ETV Bharat / state

परमबीर सिंग यांच्यावर आरोप करणाऱ्या पोलीस निरीक्षकाने मागितली सुरक्षा

भीमराव घाडगे यांनी सुरक्षेसाठी पोलीस महासंचालकाकडे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मी अकोला येथे तैनात आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिवास धोका आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी. माझे कुटुंब कल्याण येथे राहत असून मी एकटा अकोल्यात ड्युटीवर आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांसाठी नेहमीच चिंतेत असतो. त्यामुळे आपण मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी.

parambir shing case update news
परमबीर सिंग
author img

By

Published : May 13, 2021, 12:50 PM IST

मुंबई - पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी स्वतःसाठी आणि कुटुंबीयांसाठी पोलीस सुरक्षेची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वी भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. यासंदर्भातलं पत्र त्यांनी पोलीस महासंचालक, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना लिहिले होते. भीमराव घाडगे हे अकोला येथे तैनात आहेत त्यांचं कुटुंब कल्याण इतर राहते.

भीमराव घाडगे यांनी सुरक्षेसाठी पोलीस महासंचालकाकडे दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मी अकोला येथे तैनात आहे. मला आणि माझ्या कुटुंबीयांच्या जिवास धोका आहे. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा देण्यात यावी. माझे कुटुंब कल्याण येथे राहत असून मी एकटा अकोल्यात ड्युटीवर आहे. त्यामुळे मी माझ्या कुटुंबीयांसाठी नेहमीच चिंतेत असतो. त्यामुळे आपण मला आणि माझ्या कुटुंबीयांना सुरक्षा द्यावी.

भीमराव घाडगे यांनी केला होता आरोप -

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्या रकमेची वेगवेगळ्या माध्यमातून गुंतवणूक केली. परमबीर सिंग यांच्या कुटुंबीयांनी वेगवेगळ्या व्यवसायात त्या पैशांची गुंतवणूक केली, असा धक्कादायक आरोप अकोल्याचे पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केला होता. याबाबत अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - राज्य सरकारने सेलिब्रेटींनाच नोडल ऑफिसर म्हणून नेमण्याचा विचार करावा - मुंबई उच्च न्यायालय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.