ETV Bharat / state

राज्यपालांच्या दौऱ्याची शेतकरी मोर्चाला पूर्वकल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण - Governor Bhagat Singh Koshyari News

राज्यपाल आज गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाही याबाबत शेतकरी शिष्टमंडळाला आधीच पूर्वकल्पना दिल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
author img

By

Published : Jan 25, 2021, 6:36 PM IST

मुंबई - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याच्या राज्यपाल पदाचा अतिर‍िक्त कार्यभार आहे. आज ते गोवा विधान सभेच्या प्रथम सत्राला संबोध‍ित करणार असल्याने शेतकरी शिष्टमंडळास भेटू शकणार नाही याबाबत शिष्टमंडळाला आधीच पूर्वकल्पना दिल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा - हे सरकार भांडवलदारांचे गुलाम - बाळासाहेब थोरात

भेट होऊ शकणार नाही, याबाबत आधीच पूर्वकल्पना दिल्याने राज्यपालांनी शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे असल्याचेही राजभवनातून स्पष्ट करण्यात आले. संयुक्त शेतकरी मोर्चाचे धनजंय शिंदे यांना २२ जानेवारी रोजी दुरध्वनीव्दारे, तसेच निमंत्रक प्रकाश रेड्डी यांना २४ जानेवारी रोजी लेखी पत्राव्दारे राज्यपालांच्या अनुपलब्धतेबद्दल कळविण्यात आले होते. शिंदे यांनी व्हॉट्सअ‌ॅप संदेशाव्दारे निरोप मिळाल्याचे मान्य केले होते. तसेच, रेड्डी यांनी या बाबतचे लेखी पत्र २४ जानेवारी रोजी प्राप्त झाले होते. त्यामुळे, शिष्टमंडळाला भेटीची वेळ देऊन भेट दिली नाही, हे वृत्त चुकीचे आहे, असे राजभवनातून स्पष्ट करण्यात आले.

Governor Bhagat Singh Koshyari News
पत्र

राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार शिष्टमंडळाकडून आज सायंकाळी पाच वाजता निवेदन स्विकारतील, असे देखिल धंनजय शिंदे यांना पूर्वीच कळविण्यात आले होते. व तसे स्विकृत असल्याबद्दल त्यांनी संदेशाव्दारे कळविले होते. असेही सांगण्यात आले.

हेही वाचा - येस बँक घोटाळा प्रकरणी राणा कपूर यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.