मुंबई : कोरोनानंतर रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येण्याच्या तक्रारी वाढल्या ( Complaints of waking up in sleep ) आहेत. झोपेच्या आजारांना आपण सरसकट ‘निद्रानाश’ किंवा ‘इन्सोम्निया’ असे म्हणतो. अनेकजण त्याला हलक्यात (Insomnia increased after Corona ) घेतात. पण हीच कारणे, अनेकदा आरोग्यासाठी धोकादायक ठरत असून श्वासाचे आजार, व्यसने, लठ्ठपणा, हार्मोन्समध्ये बिघाड सह मानसिक स्थितीवर याचा परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.
सात तासांची झोप आवश्यक : झोप ही माणसाची सर्वात प्रिय अशी गोष्ट आहे. रात्रीची किमान सात तासांची झोप आवश्यक ( Seven Hours Of Sleep Essential ) असते. मात्र काही लोकांना रात्री झोप येत नाही तर काही लोकांनी झोपल्यानंतर रात्री वारंवार जाग येते. रात्री झोपल्यानंतर वारंवार जाग येणं हे चांगले लक्षण नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत. आपली बदलती लाईफस्टाईल त्यापैकी आहे. रोजच्या जीवनातील अनेक वाईट सवयींमुळे झोप मोड होते. कोरोनानंतर असे प्रकार वाढीस लागले आहेत. चिडचिडेपणा, पॅनिक अटॅक सह फॅटी लिव्हर ची समस्या देखील अनेकांना उद्धवल्याचे समोर आले आहे. मधुमेही रुग्ण आणि युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा त्रास असलेल्यांना प्रामुख्याने या आजारांशी झगडावे लागत आहे.
नकारार्थी विचार वाढतात : झोप न झाल्याने जड डोके, आकसून गेलेले अंग व मरगळलेले मन अशी अवस्था ( do not ignore insufficient sleep) होईल. मनात विचारांची संख्या वाढते, नकारार्थी विचार वाढतील ( Negative Thoughts Increase ). परिणाम मानसिक थकवा जाणवतो. विसरल्यासारखे होईल. प्रत्येक कामात ते बिघडेल की काय, अशीच शंका येत राहील. मनात तेच तेच विचार येत राहणे. आरोग्यावर याचा परिणाम होऊन दिवसभर तुम्हाला सतत झोप येते. त्यामुळे फॅटी लिव्हर रोग होण्याचा सर्वाधिक धोका असतो. रात्री 1 ते 4 च्या दरम्यान झोपत असताना शरीराला स्वच्छ करण्याचे आणि डिटॉक्सिफायचे काम लिव्हर करते. परंतु, लिव्हरमध्ये फॅट असेल तर डिटॉक्सिफिकेशनसाठी लिव्हरला अधिक एनर्जी लागते. त्यासाठी लिव्हर तुमच्या बॉडीला ट्रिगर करण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला जाग येईल.
शरीराचे तापमान ६० ते ६७ डिग्री : शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण झोपत असताना आपल्या शरीराचे तापमान ६० ते ६७ डिग्री फॅरेनहाइट, म्हणजेच १५ ते १९ डिग्री सेल्सियस इतके असायला हवे. या पेक्षा तापमान कमी असेल, तर थंडीमुळे शरीरातील स्नायू आखडल्याची भावना होते, हातापायांमध्ये क्रॅम्प्स् येतात, किंवा थंडी वाजते आणि झोपमोड होते. जर शरीराचे तापमान १५ ते १९ डिग्री पेक्षा अधिक असेल, तर खूप घाम येणे, एकदम उकडणे, अस्वस्थ होणे असे प्रकार होऊन अचानक जाग येऊन झोपेतून जागे व्हावे लागत आहे.
एकाग्रता कायम राहावी : एकाग्रता कायम राहावी, कामातला - रोजच्या जगण्यातील इंटरेस्ट कायम राहावा, स्मरणशक्ती चांगली काम करावी, असे वाटत असेल तर चांगली व पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. कोरोनानंतर रोजच्या आयुष्यातला तणाव, कामाचा ताण, प्रवासाचा ताण, घरगुती गोष्टींचा भार, नातेसंबंधांतील, समाजातील घटकांमुळे येणारा ताण यामुळे झोपेवर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. मोबाईलसारख्या उपकरणाचा अतिवापर, आहार-विहाराच्या अयोग्य सवयी, व्यसने, व्यायामाचा अभाव अशी कारणेसुद्धा झोप उडवण्यात आपापला हातभार लावत आहेत. या सवयी भविष्यातील आजारांसाठी धोक्याची सूचना आहे. त्यामुळे दुर्लक्ष करू नये. निद्रानाश किंवा झोपेच्या संदर्भातील तक्रारींसाठी डॉक्टर तसेच मानसिक, आरोग्य संदर्भातील तक्रारींसाठी मनोविकारतज्ज्ञ, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट्सची मदत नक्की घ्यावी, असे एएमसीचे अध्यक्ष, फिजिशियनचे डॉ. दिपक बाईद यांनी सांगितले.
तणावामुळे मानसिक परिणाम : झोप न येण्यामागे तणाव हे सर्वात सामान्य कारण असू शकते. जेव्हा तणावात असतो, तेव्हा शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. त्यामुळे, आपले शरिर विश्रांतीच्या स्थितीत राहू शकत नाही आणि मेंदू सक्रिय राहतो. दिवसभर आळस, निरुत्साह, रक्त दाबातील चढउतार, चिडचिडेपणा व नैराश्य वाढणे, विस्मरणाचा अधिक परिणाम जाणवू लागणे, रोजच्या कामात लहान-लहान चुका होणे, पोटाचे विकार, घाबरटपणा, ज्यांना मधुमेह असतो त्यांना रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास अडचणी होणे, केस गळणे, डोळ्यांखाली काळी वर्तुळे येणे, चेहऱ्यावर आणि शारिरिक थकवा जाणवणे, बारीक असणाऱ्यांचे वजन न वाढणे ही लक्षणे दिसतात.
स्लीप एप्निया : स्लीप एप्निया हा एक झोपेचा आजार ( Sleep Apnea ) आहे. यामुळे पुरेशी झोप येत नाही. शिवाय, पुरेशी झोप घेतल्यानंतर ही थकवा जाणवतो. मरगळ येते. रात्री झोपताना वारंवार श्वास घेण्यास त्रास होतो. वारंवार जागे राहावे लागते. त्यामुळे, चांगली झोप येत नाही आणि बराच वेळ झोपूनही दुसऱ्या दिवशी तुम्हाला आळस येतो. कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही.
डिहायड्रेशन : व्यस्त वेळापत्रकामुळे अनेकदा दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिणे ज्यूस, कोल्ड्रिंक्स घेण्यास विसरतो. पाणी पिण्याच्या बाबतीत आपल्या निष्काळजीपणामुळे आपला थकवाही वाढतो. त्यामुळे, डोकेदुखीची शक्यता वाढते. तुमच्या दैनंदिन कामावर याचा विपरित परिणाम होतो.
इनसोम्निया : रात्री झोप न येणे, वारंवार जाग येणे, रात्री झोपल्यानंतर ही पुन्हा झोप लागणे, सकाळी लवकर जाग येणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर ही निद्रानाशची समस्या असू ( Insomnia ) शकते. निद्रानाश हा झोपेचा आजार आहे. ज्यामुळे, तुम्हाला रात्रीची झोप कमी लागते आणि दिवसभर थकवा जाणवतो.
कॉफीचे अधिक प्रमाणात सेवन : कॉफीचे अतिप्रमाणात सेवन केल्यास (Excessive Coffee Consumption ) त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. कॉफीतील कॅफिनच्या प्रभावामुळे शरीरातील एड्रिनल हार्मोन वाढते, ज्यामुळे आपले शरिर पुन्हा सक्रिय आणि उत्साही बनते. जसजसा कॉफीचा प्रभाव आपल्या शरीरातून कमी होऊ लागतो, तेव्हा अचानक आपल्याला पुन्हा थकवा जाणवू लागतो. त्यामुळे चहा-कॉफीचे सेवन हे अधिक प्रमाणात करू नका.
झोपण्यापूर्वी फोनचा वापर करणे : फोनमधून निघणारा आर्टिफिशिअल प्रकाश आपल्या मेंदूला सिग्नल देतो की त्याला जागृत राहण्याची गरज आहे. हा प्रकाश आपल्या झोपेमध्ये अडथळे आणतो. त्यामुळे, रात्री झोप कमी लागते आणि नंतर दिवसभर थकवा जाणवतो.
बिघडलेली जीवनशैली : दिवसभर बसून काम करत असाल किंवा कोणताही डेस्क जॉब करत असाल तर हे कारण देखील तुमच्या झोपेवर परिणाम करणारे आहे. जेव्हा तुम्ही दिवसभर निष्क्रिय असाल किंवा खूप कमी हालचाल करता. त्यामुळे, तुम्हाला रात्री चांगली झोप येत नाही. तसेच, तुम्हाला दिवसभर सूस्ती आणि थकवा जाणवतो. जर तुम्ही व्यायाम करत असाल, तर तुम्हाला व्यायाम केल्यानंतर रात्रीची झोप चांगली आल्याचे जाणवेल.