ETV Bharat / state

Aaditya Thackeray Challenge : हिम्मत असेल तर 'या' महानगरपालिकेतील भ्रष्टाचारांची चौकशी करा; आदित्य ठाकरेंचे शिंदे सरकारला आव्हान - मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार

मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचार 'कॅग'च्या अहवालामध्ये उघड झाल्याने राज्याच्या विधानसभेमध्ये यावरून सत्ताधारी पक्षाने जबरदस्त गोंधळ घातला. यावर बोलताना युवा नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे शासनाला आव्हान देत म्हटले की, हिम्मत असेल तर त्यांनी ठाणे, नवी मुंबई, नाशिक, कल्याण-डोंबिवली या महानगरपालिकेतील भ्रष्टाचारांची ही चौकशी करावी.

Aditya Thackeray challenge To Shinde Govt
आदित्य ठाकरेंचे खुले आव्हान
author img

By

Published : Mar 25, 2023, 5:49 PM IST

आमदार आदित्य ठाकरे शिंदे शासनावर टीका करताना

मुंबई: मागील २५ वर्षांपासून महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची सत्ता होती. त्यामुळे हा त्यांचाच भ्रष्टाचार असल्याचा आरोप होत आहे; परंतु हा अहवाल उघडकीस आल्यावर याबाबत आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजप यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आमदार आदित्य ठाकरे शिंदे शासनाला टोला लगावत म्हणाले की, मागील एक वर्षापासून मुंबई सहित २४ महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका झाल्या नाही. हे 'सीएम' म्हणजे 'करप्ट मॅन' असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे. अशा 'करप्ट मॅन'कडून काय अपेक्षा केल्या जाऊ शकतात? हे मुख्यमंत्री भ्रष्टाचारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईला बदनाम करण्याचे हे षड्‌यंत्र आहे. मुंबईच्या संस्था दुसऱ्या राज्यात न्यायच्या, मुंबईचा पैसा दिल्लीला पोहोचवायचा ही सर्व यांची षड्‌यंत्र असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. आम्हाला आमची कामे माहीत आहेत. म्हणून जनतेने आम्हाला २५ वर्षे निवडून दिले, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणले: आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, त्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करावी; पण त्यादरम्यान नगर विकास मंत्री कोण होते? आयुक्त कोण होते? हेसुद्धा लक्षात घ्यावे. मुंबई महानगरपालिकेमधील सॅनिटरी नॅपकिन, फर्निचर घोटाला आम्ही बाहेर काढला असे सांगत, 'लोग काटों से बच बच कर चलते है, हमने तो फूलों से भी जख्म खाये है', असे म्हणत त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर एक उपहासात्मक टोला लगावला आहे.

'एसीबी'ने 'याची' चौकशी करावी: आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर बोलताना भाजप नेते अतुल भातखळकर म्हणाले की, 'कॅग' ही एक स्वायत्त संस्था आहे. उद्धव ठाकरे म्हणजे काही मुंबई, महाराष्ट्र आणि शिवसेना नाही आहे. ३ वर्षांच्या चौकशीमध्ये ११ हजार कोटींचा भ्रष्टाचार समोर आला आहे. यासाठी या प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि 'एसीबी'कडून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा अतुल भातखळकर यांनी केली आहे.

घाबरता कोणाला?, चौकशीला सामोरे जा: कोरोेना काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे हे घराबाहेर पडले नाहीत. आदित्य ठाकरे हे उपनगरचे पालकमंत्री होते. ते किती ठिकाणी हॉस्पिटलला भेटीगाठी द्यायला गेले, हे त्यांनी सांगावे. 'कॅग'ने तुमच्यावर ताशेरे ओढले आहेत तर चौकशीला सामोरे जा. घाबरता कोणाला? भ्रष्टाचार झाला आहे, हे सर्व मुंबईकर जनतेला माहीत आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक पैशाचा हिशेब तुम्हाला द्यावा लागणार आहे, असेही भातखळकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: Sanjay Raut Privilege Motion Case : संजय राऊतांवर ठपका? हक्कभंग समितीचा अहवाल राज्यसभेकडे जाणार; उपसभापतींची माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.