ETV Bharat / state

इकबाल मिरचीच्या पत्नीसह मुले फरार आर्थिक गुन्हेगार घोषित, मालमत्तेवरही टाच - इकबाल मिरचीचे कुटुंब फरार घोषित

मृत इकबाल मिरची याची पत्नी व मुलांच्या नावावर खंडाळा येथे 6 एकर जमीन असून , व्हाइट वॉटर नावाने ही जमीन विकत घेण्यात आलेली आहे. त्याचा मालकी हक्क इकबाल मिरचीच्या मुलांकडे आहे. वरळीतील साहिल बंगलोवर इकबाल मिरचीची पत्नी आणि मुलांचा मालकी हक्क आहे. त्यावर आता टाच आणली जाणार आहे.

mirchi
इकबाल मिरचीच्या पत्नीसह मुले फरार आर्थिक गुन्हेगार घोषि
author img

By

Published : Feb 27, 2021, 9:06 AM IST

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांचा काळाबाजार सांभाळणाऱ्या मृत इक्बाल मिरचीची पत्नी हाजरा आणि दोन मुलांना ईडीच्या विशेष न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. याबरोबरच या तिघांच्या नावावर असलेल्या मुंबई, खंडाळा, पाचगणी येथील संपत्तीवर टाच आणण्याचे आदेशही विशेष न्यायालयाने दिले आहेत.

ही संपत्ती होणार जप्त

मृत इकबाल मिरची याची पत्नी व मुलांच्या नावावर खंडाळा येथे 6 एकर जमीन असून , व्हाइट वॉटर नावाने ही जमीन विकत घेण्यात आलेली आहे. त्याचा मालकी हक्क इकबाल मिरचीच्या मुलांकडे आहे. वरळीतील साहिल बंगलोवर इकबाल मिरचीची पत्नी आणि मुलांचा मालकी हक्क आहे. या बरोबरच वरळीतील तीन मजली समुद्र महलवरदेखील ईडीकडून टाच आणण्यात येणार आहे. भायखळा रोशन टॉकीज , जुहू तारा रोडवरील मिनाज हॉटेल , पाचगणी मधला एक बंगला आणि लंडनमधील संपत्तीवर ईडी कडून लवकर टाच आणण्यात येणार आहे.

डीएचएफएलचे प्रमोटर धीरज वाधवान, कपिल वाधवाण व मृत ईकबाल मिरचीच्या कुटुंबियांकडून मनी लाँड्ररिंग संदर्भात व्यवहाराचा तपास ईडी करत होती. खंडाळा, मुंबई, पाचगणी येथील संपत्तीची माहिती विशेष न्यायालयात ईडीकडून देण्यात आलेली होती. त्यावर जप्तीची कारवाई करण्याची परवानगी मागण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.