मुंबई - दिवाळी तोंडावर आली असल्याने मिठाईची आवक वाढली ( sweets flow increased during Diwali ) आहे. स्वादिष्ट मिठाई पासून ड्रायफूटला ग्राहकांची सर्वाधिक पसंती मिळत ( Dry fruit most preferred by consumers ) आहे. करंडा, टोपली, बटवा अशा आकारात सजावट केलेले ड्रायफ्रूट बाजारपेठांमध्ये ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. पिस्ता, ऑरेंज, पायनापल, गुलकंद, बेसनाचे लाडू, गुलाबजाम, काजू कतली, चॉकलेट्स, ड्रायफ्रूट मिठाईंचा यात समावेश आहे. एकीकडे सर्व सामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यामुळे महागाईचा इफेक्ट मिठाई व ड्रायफ्रुटच्या भावावर होत असला तरी यंदा मिठाई विक्रेत्यांना सुगीचे दिवस आले आहेत, असे मिठाई विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी - दिवाळीत मिठाईची मोठ्या प्रमाणात खरेदी केली ( Bulk purchase of sweets during Diwali ) जाते. दिवाळी आली की, ग्राहकांची पावले मिठाई दुकानांकडे वळतात. गतवर्षी कोरोनामुळे निर्बंध असल्याने मिठाई दुकानात ग्राहकांची तुरळक गर्दी होती. परिणामी, मिठाई विक्रीचा गोडवा हरवला होता. यंदा कोरोना ओसरल्याने दिवाळी उत्साही, आनंदी आणि कोरोनामुक्त वातावरणात साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बाजारपेठ सजू लागल्या आहेत. अनेक मिठाईच्या दुकानांमध्ये आकर्षक बॉक्स, विविधांनी मिठाईने गच्च भरलेल्या आहेत. दिवाळी आणि गोडवा असे समीकरणच झाल्याने घराघरांत गोड पदार्थ तयार केले जातात. मात्र, मधुमेह असलेल्यांना मिठाईची चव चाखता येत नाही म्हणून बाजारात खास मधुमेहींसाठी शुगर फ्री मिठाई ( Sugar free sweets for diabetics ) मोठ्या प्रमाणात आली आहे. ही मिठाई सामान्यांच्या पसंतीस उतरत आहेत. स्थानिक मिठाईच्या जोडीलाच अहमदाबाद, इंदूरहून मिठाई शहरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहे. मिठाईत पाव, अर्धा, एक किलोचे पॅक बाजारात आले आहेत.
सुकामेव्याला ही मागणी - दिवाळीत फराळाबरोबर नातेवाइकांना मिठाई, ड्रायफ्रूटस, लहान मुलांना चॉकलेट देण्याची प्रथा वाढत आहे. त्यामुळे मिक्स मिठाई सह विविध प्रकारचे सुकामेवा, सजवण्यासाठी आकर्षक पेट्या, विविध कंपन्यांची गिफ्ट बॉक्स मिठाईच्या दुकानात सज्ज झाल्या आहेत. दिवसागणिक वाढत्या महागाईने सर्व सामन्यांचे बजेट कोलमडले असले तरी काजूच्या मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. बदाम, पिस्ता, मनुके, अंजीर, किसमिसलाही चांगली मागणी आहे. मिठाई, ड्रायफ्रूटप्रमाणेच चॉकलेट पॅकला मिळत असलेला प्रतिसाद चांगला आहे, असे महात्मा फुले मंडईतील सुकामेवा विक्रेते आणि स्वस्तिक चॉकलेटचे प्रो.प्रा. प्रतिक जुंदरे यांनी यांनी सांगितले. करंडा, टोपली, बटवा अशा आकारात सजावट केलेले ड्रायफ्रूट अगदी दीडशे ते ३००० रूपयांपर्यंत आकर्षक बॉक्समध्ये उपलब्ध आहेत, असे ते म्हणाले.
यंदा दिवाळी चांगली जाईल - विविध प्रकारच्या उत्कृष्ट मिठाई आहेत. मिठाई विक्रीचा १९३६ पासून आम्ही व्यवसाय करत आहोत. हलवा मिठाई ही आमची स्पेशालिटी आहे. माहिम हलवा, आईस हलवा, सॅन्डविच हलवा, पेपर हलवा, पॉज हलवा, चिकनावाला हलवा जो कराची हलवा नावाने ओळखला जातो. काजू कत्री, थंडाई कत्री, केसर कत्री, चॉकलेट कत्री मिठाई उपलब्ध आहेत. कमीत कमी अकराशेपासून दीड हजार रुपयांपर्यंत हलवा आणि १७०० पासून ५ हजारपर्यंत काजू कत्रीचे दर आहेत. कोरोनानंतर मिठाईला चांगली मागणी आहे. लोकांमधील भीती ही दूर झाली आहे. दिवाळी यंदा आनंदी आणि भरभराटीची जाईल, असे झवेरी बाजार येथील सुप्रसिध्द मोहनलाल मिठाईवाले अल्पेश शर्मा यांनी सांगितले.
काजू कतली दर - अंजीर काजू कतली - १५०० रुपये प्रति किलो, केसर काजू कतली- १२४० रुपये प्रति किलो, काजू कतली - ११८० रुपये प्रति किलो, थंडाई केसर कतली - १२४० रुपये प्रति किलो, चॉकलेट काजू कतली - १२२० रुपये प्रति किलो.
हलव्याचे दर - मोहिनी हलवा - १०४० रुपये प्रति किलो, किस्मत हलवा - १००० रुपये प्रति किलो, अंजीर हलवा - १०४० रुपये प्रति किलो, गोल्डन हलवा - १००० रुपये प्रति किलो, आईस हलवा - ९८० रुपये प्रति किलो, गुलाब हलवा - १००० रुपये किलो