ETV Bharat / state

अल्पवयीन मुली व महिलांचे इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करुन ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला अटक - cyber crime police news

इन्टाग्रामवर बनावट अकाऊंट उघडून अल्पवयीन मुली आणि महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्या गुजरातमधील एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केली आहे. न्यायालयाने आरोपीला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

alfaz jamani arrested
अल्फाज अन्वरली जमानी
author img

By

Published : Sep 9, 2020, 3:31 PM IST

Updated : Sep 9, 2020, 3:42 PM IST

मुंबई- अल्पवयीन मुलींचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवणे तसेच इतर अल्पवयीन मुली व महिलांचे इंस्टाग्राम अकाऊंट हॅक करुन ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाने अटक केलेली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला मिळालेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. या संदर्भात गुजरात मधून अल्फाज अन्वरली जमानी (20) या आरोपीला 5 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेली आहे,अशी माहिती सायबर विभागाच्या पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली आहे.

अल्पवयीन मुली व महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याल अटक

अटक करण्यात आलेल्या आरोपीने स्वतःचे बनावट इंस्टाग्राम अकाऊंट बनवले होते. यामध्ये त्याने स्वतः अल्पवयीन मुलगी असल्याचे भासवून त्याद्वारे अनेक अल्पवयीन मुलींशी व महिलांशी त्याने मैत्री केली होती. मैत्री झाल्यानंतर अल्पवयीन मुलींचे फोटो मागूवून त्यांचे फोटो मोर्फ करून ते फोटो अल्पवयीन मुलींना परत पाठवत होता. या वेळी हेच फोटो इतर इंस्टाग्राम अकाऊंट वर प्रसारित होत असल्याचे सांगत तो त्यांना ब्लॅकमेल करत होता. या दरम्यान अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील फोटो स्वतःकडे हा आरोपी मागून घेत होता. अल्पवयीन मुली व महिलांचे अश्लील फोटो व व्हिडिओ मिळाल्यानंतर त्या फोटोच्या माध्यमातून हा त्यांचे लैंगिक शोषण सुद्धा करू लागला होता.

हेही वाचा-कंगनाच्या घराबाहेर पोलीस फौजफाटा वाढवला; पालिका करणार तोडक कारवाई

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून 4 मोबाईल फोन, हॅक केलेले इंस्टाग्राम अकाऊंट मधील मेसेज, अल्पवयीन मुली व महिलांचे 700 हून अधिक अश्लील फोटो याबरोबरच 17 इंस्टाग्राम अकाऊंट हस्तगत केले आहेत. आरोपीला गुजरात पोलिसांनी अशाच एका प्रकरणात याअगोदरही अटक केलेली होती. मात्र, यातून जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर पुन्हा त्याने असे प्रकार करण्यास सुरुवात केली होती. आरोपीला न्यायालयात हजर केले असता 12 सप्टेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे.

Last Updated : Sep 9, 2020, 3:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.