मुंबई: मानवजातील समोरील पुढची आव्हाने आणि विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रासमोरच्या अडचणी पाहता त्यामध्ये संशोधन आणि विकास होणे जरुरी आहे. त्यासाठी आयआयटीचे नामवंत विद्यार्थी नंदन निलकेणी यांनी आधीचे 85 कोटी रुपये आणि आता 315 कोटी रुपये असे एकत्रित 400 कोटी रुपयांची देणगी आज दिली आहे. त्या संदर्भातला करार नुकताच आय आयटी मुंबई सोबत करण्यात आला. ही देशातील शिक्षण क्षेत्रीतील सर्वात मोठी देणगी मानली जात आहे.
नंदन निलंकेणी आयआयटीचे नामवंत विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी आहेत. आधारच्या संदर्भातील मूलभूत तंत्रज्ञानात्मक मांडणी करण्यामध्ये नंदन निलकेणी यांचा फार मोठा वाटा आहे. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी युआयडीएआय अर्थात आधारच्या संदर्भात सर्व प्रकल्पाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. अशा अनेक भारत सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये त्यांनी योगदान दिले. तसेच त्यांनी त्यांच्या कंपनीच्यावतीने सीएसआर प्रकल्प असेल किंवा इतर प्रकल्प असेल त्या माध्यमातून भरीव देणगी दिलेली आहे.
-
To mark 50 years of my association with @iitbombay, I am donating ₹315 crores to my alma mater. I am grateful to be able to do this🙏
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Full release: https://t.co/q6rvuMf2jn pic.twitter.com/f8OEfZ1UTq
">To mark 50 years of my association with @iitbombay, I am donating ₹315 crores to my alma mater. I am grateful to be able to do this🙏
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 20, 2023
Full release: https://t.co/q6rvuMf2jn pic.twitter.com/f8OEfZ1UTqTo mark 50 years of my association with @iitbombay, I am donating ₹315 crores to my alma mater. I am grateful to be able to do this🙏
— Nandan Nilekani (@NandanNilekani) June 20, 2023
Full release: https://t.co/q6rvuMf2jn pic.twitter.com/f8OEfZ1UTq
जीवनाचा पाया आयआयटी मुंबईमुळे तयार- नंदन निलकेणी हे इन्फोसिस या सॉफ्टवेअर कंपनीचे सहसंस्थापक देखील आहेत. त्यांनी आतापर्यंत सॉफ्टवेअर संगणक तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे. ते आयआयटीचे गुणी विद्यार्थी आहेत. आयआयटीमधील भविष्यातील विद्यार्थ्यांना संशोधन आणि विकास करण्यासाठी म्हणून त्यांनी 400 कोटी रुपये देणगी देऊन एक महत्त्वाचा करार केला. त्या संदर्भात त्यांनी करार करताना म्हटले आहे की, मला जे आयआयटी मुंबईमध्ये शिकायला मिळाले. त्याची परतफेड मी अल्पशा रुपाने करत आहे. मला जे मिळालेले शिक्षण आहे. हे महान आहे. माझ्या जीवनाचा पाया आयआयटी मुंबईमुळे तयार झाला आहे. त्याला आज 50 वर्ष पूर्ण होत आहे.
नंदन निलंकेणी हे आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे भारतातील सॉफ्टवेअर तंत्रज्ञानामधील योगदान सर्वपरिचित आहे. त्यांच्या या आजच्या योगदानामुळे आयआयटीच्या भविष्यातील विद्यार्थ्यांच्या पुढील आणि मानव जातील समोरील आव्हानाना भिडण्याची सक्षमता यामुळे विद्यार्थ्यांना येईल मदतच होईल- आयआयटी मुंबईचे संचालक चौधरी