मुंबई - अॅण्टी करप्शन ब्युरोचे प्रमुख असलेले कनिष्ठ आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सेठ यांनी काल रात्री 11 वाजताच्या दरम्यान संजय पांडे यांच्याकडून महासंचालकाचा पदभार स्वीकारला. नियुक्तीचे आदेश जारी झाल्यानंतर सेठ यांनी मुख्यालयात जाऊन संजय पांडे यांच्याकडून महासंचालक पदाचा कार्यभार स्कीकारला.
-
IPS officer Rajnish Seth took over as the new Director General of Police of Maharashtra pic.twitter.com/8OG7JC4Rh6
— ANI (@ANI) February 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">IPS officer Rajnish Seth took over as the new Director General of Police of Maharashtra pic.twitter.com/8OG7JC4Rh6
— ANI (@ANI) February 18, 2022IPS officer Rajnish Seth took over as the new Director General of Police of Maharashtra pic.twitter.com/8OG7JC4Rh6
— ANI (@ANI) February 18, 2022
1998 बॅचचे अधिकारी -
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. ते 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. याआधी संजय पांडे यांना प्रभारी महासंचालक पद देण्यात आले होते. मात्र राज्याच्या पोलिस महासंचालक पदावर कायमस्वरूपी पोलिस महासंचालकांची नियुक्ती करावी अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यानंतर हायकोर्टाने सरकारला फटकारले होते. सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही त्यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. विद्यमान पोलिस महासंचालक पांडे यांच्याकडे या पदाची तात्पुरती जबाबदारी होती. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. एप्रिल 2021 पासून त्यांच्यावर महासंचालक पदाचा अतिरिक्त हंगामी कार्यभार सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र पांडे यांना या पदावरून हटविण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे ॲड. दत्ता माने यांनी केली होती.
तीन नाव होती शर्यंतीत -
पोलिस महासंचालक हे पद सर्वोच्च असून त्यांच्या नियुक्तीची कायदेशीर प्रक्रिया असते. यानुसार राज्यातील दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे पाठविली जातात. त्यातून अंतिम नावांची शिफारस महासंचालक पदासाठी केली जाते. त्यातून पूर्णवेळ महासंचालक नियुक्ती केली जाते. ही प्रक्रिया राज्य सरकारने पूर्ण केली आहे. यातील अंतिम तीन पोलिस अधिकाऱ्यांमध्ये हेमंत नागराळे, के. व्यंकटेशम आणि रजनीश सेठ यांचा समावेश आहे, असे याचिकेत स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता यातून रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
रजनीश शेठ यांचा अल्पपरिचय -
रजनीश शेठ यांचा जन्म २९ डिसेंबर १९६३ रोजी झाला. रजनीश शेठ यांचे शिक्षण बी ए ऑनर्स (एल एल बी) झाले आहे. रजनीश शेठ हे १९८८ बॅचे आयपीएस अधिकारी आहे. शेठ हे मुंबईतील आझाद मैदान दंगलीच्या वेळी त्यांनी मुंबईचे कायदा आणि सुव्यस्था विभागाचे सहपोलिस आयुक्त होते. रजनीश सेठ हे फोर्स वन महाराष्ट्राचे प्रमुख राहिलेले आहेत. गृह विभागाचे प्रधान सचिव म्हणूनही देखील सेठ यांनी जबाबदारी संभाळलेली आहे. शेठ यांची नुकतीच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली होती.