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून शिंदे सरकारमधील मंत्र्यांकडून महिलांविरोधात बेताल वक्तव्य सुरू (Absurd statements against women started) आहेत. महाविकास आघाडीच्या महिला नेत्यानी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून मंत्रिमंडळातून अशा मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांची भेट घेऊन केली. विविध मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात आले. समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन, राष्ट्रवादीच्या नेत्या फौजिया खान, विद्या चव्हाण, आदिती तटकरे, आदिती नलावडे, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, ऋतुजा लटके, आमदार मनिषा कायंदे आदी महिला नेत्यांच्या शिष्टमंडळ यावेळी उपस्थित होते. ( Aggressive women leaders of Mahavikas Aghadi )

Mahavikas Aghadi
महाविकास आघाडीच्या महिलानेत्या आक्रमक

महिला सशक्त होत आहेत : दिवसेंदिवस राज्य सरकारमधील मंत्र्यांकडून महिलांचा अवमान केला जातो आहे. मात्र आता आम्ही महिलांचा अपमान सहन करणार नाही. उत्तर प्रदेशातही महिलांवर रोज अत्याचार होत आहे. दीदींवरील अत्याचार आता बंद करा. आम्ही ते सहन करणार नाही. महिला सशक्त होत आहेत. बलवान होत आहेत. अशावेळी त्यांची मानहानी करण्याचा प्रयत्न होत आहे, हे सहन केले जाणार नाही, असा इशारा समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी दिला. तसेच लवकरच राष्ट्रपतींना भेटून आमचे म्हणणे मांडणार आहोत, असेही त्यांनी सांगितले. लोक महिलांवर अशा पद्धतीने विधाने करतात त्यांना राजकारणातून तात्काळ काढून टाकले पाहिजे. अशा लोकांमुळे राजकारणाची प्रतिमा मलिन होत आहे, असे जया बच्चन म्हणाल्या.

राज्यपालांना बेताल मंत्र्याबाबत दिले होते निवेदन : महिलांवरील शेरेबाजीला लगाम घातला गेला पाहिजे. या संदर्भातील निवेदन राज्यपालांना दिले असून मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचे खासदार प्रियंका चतुर्वेदी सांगितले. तसेच या पूर्वी राज्यपालांना बेताल मंत्र्या बाबत निवेदन दिले होते. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी पत्र दिल्याचे म्हटले होते. हे पत्र जाहीर व्हायला हवे, जेणेकरून महिलांबाबत काय निर्देश दिलेत हे महिलांना कळेल, असे चतुर्वेदी म्हणाल्या. तसेच गृहखात्याकडून विरोधकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोपही प्रियंका चतुर्वेदी यांनी केला. तर आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही कोर्टात जाणार असल्याचे राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण सांगितले. जाणीवपूर्वक विरोधकांना विविध खोट्या प्रकरणात अडकवले जात आहे. या खोटे गुन्ह्यांच्या प्रकरणी आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करणार आहोत, असा इशारा विद्या चव्हाण यांनी दिला. तसेच त्यामुळे फडणवीसांकडील गृहखात मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे ठेवावे अशी मागणी करणार असल्याचे विद्या चव्हाण यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.