ETV Bharat / state

G20 SuG20 Summit : G20 परिषद म्हणजे काय रे भाऊ?; वाचा सविस्तर... - G20 परिषद

G20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे ( India holds the presidency of the G20 summit ) आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे.

G20 Summit
G20 परिषद
author img

By

Published : Dec 12, 2022, 9:48 PM IST

मुंबई: देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर असलेले मुंबई शहर G20 परिषदेनिमित्त ( G20 Summit ) येणाऱ्या प्रतिनिधींच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. G20 परिषदेचे सन 2023 चे अध्यक्षपद भारताकडे आहे. यानिमित्त महाराष्ट्राची राजधानी मुंबईसह नागपूर, पुणे आणि औरंगाबाद येथे विविध बैठका होणार आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईत 12 ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीत विविध देशांचे प्रतिनिधी येत आहेत.

परिषदेसाठी जय्यत तयारी: या पार्श्वभूमीवर मुंबईत प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. रात्री दिव्यांच्या प्रकाशात मरीन ड्राइव्ह परिसर उजळून निघतो. या भागात G२० परिषदेनिमित्त येणाऱ्या प्रतिनिधींचे मुंबईत स्वागत आहे, अशा आशयाचे फलक दिसून येत आहेत. ‘वसुधैव कुटुंबकम', ‘एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य' या आशयाचे घोषवाक्य लक्ष वेधून घेत आहेत. या फलकांवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, एलिफंटा गुंफा, फ्लोरा फाऊंटन, हॉटेल ताज, वांद्रे-वरळी सी लिंक, वारली चित्रशैलीची छायाचित्रे रंगसंगतीत दिसून येत आहेत. याशिवाय लोकशाहीची मातृभूमी असलेला देश आहे, G20 परिषदेचा यजमान देश, मोठी जबाबदारी, मोठी महत्त्वाकांक्षा अशी घोषवाक्येही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

G20 राष्ट्रगट म्हणजे काय? तर G20 म्हणजे ग्रुप ऑफ ट्वेन्टी. हा जगातल्या प्रमुख विकसित आणि विकसनशील देशांचा राष्ट्रगट आहे. 1999 साली या राष्ट्रगटाची स्थापना करण्यात आली होती. पूर्व आशिया आणि आग्नेय आशियात 1997 साली आलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर G20 गट उदयास आला. अशा एखाद्या जागतिक आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी प्रमुख देशांनी एकत्र येऊन प्रयत्न करावेत हा त्यामागचा हेतू होता. सुरुवातीला केवळ या देशांचे अर्थमंत्री आणि तिथल्या केंद्रीय बँकांचे गव्हर्नर एकत्र येऊन आर्थिक प्रश्नांवर चर्चा करायचे. 2008 च्या आर्थिक संकटानंतर या देशांचे राष्ट्रप्रमुख दरवर्षातून एकदा G20 लीडर्स समिट म्हणजे राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेत सहभागी होऊ लागले.

G20 मध्ये कोणाचा सहभाग?: G-20 राष्ट्रगटात भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रांस, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका अशा 20 देशांचा समावेश आहे. युरोपियन युनियन ही संघटना या राष्ट्रगटातला विसावा सदस्य आहे. त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड बँक अशा आंततराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख तसंच काही देश पाहुणे म्हणून शिखर परिषदेत सहभागी होतात.

G20 राष्ट्रगट महत्त्वाचा का आहे?: जगातली 60 टक्के लोकसंख्या G20 राष्ट्रांमध्ये राहते. जागाच्या एकूण जीडीपीच्या 85 टक्के जीडीपी या देशांतून येतं.जागतिक व्यापारातील 75 टक्क्यांहून अधिक व्यापार G20 देशांत एकवटला आहे. साहजिकच या राष्ट्रगटाचे काम अतिशय महत्त्वाचे ठरते. G20 हे G7 या औद्योगिक देशांच्या राष्ट्रगटाचं विस्तारीत रूप मानले जाते. विकसनशील आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांना सामावून घेऊन जगाच्या अर्थव्यवस्थेला स्थिरता देणं हा या गटाचा उद्देश आहे.

G20 अध्यक्षपद म्हणजे काय?: संयुक्त राष्ट्रांचे जसे न्यूयॉर्कमध्ये एक कार्यालय आहे, तसे G20 देशांचे कायमस्वरूपी कार्यालय किंवा सचिवालय नाही. अजेंडा आणि समन्वय साधण्याचे काम G20 देशांचे प्रतिनिधी करतात ज्यांना शेरपा म्हणून ओळखले जाते.
दरवर्षी एका देशाकडे G20चे अध्यक्षपद येते. यालाच G20 प्रेसिडंसी म्हणतात. प्रत्येक प्रेसिडंसीच्या शेवटी G20 राष्ट्रगटाची बैठक होते आणि कारभार पुढच्या अध्यक्षांवर सोपवला जातो. G20 चे विद्यमान अध्यक्ष आधीचे आणि पुढचे अध्यक्ष राष्ट्र यांच्या मदतीने कारभार चालवातात.

G-20 बैठकीत कुठल्या मुद्द्यांवर भर?: सर्वात कमी विकसित देश, बेट राष्ट्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मुंबईत G-20 बैठक होणार असून महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, डिजिटल परिवर्तन आणि फक्त हरित संक्रमणे ही प्रमुख उद्दिष्टे त्यासाठी असणार आहेत. जागतिक निर्णय संबंधांमधील विकसनशील देशांनी अशी रणनीती तयार करणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी 2000 चा अजेंडा आणि 2015 मध्ये त्याची उद्दिष्टे स्वीकारून, DWG ने विकासाच्या संरेखनाला संवर्धन केले आहे. संपूर्ण G-20 कार्यप्रवाहांमध्ये विकासविषयक समस्यांचे प्रोफाइल वाढवून, संयुक्त राष्ट्रांचे शाश्वत विकास उद्दिष्टे (SDGs) साध्य करण्याच्या प्रगतीला गती देण्यावर भारत भर देईल, तज्ज्ञांच्या मते, वित्तपुरवठा महिलांच्या नेतृत्वाखालील विकास, डिजिटल परिवर्तने आणि फक्त हरित संक्रमणे यांसारख्या SDGs वर गुणक प्रभाव उत्प्रेरित करू शकतील अशा परिवर्तनशील क्षेत्रांवर आणि संक्रमणांवर भर दिला जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.