ETV Bharat / state

Kangana Ranaut Vs Javed Akhtar : कंगनाच्या खासगी तक्रारीनंतर न्यायालयाच्या समन्स विरोधात जावेद अख्तर यांची सत्र न्यायालयात धाव, नेमके प्रकरण काय? - Kangana ranaut complaint against Javed Akhtar

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांना अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या खाजगी तक्रारीवरून समन्स जारी करण्यात आले होते. त्यामुळे जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतलेली आहे. यावरील पुढील सुनावणी 5 ऑगस्टला होणार आहे.

Kangana Ranaut Vs Javed Akhtar
कंगना रणौत विरुद्ध जावेद अख्तर
author img

By

Published : Aug 2, 2023, 8:08 AM IST

मुंबई : गीतकार जावेद अख्तर आणि बॉलीवूड स्टार कंगना रणौत यांच्यातील वाद काही संपण्याचे चिन्हे दिसत नाहीत. कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्यावर केलेला खंडणीचा आरोप अंधेरीचे न्यायदंडाधिकारी यांनी रद्द केला होता. मात्र, त्यानंतर कंगना रणौतने न्यायलयात खाजगी तक्रार केली. त्या तक्रारीनंतर न्यायदंडाधिकारी यांनी पुन्हा फौजदारी दंड संहिता प्रक्रिया जारी केली. जावेद अख्तर यांना समन्स बजावले. या समन्सविरोधात आता जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतलेली आहे.

खंडणी मागितल्याचा आरोप : कंगणाची बहीण रंगोली चंदेल आणि हृतिक रोशनच्या समोर जावेद अख्तर यांनी कंगणाला माफी मागायला लावली होती. ती घटना म्हणजे गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्याकडून खंडणी मागितली, असा आरोप बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिने केला होता. मात्र न्यायदंडाधिकारी यांनी 'माफी मागायला लावणे म्हणजे काही खंडणी मागणे नव्हे,' अशा स्पष्ट शब्दांमध्ये कंगनाच्या याचिकेवर सुनावणी करताना बजावले होते. माफी मागायला लावणे हे विधान, त्या व्याख्येमध्ये येत नाही. त्यामुळेच खंडणी मागितल्याचा कंगना रणौतचा आरोप फेटाळून लावत त्यांनी ती मागणी रद्द केली होती.

मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव : कंगना रणौतने पुन्हा जावेद अख्तर यांच्याविरोधात न्यायालयात खासगी तक्रार केली. त्यावर न्यायदंडाधिकारी आर. एम. शेख यांनी तिच्या तक्रारीवर गीतकार जावेद अख्तर यांना मंगळवारी समन्स जारी केलेले आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. याबाबत 5 ऑगस्ट रोजी यासंदर्भात सुनावणी होईल. परंतु त्यापूर्वी कोणतीही कारवाई होऊ नये, यासाठी जावेद अख्तर यांनी सत्र न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे.

घटनेची पार्श्वभूमी : कंगना रणौतची बहीण रंगोली चंदेल आणि हृतिक रोशन यांच्यामध्ये वाद झाला होता. जावेद अख्तर यांनी मार्च 2016 मध्ये या दोघींना आपल्या घरी बोलावले. रंगोली चंदेल हिने हृतिक रोशनची माफी मागावी, अशी त्यांनी विनंती केली होती. त्यानंतर कंगना रणौत हिने यासंदर्भात जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचा आरोप करत खटला दाखल केला. जावेद अख्तर यांनी गुप्त हेतूने तिची बहीण आणि तिला त्यांच्या राहत्या घरी बोलावले, असा कंगणाचा आरोप आहे. अख्तर यांनी गुन्हेगारी पद्धतीने धमकावले. ऋतिक रोशनची माफी मागा म्हणून सांगितले, असा आरोप कंगनाने केलेला आहे. त्यांनी कंगनाबाबत बेताल वक्तव्य केले. त्यामुळे कंगनाच्या नैतिक चारित्र्यावर हल्ला झाल्याचा दावा करत याचिका दाखल केल्याचे कंगना रणौतने सांगितले.

हेही वाचा :

  1. जावेद अख्तर मानहाणी प्रकरण : ...तर कंगना रणौतला होणार अटक
  2. Kangana Ranaut Vs Javed Akhtar : लेखी माफी मागायला सांगणे, म्हणजे खंडणी नव्हे: जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचा आरोप न्यायालयाकडून रद्द
  3. Kangana Ranaut : 'हृतिक रोशननंतर वीर दासची लुटली इज्जत ', कंगना राणौतने किसिंग सीनवर दिले उत्तर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.