ETV Bharat / state

Womens Day Celebration : अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जागतिक महिला दिवस साजरा - MH Budget Session Womens Day Celebration

जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्वच पक्षाच्या महिला आमदारांनी एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( Womens Day Celebration in Budget Session ) राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde on Womens Day ) यांनी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा सत्कार करत त्यांना देखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

International Women's Day is also celebrated in the budget session maharashtra 2022
अर्थसंकल्पीय अधिवेशनातही जागतिक महिला दिवस साजरा
author img

By

Published : Mar 8, 2022, 5:16 PM IST

मुंबई - जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्वच पक्षाच्या महिला आमदारांनी एकमेकींना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ( Womens Day Celebration in Budget Session ) या दिवसाचे औचित्य साधून महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी विधान भवन परिसरात महिला आमदार तसेच पत्रकार महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde on Womens Day ) यांनी कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलिसांचा सत्कार करत त्यांना देखील जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कोरोना काळात आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून महिला पोलिसांनी समाजासाठी मोठं काम केलं. असेल त्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसाची महिला पोलिसांकडून मदत झाली, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले. विधान भवन परिसरामध्ये महिला पोलिस कर्तव्य बजावत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांनी या सर्व महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा अभिनंदन केलं तर सोबतच महिला पत्रकारांना देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - sanjay Raut on ED : ईडी भाजपची एटीएम मशीन बनली आहे

कुटुंब आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडतात -

देशाच्या महिला या आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत. कर्तव्य बजावतात कुटुंब आणि कर्तव्य अशा दोन्ही जबाबदाऱ्या एकाच वेळी सक्षमपणे आज महिला सर्व क्षेत्रात पार पाडताना दिसतात. महिला लोकप्रतिनिधींना तर घर आणि समाज अशी दोन्ही क्षेत्र सांभाळावी लागतात. त्यामुळे पुरुषांपेक्षा ही सक्षमपणे महिला समाज संभाळू शकतात, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनीही व्यक्त केला.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.