ETV Bharat / state

Jai Shree Ram : ‘जय श्री राम’ बोलण्यास नकार दिल्यानं तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा दाखल

Jai Shree Ram : 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्यानं 34 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलीय. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. सोमवारी (25 सप्टेंबर) ही घटना घडली होती.

Jai Shree Ram
Jai Shree Ram
author img

By PTI

Published : Sep 28, 2023, 10:53 PM IST

Updated : Sep 29, 2023, 6:30 AM IST

मुंबई : Jai Shree Ram : 'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्यानं 34 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना कांदिवली पूर्वमधील गोकूळ नगरात उघडकीस आलीय. याप्रकरणी कुरार पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केलीय. सिद्धार्थ अंगुरे (34) असं पीडित तरुणाचं नाव आहे. सोमवारी (25 सप्टेंबर) ही घटना घडली होती. तर मंगळवारी तक्रार दाखल करण्यात आली होती.

'जय श्री राम' म्हणण्यास नकार दिल्यानं मारहाण : कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेअकरा वाजता सिद्धार्थ कामावरून घरी परतत असताना तो आपल्या धाकट्या भावासोबत फोनवर बोलत होता. यादरम्यान कुरारच्या दिशेने जात असताना कांदिवली पूर्व येथील गोकूळ नगरजवळ चार जणांनी त्याला अडवले. सिद्धार्थनं त्यांना का थांबवत आहात असं विचारलं असता, आरोपींपैकी एकजण त्याच्याजवळ आला आणि त्याला 'जय श्री राम' म्हणण्यास सांगितलं. त्या चौघांपैकी एकानं 'जय श्री राम' म्हणायला सुरुवात केली आणि सिद्धार्थला हे पुन्हा म्हणायला लावलं. सिद्धार्थनं आपण थकलो असून, घरी जायचं असल्याचं सांगितलं. त्यानंतर आरोपींनी सिद्धार्थला शिवीगाळ करत मारहाण केली. पीडितेचा भाऊ विष्णू अंगुरे याने हे पाहताच हस्तक्षेप केला. त्यानंतर विष्णूनं जखमी सिद्धार्थला कांदिवली पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. एक दिवस उपचार घेतल्यानंतर सिद्धार्थनं कुरार पोलिसांत जाऊन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय.

चारही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल : याप्रकरणी सिद्धार्थ अंगुरेंनी दिलेल्या तक्रारीनुसार, पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 341, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केलाय. सुरज तिवारी, अरुण पांडे, पंडित आणि राजेश रिक्षावाला अशी आरोपींची नावे असून, याप्रकरणी अधिक तपास कुरार पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

  1. Family Beaten Up In Maval: गणेश विसर्जनादरम्यान घरासमोर डीजे वाजवू नका म्हटल्याने कुटुंबाला मारहाण
  2. Nagpur Gang Rape: धक्कादायक! 15 वर्षीय तरुणीवर तब्बल सात नराधमांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार; सर्व आरोपींना अटक
  3. Amravati Crime: विद्यार्थिनीचा विनयभंग केल्यानं पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी क्रीडा शिक्षकाच्या तक्रारीनंतर कथित पत्रकाराविरोधात गुन्हा

Last Updated : Sep 29, 2023, 6:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.