मुंबई : नोव्हेंबर 2017 मध्ये 42 महिने म्हणजे साधारण साडेतीन वर्ष वयाच्या छोट्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या मुलिच्या मित्राच्या वडिलांनी लैंगिक अत्याचार केला. दुपारी ती चिमुरडी तिची आई तसेच भावंडांसोबत खेळत असताना, आरोपीने तिला घरात नेले आणि तीच्या गुप्तांगाशी चाळे केले त्यामुळे तिला रक्तस्त्राव सुरू झाला. लहान मुलगी धावतच आईकडे गेली आईने पाहिले तेव्हा तिला लघवी करता येत नव्हती तसेच ती वेदनेने ओरडत होती. चौकशी केली असता मुलीने सांगितले आरोपीने त्या जागेत बोट घातले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली. तसेच 8 साक्षीदारांच्या तपासणीनंतर ट्रायल कोर्टाने त्याला दोषी ठरवले त्या विरोधात त्याने उच्च न्यायालयात अपील केले होते.
आरोपीने म्हटले होते की, ज्या मुलीवर बलात्कार झाला असे म्हटले जात आहे. तिने सांगावे की तिच्या कोणत्या खाजगी इंद्रियांना मी स्पर्श केला आणि काय पद्धतीने तिला तिथे इजा झाली किंवा छेडछाड केली गेली. आरोपीचा हा सवाल अत्यंत अनुचित आहे. असे सांगत न्यायालयाने म्हटले की पिडिता साडेतीन वर्षाची आहे तिने जे काही सांगितले तेवढे पुरेसे आहे. एकल न्यायाधीश न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी पॉक्सो कायद्याच्या अन्वये लैंगिक अत्याचार आणि भादंवि कलम 376 नुसार बलात्काराबद्दल विशेष न्यायाधीशांनी दिलेल्या शिक्षेला दिलेले आव्हान फेटाळले.
पिडिता साडेतीन वर्षांची लहान मुलगी आहे. जिला स्वतःच्या अवयवांची ओळख देखील झाली नाही, तिच्या खाजगी अवयवांचे वर्णन तिने द्यावे असे कोणीच म्हणू शकत नाही. लहान बलिकेच्या निवेदनात तिने स्पष्टपणे सांगितले आहे की, तिच्या मित्राच्या वडिलांनी टॉयलेटच्या ठिकाणी तिला स्पर्श केला. लहान मुलगी पुढे म्हणते की तो एक वाईट काका आहे. तिने स्पष्टपणे सगळे सांगितले होते. मात्र ज्या डॉक्टरांसमोर ती वैद्यकीय तपासणीसाठी हजर होती, त्यांनी तिच्यावर झालेल्या गंभीर अत्याचाराची घटना सामान्य असल्याचे सांगितले.
न्यायमूर्ती डांगरे यांनी विशेष न्यायाधीशांच्या नोंदी लक्षात घेऊन हा निष्कर्ष काढला, ज्यात स्पष्ट करण्यात आले की, पीडितेला घटना उघडपणे सांगता आली नाही, परंतु या वयाच्या लहान मुलीकडून अधिक जबाबदार वर्तनाची अपेक्षा कशी केली जाऊ शकते ट्रायल कोर्टासमोर पीडितेच्या जबाबावर अविश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. एवढ्या लहान वयातील अशा गंभीर आणि वाईट कृत्य तिच्यावर कोणी करेल याची कल्पना ना आईला ना मुलीला. त्यामुळे वैद्यकीय पुराव्यासह मुलाच्या साक्षीने आरोपीचा अपराध सिद्ध होतो.