ETV Bharat / state

Cyber Crime Cases : सायबर गुन्ह्यात भारत अव्वल; 68 टक्के युजर्स पडले बळी - महाराष्ट्रातील सायबर क्राईमच्या घटना

भारतात मोदी सरकार आले आणि त्यानंतर नोटाबंदीचा मोठा निर्णय घेण्यात आला. नोटाबंदीच्या निर्णयानंतर भारत डिजिटलायझेशनच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. त्यामुळे बऱ्याच भारतीयांचे व्यवहार डिजिटल स्वरूपात होऊ लागले. सध्या 50% हून जास्त इंटरनेटचा वापर हा भारतात केला जातो. दरम्यान, सायबर गुन्ह्यांमध्ये भारत हा जगात अव्वल असून, जळपास 68 टक्के युजर्स हे सायबर गुन्ह्याला बळी पडले आहेत, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

सायबर क्राईमच्या घटनांत जगात भारत पुढे
सायबर क्राईमच्या घटनांत जगात भारत पुढे
author img

By

Published : Apr 4, 2023, 7:35 PM IST

Updated : Apr 4, 2023, 7:45 PM IST

माहिती देताना सायबर तज्ञ

मुंबई : अमेरिका, न्यूझीलंडसारख्या देशात इंटरनेटचा वापर कमी असून, त्याच्या तुलनेत 50% हून जास्त इंटरनेटचा वापर हा भारतात केला जातो. कारण अमेरिका आणि न्यूझीलंडसारख्या परदेशात लोकसंख्या कमी असून, भारतात लोकसंख्या जास्त आहे. त्यामुळे इंटरनेट युजर्सही भारतात अधिक असल्याने सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सायबर एक्स्पर्ट रितेश भाटिया यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले आहे. दरम्यान, भारतासह संपूर्ण जग कोविडच्या विळख्यात अडकले. कोविडदरम्यान देखील अनेकांनी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर सुरू केले. याचाच फायदा मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारांना देखील झाला. जसे डिजिटलायझेशन वाढू लागले आहेत. तसेच, सायबर गुन्हे देखील वाढू लागले आहेत. दोन महिन्यांत देशात ६८ टक्के यूझर्स विविध सायबर गुन्ह्यांचे बळी ठरले आहेत.

तुम्ही सायबर क्राईमला बळी पडू शकता : कोविडदरम्यान आणि कोविडनंतर देशात ऑनलाईन सेवांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. मोबाईल इंटरनेटचा वापर टाईमपासून आणि सोशल मीडियासाठी केला जायचा. तो कोविडनंतर काही व्यवहारांसाठी सोपा आणि सोयीचा देखील झाला. मात्र, दुसरीकडे सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वेगाने भरमसाठ वाढ झाली आहे. याचाच अर्थ असा की, इंटरनेट माध्यम हे असे आहे सेफ टू युज अँड अन्सेफ टू मिसयुज. खूप सतर्क राहून, इंटरनेटच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार अन्य गोष्टी करणे आवश्यक आहे. नाहीतर तुम्ही सायबर क्राईमला बळी पडू शकता असही ते म्हणाले आहेत.

देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रात : चिंतेची बाब म्हणजे सायबर क्राइम आणि त्याला बळी पडलेल्यांमध्ये जगात भारतीयांचे प्रमाण सर्वाधिक आहे. भारतात 68 टक्के यूझर्स डिसेंबर 2022 पर्यंत वेगवेगळ्या कारणांनी सायबर गुन्ह्याला बळी पडले आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर 2022 दरम्यानच्या स्टॅटिस्टाच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. सायबर वर्ल्डद्वारे होणारा पाठलाग अर्थात सायबर स्टॉकिंगमध्ये महाराष्ट्र (2021)मध्ये देशात पहिल्या क्रमांकावर होता. देशभरात सर्वाधिक प्रकरणे महाराष्ट्रातून उघडकीस आली होती. त्याचबरोबर भारतामागोमाग अमेरिकेत 49 टक्के सायबर क्राईमचे प्रमाण आहे. तर, जपानमध्ये 21 टक्के, जर्मनीत 30टक्के, इंग्लंड आणि फ्रान्समध्ये 33 टक्के आणि न्युझीलँडमध्ये 38 टक्के इतके सायबर क्राईमचे प्रमाण आहे असही ते म्हणाले आहेत.

49% नागरिक सायबर क्राईमला बळी पडले : महाराष्ट्रात आक्षेपार्ह डाटा व्हायलर, ब्लॅकमेलिंग, ऑनलाइन आर्थिक फसवणूक, लॉटरी घोटाळे, लैंगिक छळ, बँक लोन फ्रॉड सारख्या बँकिंगशी संबंधित गुन्ह्यांचे प्रमाण लक्षनीय आहे. कोविडनंतर वाढत्या कॅशलेश व्यवहारांनंतर सायबर क्राईमचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अमेरिका अशा सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे 49% नागरिक सायबर क्राईमला बळी पडले असल्याची माहिती या सर्वेक्षणातून मिळाली आहे.

हेही वाचा : MP Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या जन्मतारखा दोन असल्याचा ठाकरे गटाचा आरोप

Last Updated : Apr 4, 2023, 7:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.