मुंबई : भारतातील चित्रपट निर्माता कलाकार मुश्ताक नडियादवाला याची बायको कोरोना काळात पाकिस्तानला माहेरी गेली. ती परत आलीच नाही. तिच्यासकट दोन्ही मुलांना देखील घेऊन गेली. या संदर्भात पतीने दाखल केलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायाधीश रेवती मोहिते डेरे, न्यायाधीश गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने इंटरपोलला आदेश दिले की, 'लाहोर इस्लामबाद जिथे कुठे असेल तिथला ठाव ठिकाणा मुलांचा शोधून काढा. खात्री करा.'
कोरोना काळापासून बायको मुलांसह पाकिस्तानात : कोरोना महामारीच्या काळात 2020 मध्ये भारतीय कलाकार मुश्ताक नडियादवाला याची बायको आपल्या दोन्ही मुलांसह गेली त्यानंतर ती भारतात परतलीच नाही. त्यामुळे बायको आणि मुलांचा ठाव ठिकाण नवऱ्याला कळला पाहिजे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाला आणि संबंधित यंत्रणांना आदेश देण्याची मागणी करणारी याचिका होती. त्यावर सुनावणी झाली असता इंटरपोलला खंडपीठाने आदेश दिले की, पाकिस्तानातील लाहोर येथील कुटुंब न्यायालय असेल किंवा अजून कुठे असेल तेथील मुलांचा ठाव ठिकाण शोधून काढा. पत्त्याची पडताळणी करा. मुलांच्या सुरक्षितते बाबत प्रतिज्ञापत्र देखील फेब्रुवारी 2024 पर्यंत न्यायालयात सादर करा.
बापासोबत मुलांना भेटू बोलू दिले जात नाही : यासंदर्भात याचिकाकर्त्याच्या वतीने वकील बेनी चॅटर्जी यांनी सांगितले की, '2022 पासून याबाबत पत्नीने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाचे काही पालन केलेलेच नाही. मुलांसोबत बापाला भेटता यावं. यासाठी इंटरनेट व्हाट्सअप कॉलची व्यवस्था करण्याचेही त्यामध्ये सांगितले होते. परंतु बापासोबत मुलांना भेटू बोलू दिले जात नाही. मागील सहा महिने झाले बाप आणि मुलं यांची ऑनलाइन भेट होऊ शकलेली नाही.'
पाकिस्तानात बायको दरवेळी पत्ता बदलते : इंटरपोलच्या वतीने वकील कुलदीप पाटील यांनी यलो कॉर्नर नोटीस पाठवल्याचं सांगितलं. न्यायालयात पत्ता सादर केल्याचंही सांगितलं आणि हा जो पत्ता मिळाला आहे याच ठिकाणी त्या दोन मुलांनी त्यांची आई असू शकते; असं म्हटलं. परंतु यावर याचिकाकर्त्यांच्या वतीने मुद्दा उपस्थित केला की "भारतीय नागरिकाची बायको आपल्या मुलांसह तिथे राहते आणि ती दरवेळेला पत्ता बदलते, त्यामुळे त्याची पडताळणी खात्री केली पाहिजे."
बालकांचा ठाव ठिकाण शोधून काढा : बालकांचा ठाव ठिकाण शोधून काढा न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करा. सर्व पक्षकारांची बाजू ऐकल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने सांगितले की, 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत मुलांचा ठावठिकाणा शोधून काढा. त्यांच्या सुरक्षितते संदर्भात प्रतिज्ञापत्र देखील न्यायालयात दाखल करा. न्यायालयाने याबाबतची सुनावणी 16 फेब्रुवारी 2024 रोजी निश्चित केलेली आहे.
हेही वाचा :