मुंबई : एका ३६ वर्षीय आयटी इंजिनिअरला एका अज्ञात महिलेने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर आयटी अभियंता तसेच सदरील महिलेत संवाद सुरू झाला. महिलेने चॅट करताना अभियंत्याला मोबाईल नंबर देण्याची विनंती केली. त्यानंतर अभियंत्याचे 8 ऑगस्ट रोजी तिच्यासोबत तीन ते चार मिनिटे संवाद झाला. पुढील चार दिवस ते एकामेकांच्या संपर्कात नव्हते. मात्र, 11 ऑगस्ट रोजी महिलेने त्याच्याकडे पैशांची मागणी सुरू केली.
विवस्त्र व्हिडिओ पाठवत पैशांची मागणी : सुरवातीला आयटी अभियंत्यांने त्याकडे लक्ष दिलं नाही. त्यानंतर अनोळखी महिलेने 13 ऑगस्ट रोजी अभियंत्याला एडिट केलेला विवस्त्र व्हिडिओ पाठवत पुन्हा पैशांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास विवस्त्र अवस्थेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीही तिने दिली होती. आपल्या बदनामीच्या भीतीने आयटी अभियंत्याने अज्ञात महिलेने पुढे केलेल्या बोगस सायबर अधिकारी तसेच यूट्यूब व्यवस्थापकाला चार लाख दहा हजार रुपये दिले.
युट्युब मॅनेजर म्हणून पैसे उकळले : अभियंत्याला 14 ऑगस्टला परत एक फोन आला. समोरील व्यक्तीने सायबर अधिकारी असल्याचे सांगत पैशाची मागणी केली. तसेच संजय सिंग नावाच्या व्यक्तीचा मोबाईल क्रमांक दिला. संजय सिंगने स्वतःला युट्युब मॅनेजर असल्याचे सांगितले. त्यांनी तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यामुळे अभियंत्याने घाबरून दीड लाख रुपये सुरुवातीला पाठवले. त्यानंतर परत काही पैसे त्याने प्रकरण मिटवण्यासाठी सदरील व्यक्तीला पाठवले. मात्र, आयटी इंजिनियरच्या पत्नीस या प्रकरणाचा संशय आला. त्यानंतर त्यांनी पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी : तक्रारदार आयटी अभियंता असून ते पवई येथे आई-वडिलांसोबत राहतात. पवई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी अनिता कुमारी नावाच्या एका अनोळखी महिलेने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती स्वीकारल्यानंतर दोघांनी चॅटिंग सुरू केले. त्यानंतर सदरील महिलेने अभियंत्याकडे पैशाची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायलर करण्याची धमकी दिली.
हेही वाचा -
- Cyber Crime : सेक्सटॉर्शननंतर सायबर चोरट्यांच्या रडारवर राजकीय व्यक्ती; धमक्यांचे प्रमाण वाढले
- Pune Crime : अश्लील व्हिडिओ कॉल करून आमदारालाच फसविले सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; आरोपीस राजस्थानातून अटक
- Pune cops nab sextortion case : केवळ 2200 लोकांच गाव सेक्सटॉर्शनं गाजलं, आरोपीला रायपूर सुकेती येथुन अटक