मुंबई: अनेक लोकांना ईडीच्या कारवाईने धडकी भरवणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आठ तासाच्या वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप असल्याचे विधिमंडळात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जाहीर केले. खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील प्रसारित झालेला व्हिडिओवरून विरोधी पक्षाने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने देखील केली होती; मात्र समाज माध्यमात हे जे व्हिडिओ प्रसारित केले गेले, ते किरीट सोमय्या यांच्या मोबाईलमधील आहे आणि त्यांनी ते प्रसारित केल्याशिवाय इतरांच्या फोनमध्ये त्या व्हिडिओला प्रवेश मिळू कसा शकतो? त्यामुळेच हे व्हिडिओ स्वतः रेकॉर्डिंग करून किरीट सोमय्या यांनी सार्वजनिक डोमेनवर शेअर केल्याची तक्रार अलेक्स इसाक यांनी अंधेरी पोलीस ठाणे येथे केलेली आहे.
सोमय्यांवर गुन्हा दाखल करा: समाज माध्यमांवर किरीट सोमय्या यांचे पॉर्न व्हिडिओ जे प्रसारित झालेले आहेत ते त्यांच्या मोबाईल मधूनच इतरांना पाठवले गेले आहेत. त्यामध्ये या प्रकरणात किरीट सोमय्या यांचा सहभाग आहे आणि अनेक वृत्तवाहिन्यांवर, वेगवेगळ्या समाज माध्यमांवर याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामुळेच अलेक्स इसाक यांनी यासंदर्भात त्यांचे वकील नितीन सातपुते यांच्या माध्यमातून कायदेशीर पद्धतीने अंधेरी पोलीस ठाणे यांच्याकडे तक्रार केलेली आहे. त्यात त्यांनी किरीट सोमैय्या यांच्यावर गुन्हा दाखल करावा, असे तक्रारीत म्हटले आहे.
यांना पाठविली तक्रारीची प्रत: 22 जुलै 2023 रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा अंधेरी, उपायुक्त पोलीस झोन 10 अंधेरी तसेच अंधेरी पोलीस ठाणे, पोलीस आयुक्त मुंबई तसेच ही तक्रार रजिस्टर मुंबई उच्च न्यायालय, रजिस्टर सत्र न्यायालय मुंबई, रजिस्टर सर्वोच्च न्यायालय दिल्ली, मुंबईतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरसीएफ पोलीस ठाणे आणि उपयुक्त मुंबई पोलीस झोन-6 चे हेमराज राजपूत चेंबूर मुंबई यांना या तक्रारीची प्रत पाठवलेली आहे.
'या' कलमांनुसार तक्रार दाखल: यासंदर्भात अलेक्स इसाक यांच्या वतीने कायदेशीर तक्रार दाखल करणारे वकील नितीन सातपुते यांच्याशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, कोणीही जर तो व्हिडिओ पाहिला, तर त्याने तो चॅट पद्धतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे. त्यामुळे कोणालातरी हा व्हिडिओ किरीट सोमय्या यांनी स्वतः आपल्या मोबाईल वरून पाठविला आणि इतरांना तो शेअर केला. त्यामुळेच आयपीसी कलम अंतर्गत 292 आणि 293 तसेच माहिती आणि तंत्रज्ञान कायदा 2000 कलम 67 या अन्वये ही तक्रार दाखल करण्यात आल्याचे सांगितले. आता पोलिसांनी सखोल चौकशी करावी, असे देखील त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा:
- kirit somaiya viral video : राज्यात किरीट सोमय्यांचा आक्षेपार्ह व्हिडिओनंतर संतापाची लाट; पहा व्हिडिओ
- Thackeray Group Protest: किरीट सोमैयांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक; सोमैयांच्या प्रतिमेला 'जोडेमारो आंदोलन'
- Shivsena Agnation Against Kirit Somaiya: किरीट सोमैयांच्या फाशीसाठी 50 हजारांचे बक्षीस; उद्धव ठाकरे गटाचे सोमैयांविरुद्ध आंदोलन