मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'वारू' रोखण्यासाठी एकत्र आलेल्या इंडियाच्या घटक पक्षाची पुढील बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक मुंबईत 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान पार पडणार आहे. देशातील सगळे विरोधक आगामी निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी या बैठकीत रणनीती आखणार असल्याची माहितीही शिवसेना खा. संजय राऊत यांनी यावेळी दिली आहे.
शरद पवार, उद्धव ठाकरेंची भूमिका ठरणार महत्वाची : विरोधकांच्या 26 पक्षांनी मिळून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रणनीती आखली आहे. आगामी निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी विरोधक आता मुंबईत एकवटणार आहेत. विरोधकांचा चेहरा म्हणून शरद पवार यांना पुढे करण्यात आले आहे. शरद पवार यांनीही पुढाकार घेत नरेंद्र मोदी यांच्या विरोधात रान उठवले होते. तर उद्धव ठाकरे यांनीही भाजपासोबत युती तुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमिक शाह यांच्यावर वारंवार टीका केली आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका विरोधी पक्षांच्या गटात महत्त्वाची ठरणार आहे.
बंगळुरुत झाले विरोधकांचे विचारमंथन : भाजपविरोधात एकत्र आल्यानंतर विरोधकांच्या 26 पक्षांनी बंगळुरुत बैठक घेत विचारमंथन केले होते. या बैठकीला देशातील महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. पक्ष फुटल्यानंतरही उद्धव ठाकरे या बैठकीला आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह हजर होते. तर दुसरीकडे शरद पवार यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटल्यानंतर शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीत जाणे टाळल्याची चर्चा करण्यात झाली. मात्र आता मुंबईत विरोधकांची बैठक होत असून शरद पवार यांच्यावरच या बैठकीची धुरा सांभाळणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
-
#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "After Patna and Bengaluru, I.N.D.I.A.'s meeting will be held in Mumbai on August 31-September 1. The meeting will be hosted by Uddhav Thackeray, by Shiv Sena. With us, Congress and NCP will also be there. In today's meeting, Sharad… pic.twitter.com/N499wqzlcO
— ANI (@ANI) August 5, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "After Patna and Bengaluru, I.N.D.I.A.'s meeting will be held in Mumbai on August 31-September 1. The meeting will be hosted by Uddhav Thackeray, by Shiv Sena. With us, Congress and NCP will also be there. In today's meeting, Sharad… pic.twitter.com/N499wqzlcO
— ANI (@ANI) August 5, 2023#WATCH | Shiv Sena (UBT) MP Sanjay Raut says, "After Patna and Bengaluru, I.N.D.I.A.'s meeting will be held in Mumbai on August 31-September 1. The meeting will be hosted by Uddhav Thackeray, by Shiv Sena. With us, Congress and NCP will also be there. In today's meeting, Sharad… pic.twitter.com/N499wqzlcO
— ANI (@ANI) August 5, 2023
हेही वाचा -
- Nitish Kumar : नितीश कुमार नाराज? थेटच सांगितले....Watch Video
- INDIA Meeting in Mumbai : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवरून उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, एकवाक्यता होईना!
- INDIA Meeting in Mumbai : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 'INDIA' ची बैठक; यजमानपदावरुन महाविकास आघाडीत वाद?