ETV Bharat / state

INDIA meeting PC : देशात लोकशाही टिकवण्यासाठी इंडिया आघाडीची घोडदौड - उद्धव ठाकरे - प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद

इंडिया आघाडीची बैठक उद्या आणि परवा मुंबईत होत आहे. त्या पार्श्वभूमिवर या बैठकीचे संयोजक महाराष्ट्रातील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

INDIA meeting PC
INDIA meeting PC
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 30, 2023, 4:30 PM IST

Updated : Aug 30, 2023, 4:46 PM IST

मुंबई - 'इंडिया' (INDIA) जसजसा पुढे जाईल तसतशी महागाई कमी-कमी होत जाईल. नऊ वर्षात रक्षाबंधन झालं नाही का, मग आताच गॅसदर कमी करण्याची गरजच काय. तर 'ये जनता है. सबकुछ जानती है' असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. आता निवडणुका आहेत. त्यामुळे त्यांना रक्षाबंधन आणि बहिणी आठवल्या, असा टोला शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. इंडिया आघाडीत वंचित बहुजन आघाडी नाही, मात्र त्यांना या आघाडीत समाविष्ट व्हायचं असेल तर त्यांना विचारावे लागेल असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

आम्ही भ्रष्टाचाराविरोधात लढणार आहोत. चीनचं अरुणाचल लडाखवर अतिक्रमण झालं आहे. याचा जाब विचारला पाहिजे. यातून देशाची सुटका करायची आहे. या बैठकीला ६ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत, असं संजय राऊत यांनी सांगितलं. लालू यादव, फारुख अब्दुल्ला, ममता बॅनर्जी यांचं आगमन झालं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या संस्कृतीनुसार आलेल्या नेत्यांचं स्वागत करण्यात आलं. तसंच मुख्यमंत्री केजरीवाल आणि हेमंत सोरेन उद्या येणार आहेत, असंही ते म्हणाले.

  • #WATCH | "We're very happy that INDIA alliance meeting is going to take place in Maharashtra...in Bengaluru, we were 26 (parties), here it has become 28 (parties)...jaise INDIA badhega, waise hi China peeche hatega", says Maharashtra Congress chief Nana Patole pic.twitter.com/U7xVHyH4CW

    — ANI (@ANI) August 30, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावेळी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होतेय याचा आनंद असल्याचं सांगितलं. अरुणाचलप्रदेशमध्ये चीन घुसलं आहे. त्यावर सरकार काहीच बोलत नाही असा आरोप पटोले यांनी केला. यावेळी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या आघाडीत २८ राजकीय पक्ष असल्याचं स्पष्ट केलं. त्यामध्ये वाढ होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. इंडिया आघाडी शाहू-फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जाणार असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्रानं देशाचं नेतृत्व केलंय. या संघटनेत ११ मुख्यंमत्री सामिल आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

पक्षातून फुटून गेलेल्यांना जनता धडा शिकवेल असं यावेळी शरद पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. तसंच मोदींनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर बोट ठेवलं होतं. त्यावरील प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार यांनी सांगितलं की, नुसते आरोप करुन चालणार नाही. जर हिंमत असेल तर चौकशी करा आणि आरोप सिद्ध करुन दाखवा असं आव्हानही पवारांनी यावेळी केंद्रसरकार आणि मोदींना केलं.

हेही वाचा...

  1. INDIA meeting in Mumbai : 'इंडिया' च्या बैठकीत काय असणार अजेंडा? लालूप्रसाद यादव यांनी दिली स्पष्ट माहिती
  2. Sanjay Raut On Eknath Shinde : अत्यंत लाचार मुख्यमंत्री सत्तेवर बसवला; नीती आयोगाच्या बैठकीतील ठरावावरुन संजय राऊत यांचा संताप
  3. INDIA meeting in Mumbai: एकनाथ शिंदे यांच्यासह उद्धव ठाकरेही करणार 31 ऑगस्टला डिनर डिप्लोमसी, राजकारणात कोण ठरणार वरचढ?

Last Updated : Aug 30, 2023, 4:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.