ETV Bharat / state

Tata Mumbai Marathon : लागा तयारीला : टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये आंतरराष्ट्रीय धावपटूबरोबर भारतीय धावपटूतही रंगणार चुरस - आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू

मुंबई मॅरेथॉन या स्पर्धेत देशातील धावपटूंसोबत आंतरराष्ट्रीय धावपटूही सहभागी होतात. यावर्षी ही स्पर्धा 15 जानेवारीला मुंबईत होत आहे. त्यामुळे या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केनिया आणि इथोपिया येथील स्पर्धकांचा बोलबाला राहिला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्पर्धांसोबत देशातील धावपटूंची चांगलीच चुरस रंगणार आहे.

Mumbai Marathon
आंतरराष्ट्रीय धावपटू
author img

By

Published : Jan 13, 2023, 8:21 PM IST

मुंबई - आशियातील सर्वात मोठी प्रतिष्ठित १८ वी टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा येत्या रविवारी १५ जानेवारीला मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू आपले नशीब आजमावणार आहेत. आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास पाहता केनिया व इथोपिया या देशातील स्पर्धकांचा बोलबाला राहिला आहे. तरी भारतीय स्पर्धक सुद्धा या शर्यतीत जोमाने शर्तीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

केनिया व इथोपिया धावपटूंचा दरारा २००४ साली मुंबई मॅरेथॉनला सुरुवात झाली होती. त्यानंतर पाहता पाहता १८ वी मॅरेथॉन येत्या रविवारी होत आहे. मागील दोन वर्ष करोनाचे सावट असल्याने ही स्पर्धा झाली नव्हती. परंतु यंदा या स्पर्धेतील स्पर्धकांचा उत्साह मोठ्या प्रमाणात दिसत आहे. तब्बल ५५ हजार स्पर्धकांनी या स्पर्धेच्या विविध कॅटेगिरीमध्ये आपला सहभाग नोंदवला आहे. एलिट पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत आतापर्यंत इथोपिया व केनिया या स्पर्धकांचा बोलबाला राहिला असून आतापर्यंत पहिल्या दहा विजेत्या स्पर्धकांमध्ये या देशातील स्पर्धकांनीच आपले नाव कोरले आहे.

विजेता डेरारा हूरिसा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज सन २०२० रोजी एलीट पूर्ण मॅरेथॉनचा विजेता डेरारा हूरिसा हा यंदा सुद्धा या मॅरेथॉनसाठी सज्ज झाला असून तो मुंबईत दाखल झाला आहे. २ तास ८ मिनिटे व ९ सेकंद हा त्याचा वैयक्तिक सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड असून यंदा तो हा रेकॉर्ड तोडण्याच्या तयारीत आहे. त्याच्याबरोबरच अयेले अॅबशेरो हा धावपटू त्याला टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा २ तास ८ मिनिटे व २० सेकंद इतका असून २०२० च्या मॅरेथॉनमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता. यांच्याबरोबर हायले लेमी हा सुद्धा स्पर्धेत असून त्याचा वैयक्तिक रेकॉर्ड हा २ तास ४ मिनिटे ३३ सेकंद इतका आहे. तो गोल्ड लेबल विनर सुद्धा आहे. लेमिने आतापर्यंत ७ वेळा पहिल्या क्रमांकावर बक्षीस पटकावली आहेत.

बुगाथा, रावत की गोपी? आंतरराष्ट्रीय धावपटूंबरोबर भारतीय धावपटू सुद्धा या मॅरेथॉनसाठी सज्ज झाले असून पूर्ण मॅरेथॉनमध्ये २०२० चा विजेता शिणू बुगाथा हा त्याच्या वैयक्तिक टाइमिंग २ तास १८ मिनिटे ४४ सेकंद चा रेकॉर्ड तोडण्यासाठी सज्ज झाला आहे. बुगाथा बरोबर नितेंद्र रावत व गोपी थोनाकल हे स्पर्धक सुद्धा या स्पर्धेत सहभागी होत असून नितेंद्र रावत याने सन २०१६ रोजी २ तास १५ मिनिटे ४८ सेकंद हा राष्ट्रीय रेकॉर्ड नोंदवला होता व यंदा तो श्रीनु बुगाथाला मागे टाकण्याच्या तयारीत आहे.

शेरॉन, तनुईसोबत सुधा सिंग ही शर्यतीत महिलांमध्ये एलिट स्पर्धेत केनियाची धावपटू शेरॉन चेरोप तिचा वैयक्तिक रेकॉर्ड २ तास २२ मिनिटे २८ सेकंद आहे. तिच्याबरोबर केनियाचीच रोदह तनुई ही धावपटूसुद्धा सहभागी झाली असून २ तास २६ मिनिटे ४६ सेकंद या वैयक्तिक रेकॉर्डसह ती धावणार आहे. त्याचबरोबर वर्कनेश अलमु इथोपियाची धावपटू २ तास २४ मिनिटे ४२ सेकंद वैयक्तिक रेकॉर्डसह तो रेकॉर्ड तोडण्यासाठी या स्पर्धेत सहभागी झाली असून या तिघांमधील एक स्पर्धक पहिल्या क्रमांकावर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भारतीय महिलांमध्ये सुधा सिंग अव्वल? भारतीय महिलांमध्ये सन २०१८-१९-२० सलग तीन वर्षे विजेती सुधा सिंग ही २ तास ४५ मिनिटे ३० सेकंद या रेकॉर्डसह विजेती राहिली आहे. परंतु २०१९ रोजी तिचा वैयक्तिक रेकॉर्ड हा २ तास ३४ मिनिटे ५६ सेकंद इतका होता. त्याचबरोबर ज्योती गवते हिचा २ तास ५० मिनिटे ५३ सेकंद हा रेकॉर्ड असून ती सुद्धा मुंबई मॅरेथॉनसाठी सज्ज झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.