ETV Bharat / state

Mumbai Crime : आईची हत्या करुन मृतदेहाच्या तुकड्यांसोबत राहात होती मुलगी, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वीणा जैन हत्या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. लालबाग परिसरात एका मुलीने आईची हत्या केल्याची घटना घडल्याचे तपासात स्पष्ह होत आहे. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले आहे. तिची चौकशी सुरू आहे. वीणा जैन पहिल्या मजल्यावरुन पडल्याचा बनाव त्यांची मुलगी रिंपल जैन यांनी केला होता.

Mumbai Crime
Mumbai Crime
author img

By

Published : Mar 15, 2023, 6:47 PM IST

मुंबई : 14 मार्चला रात्री आठच्या सुमारास वीणा जैन यांचा थोरला भाऊ सुरेशकुमार पोरमाल (60) यांनी आपली बहीण वीणा जैन बऱ्याच दिवसापासून घरात दिसून न आल्याने काळाचौकी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी इब्राहिम कासम चाळीतील पहिल्या मजल्यावर रूमची पाहणी केली असता वीणा जैन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर काळाचौकी पोलिसांनी विना जैन यांची मुलगी रिंपल जैन (23) हिला अटक केली आहे.

  • Mumbai | The decomposed body of a 53-year-old woman was found in a plastic bag in Lalbhaug area. The 22-year-old daughter of the deceased woman was taken into custody by the police for questioning. Police took the body into custody and sent it for postmortem: DCP Pravin Mundhe pic.twitter.com/2AlVS225XV

    — ANI (@ANI) March 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुन्हा दाखल : याप्रकरणी काळाचौकी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संविधान कलम 302, 201 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4, 7, 25, 27 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत महिला विना जैन यांचा भाऊ सुरेशकुमार हे पेरू कंपाउंड मधील गुंदेजा गार्डन येथे राहतात. सुरेशकुमार यांनी आपल्या बहिणीला शेवटचे 26 नोव्हेंबरला पाहिले होते.

मृतदेह केले तुकडे : पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लालबागमधील पेरू कंपाऊंड परिसरात असलेल्या इब्राहिम कासम चाळीत विणा प्रकाश जैन (वय 55) यांची मुलगी रिंपल जैन त्यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळे रिंपल जैन यांनी आईचा धारदार शस्त्राने खून केला. खून केल्यानंतर रिंपल जैन यांनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी तुकडे बाथरूममध्ये स्टीलच्या टाकीत ठेवले होते. ही घटना गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये घडली असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या घटनेचे नेमके कारण हे आरोपीच्या चौकशीअंती स्पष्ट होईल असे पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडे यांनी सांगितले.

पोटच्या मुलीनेच केला खून : वीणा जैन यांच्या भावाची मुले दर महिन्याला खर्चासाठी पैसे देण्यासाठी इब्राहिम कासम चाळीतील विना जैन यांच्या घरी जात असत. काल विना जैन यांची मुलगी रिंपल ही दरवाजा उघडत नसल्याने विणा यांच्या मोठ्या भावाची पत्नी, दुसऱ्या भावाची पत्नी राहत्या घरी मुलासह गेल्या. त्यावेळी भावाच्या मुलाने दरवाजावर जोरदार धक्का देऊन दरवाजा तोडला. मागील काही महिने विना यांचा भाऊ तिच्या खर्चाचे पैसे चाळीच्या खाली येऊन देत असे. दरम्यान, विणा यांच्या भावजयांना संशय आल्यानंतर त्याची माहिती पतीला दिली. वीणा जैन यांचा थोरला भाऊ सुरेशकुमारने रिंपलसह काळाचौकी पोलीस ठाण्यात जाऊन मिसिंगची तक्रार दिली होती. त्यावेळी रिंपलने आई कानपूरला गेली असल्याचे सांगत बनाव रचण्याचा प्रयत्न केला होता. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून शेजारी राहणारे लोक देखील रिंपलच्या घरातून दुर्गंध येत असल्याबाबत चर्चा करत होते, तसेच रिंपलच्या मामाला माहिती दिली होती.

दिशाभूल करण्याचा प्रयत्न : पोलिसांना खोटी माहिती देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न फसल्याचे यामुळे निदर्शनास आले. पोलिसांनी मिसिंग तक्रार दाखल झाल्यानंतर काळाचौकी पोलिसांचे पथक इब्राहिम कासम चाळीतील घरी पोहोचले. त्यांनी लोखंडी कपाटाच्या तळघरात विना जैन यांच्या मृतदेहाचा एक भाग कुजलेल्या अवस्थेत एका प्लास्टिकच्या गोणीत आढळून आला. त्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती घेतल्यानंतर बाथरूममध्ये स्टीलच्या टाकीत साडीत गुंडाळलेले मृतदेहाचे तुकडे पोलिसांना सापडले. पोलिसांनी मृतदेहाचे सर्व भाग एकत्र करून केईएम रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. यासाठी घटनास्थळी सेंट्रल इन्वेस्टीगेशन टीम, फॉरेन्सिक टीम यांना पाचरण करून घटनास्थळाचे परीक्षण करण्यात आलेले आहे.

वीणा जैन पडल्या होत्या पहिल्या मजल्यावरून : वीणा जैन या इब्राहिम कासम या चाळीतील पहिल्या मजल्यावरील रूममध्ये राहत होत्या. यापूर्वी त्या आपल्या पतीसह विरार येथे राहायला होत्या. मात्र, पतीच्या निधनानंतर वीणा जैन आपली मुलगी रिंपलसह लालबाग मधील भावाच्या घरी राहण्यास आल्या. विना यांना तीन भाऊ, चार बहिणी असून एका भावाचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याचप्रमाणे वीणा जैन यांचे पती प्रकाश यांचा 2000 साली मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. वीणा जैन यादेखील अनेक वर्षांपासून आजारी होत्या. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपी रिंपल हिने वीणा जैन 27 डिसेंबर रोजी गॅलरीतून खाली पडली असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिला उचलण्यासाठी रिंपलने खाली असलेल्या चायनीज हॉटेलमधील दोन कामगारांची मदत घेतली होती. या दोन कामगारांची देखील काळाचौकी पोलिसांनी चौकशी केली आहे. 27 डिसेंबरला वीणा जैन यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचे तुकडे करून घरात ठेवण्यात आले होते असा अंदाज पोलिसांनी वर्तवलेला आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपासून रिंपलने आंघोळ देखील केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. कपडे घेण्यासाठी कपाट उघडले तर मृतदेहाचा दुर्गंध इतरत्र पसरेल या भीतीने रिंपलने काही दिवस आंघोळ केली नसल्याचे निष्पन्न झाला आहे. कटर, इतर शस्त्रसामुग्री कुठून जमा केली होती? वीणा जैन यांची हत्या का करण्यात आली, यांचा तपास आता पोलीस करीत आहे.

हेही वाचा - Heavy Rain Warning : राज्यात पुढील 4 दिवसात गारपिटीसह मुसळधार पावसाचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.