ETV Bharat / state

Israel Hamas War : इस्रायलमधील युद्धाचा अनुभव सांगताना आव्रहम यांना कोसळलं रडू; 'ईटीव्ही भारत'सोबत Exclusive संवाद - Israel Hamas War

Israel Hamas War : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाला सुरू होऊन पाच दिवस झाले. मात्र, तेथील परिस्थिती अद्यापही बिकटच आहे. मृतांची संख्या १ हजार ६०० च्या पुढे गेली असून, दोन्ही बाजूंनी हजारो लोक जखमी झाले आहेत. तर मुंबईत 15 वर्ष राहिलेल्या अन् आता इस्रायलमध्ये स्थायिक झालेल्या आव्रहम (Avraham Nagaonkar On Israel Hamas War) यांनी युद्धजन्य परिस्थितीबाबात अनुभव 'ईटीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितलाय.

Israel Hamas War
युद्धजन्य परिस्थितीबाबत सांगितला अनुभव
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 7:46 PM IST

Updated : Oct 12, 2023, 10:50 PM IST

युद्ध परिस्थितीची माहिती देताना आव्रहमला नागावकर

मुंबई : Israel Hamas War : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध अद्याप सुरू आहे. हमासनं अतिशय क्रूरपणे भीषण असा शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास इस्रायलवर हल्ला केला. त्यानंतर तिथले जनजीवन तर विस्कळीत झालेच मात्र, घराघरात देखील शोककळा पसरली आहे. मुंबईत पंधरा वर्षे उमरखाडी परिसरात आणि 1969 ला इस्रायलला स्थलांतरित झालेले अव्राहम नागावकर (Avraham Nagaonkar) यांनी या युद्धजन्य परिस्थितीबाबत खेद व्यक्त परत तेथील दाहकता सांगितली (Avraham Nagaonkar On Israel Hamas War)आहे. आम्हाला येथे कोणालाच अन्न गोड लागत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हमासनं हल्ला केल्यानंतर तिथं काय घडलं याबाबतचा अनुभव अव्राहम नागावकर यांनी 'ईटीव्ही भारत'सोबत शेयर केला.

सावधान राहण्यासाठी दिला सायरन : गाजा पट्टी परिसरात 22 गावे आहेत. या गावांमध्ये दहशतवादी घुसले. शनिवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी आम्हाला सायरन देण्यात आला होता. आतापर्यंत दोनवेळा सायरन देण्यात आला होता. आपत्कालीन काळादरम्यान इस्रायलमध्ये स्वतःच्या बचावासाठी आणि सावधान राहण्यासाठी प्रत्येक घराला समजेल असा सायरन दिला जातो. सायरन दिल्यानंतर घरातील प्रत्येकानं बंकरमध्ये जाऊन लपायचं असतं. इस्रायलमध्ये प्रत्येकाच्या घरात देखील बंकर बनवून घेणं सरकारनं बंधनकारक केलंय. सायरन झाल्यानंतर बहुतांश लोक बंकरमध्ये लपतात. मात्र, सुदैवाने युद्धाची झळ आमच्या शहरापर्यंत पोहोचली नाही. डिमोरा शहरात मी राहत असून, डिमोरा शहर गाजा पट्टीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे, असं अव्राहम नागावकर यांनी सांगितलं.

Israel Hamas War
इस्रायलमधील युद्धानंतर लोक राहिले घरात

इस्रायलमध्ये होता 'शब्बत' सण : पुढे त्यांनी सांगितलं की, मी पंधरा वर्षे मुंबईतील उमरखाडी परिसरात राहत होतो. माझे शालेय शिक्षण माझगावमधील ज्यू शाळेत झालं. त्यानंतर 1969 पासून मी माझ्या कुटुंबासह इस्रायलला स्थलांतरित झालो. माझ्या कुटुंबात माझी पत्नी, मुलगी आणि मुलगा, जावई असे सदस्य आहेत. अव्राहम पुढे म्हणाले, डिमोरा शहरात जिथं आम्ही राहतो, तिथं जवळपास 30 हजारांची लोकसंख्या आहे. येथे दर शुक्रवारी 'शब्बत' हा सण साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी शनिवारपर्यंत 24 तास हा सण सुरू असतो. या 24 तासांच्या कालावधीत आम्हाला जेवण करायचं नाही, गाडी चालवायची नाही आणि गरज असेल तरच घराबाहेर पडायचं. थोडक्यात काहीच काम करायचं नाही. शिजवून ठेवलेलं जेवण फक्त गरम करून खायचं. जेवन शिजवायचं नाही. धार्मिक ग्रंथांचं पठण करायाचं असतं.

दहशतवादी घुसले संगीताच्या कार्यक्रमात : सहा तारखेला शुक्रवार होता आणि दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोबरला सणाचा दिवस होता. त्यामुळे बरीचशी माणसं शनिवारी घरातच होती. मात्र, काही तरुण मुलांनी गाजा पट्टीपासून काही अंतरावरच असलेल्या एका मोकळ्या जागेत संगीताचा कार्यक्रम ठेवला होता. शुक्रवारी रात्री सुरू झालेला हा कार्यक्रम पहाटेपर्यंत ठेवण्यात आला. त्यामुळे गाजा पट्टीतून घुसलेले दहशतवादी थेट या संगीताच्या कार्यक्रमात घुसले आणि तेथे त्यांनी जवळपास 400 जणांना संपवलं असल्याचं नागावकर यांनी सांगितलं.

जावई आणि पुतण्या युद्धासाठी रवाना : नागावकर हे सेवानिवृत्त झाले असल्यानं त्यांना युद्धात जाता आले नाही. मात्र, त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी सर्वप्रथम ते सैन्यात दाखल झाले आणि त्यानंतर ते सरकारी नोकरीला लागले होते. पण त्यांचा मुलगा लिओ सैन्यात आहे. त्यांच्या मुलीचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले असून, जावई आदिराम आणि पुतण्या एरल हे युद्धासाठी रवाना झाले आहेत.

Israel Hamas War
इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यामुळे नागरिकांनी बाहेर पडायचं टाळलं

प्रत्येक घरातून तरुण युद्धासाठी रवाना : शनिवारी हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच रविवारी माझ्या जावयाला आणि पुतण्याला तत्काळ युद्धासाठी जावे लागले. इस्त्रायलवर झालेल्या हल्ल्यामुळे प्रत्येक इस्त्रायली ज्यू नागरिक पेटून उठला आहे. प्रत्येक घरातून सरासरी एक तरुण या युद्धासाठी रवाना झाला आहे. हे आमच्या प्रत्येकावरील संकट आहे. पण आम्ही शेवटपर्यंत लढू आणि जिंकू, असा निर्धार इस्त्रायली नागरिक असलेल्या नागावकर यांनी व्यक्त केला आहे.

रस्त्यावर पसरला शुकशुकाट : युद्धामुळं शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शाळा, कॉलेजे आणि ऑफिस बंद असल्याकारणानं रस्त्यावर शुकशुकाट पसरला आहे. गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जीवनावश्यक वस्तू मिळत आहेत. आवश्यकता असेल तर घराच्या बाहेर पडा असं नागरिकांना सांगण्यात आलं आहे. लोक जीवनावशक्य वस्तू खरेदी करत आहेत. मात्र कोणालाही अन्न गोड लागत नाहीय. सर्वांवरच दुःखाचा डोंगर कोसळल्यासारखी परिस्थिती आहे. आम्ही लढणार्‍या सैनिकांसाठी प्रार्थना करत आहोत. तर या हल्ल्याची भीषणता सांगताना नागावकर यांना अखेर रडू कोसळलं.

हेही वाचा -

  1. Israel Hamas Conflict : हमासचा अचानक हल्ला इस्रायली गुप्तचर यंत्रणेचं अपयश, कसा झाला ५० वर्षांतील सर्वात मोठा हल्ला?
  2. Israel Palestine Conflict : हमास इस्रायल युद्धात अडकले भारतीय; राजकोटची सोनल म्हणते सरकार आमच्यासोबत, चिंतेची गरज नाही
  3. Nushrratt Bharuccha : युद्धग्रस्त इस्रायलमधून परतल्यानंतर नुसरत भरुचानं पहिला व्हिडिओ केला शेअर ; भारत सरकारचे मानले आभार...

Last Updated : Oct 12, 2023, 10:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.