मुंबई - प्रवाशांना तिकीट बुकिंग सोपे आणि सुलभ होण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीने आता बस तिकिटांची देखील आरक्षण सुविधा सुरु केली आहे. रेल्वे आणि विमानाचे तिकीट काढण्याबरोबरच बसचे सुद्धा आरक्षण करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
सर्वप्रथम प्रवाशांना बसची तिकीटे बुक करण्यासाठी www.bus.irctc.co.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे. त्यानंतर संकेतस्थळवर प्रवासाची तारीख टाकल्यास तुम्हाला कोणत्या मार्गावर कोणती बस उपलब्ध आहे हे बघता येणार आहे. त्यानुसार बस मार्ग निवडल्यानंतर प्रवासाचा कालावधी आणि वेळ दिसेल त्यासोबत तिकिटाचे शुल्क आणि किती तिकीट शिल्लक राहिलेले आहे. तेसुद्धा दाखवण्यात येणार आहे.
प्रवाशांना होणार फायदा
आयआरसीटीसी संकेतस्थळावर ज्याप्रमाणे रेल्वेची टिकीट बुक करताना आसन निवडतो, त्याच प्रमाणे प्रवाशांना बसमधील पाहिजे ते आसन निवडता येणार आहे. तसेच तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना बसचा मार्ग, बसमध्ये मिळणाऱ्या सुविधा आणि रिव्ह्यू सुद्धा बघता येणार आहे. इतकेच नव्हे तर बँक आणि वॉलेटच्या माध्यमातून बस तिकीट आयआरसीटीसीच्या बुक करणाऱ्या प्रवाशांना डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे अशी माहिती आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा - स्वातंत्र्यानंतर प्रथमच एखाद्या महिलेला मिळणार फाशी, जाणून घ्या काय आहे गुन्हा?