मुंबई - देशामध्ये कोरोना बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहून, त्यावर आळा घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधीत केले होते. त्यानुसार त्यांनी आज सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांनी स्वतःहून, स्वतःसाठी संचारबंदी लागू करावी असे, आवाहन केले होते. त्यासाठी त्यांनी 'जनता कर्फ्यू' हा नवा शब्द वापरला आहे.
Live Updates -
- 03.23 PM - राज्यातील नागरी भागात आज मध्यरात्रीपासून जमावबंदी - उद्धव ठाकरे
- 02.51 PM - देशातील सर्व मेट्रोसेवा 31 मार्चपर्यंत बंद
- 02.23 PM - मुंबईकरांसाठी मोठा निर्णय, आज रात्रीपासून मुंबईची लाईफलाईन लोकल 31 मार्चपर्यंत बंद
- रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय, प्रवासी रेल्वे गाड्या 31 मार्चपर्यंत बंद
- 12.30 PM - तेलंगणाने महाराष्ट्राच्या सीमा केल्या सील, उभारले चेकपोस्ट
- 10.56 AM - महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, मुंबईत 63 वर्षीय नागरिकाचा मृत्यू
- 10.04 AM - जनता कर्फ्यूत नागपूरकर जनतेचा शंभर टक्के सहभाग
- 10.03 AM - औरंगाबाद-धुळे महामार्ग पडला ओस
- 09.37 AM - कोल्हापुरातील रस्त्यांवर शुकशुकाट
- 08.19 AM - मुंबईचा दादर फुल बाजार ओसरला
- 08.18 AM - मुंबईच्या फोर्ट परिसरात शुकशुकाट
- 08.17 AM - धारावीसह माहिम स्थानकावर जनता कर्फ्यूला नागरिकांचा प्रतिसाद