इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले, देशातील निवडणुका पारदर्शीप्रमाणे व्हायला हव्यात. लोकांच्या सूचनेनुसार लोगोबाबत निर्णय होणार आहे. इंडियाच्या लोगोवरून आमच्यात संभ्रम नाही. इंडिया आघाडीच्या लोगोबाबत दोन ते तीन पर्याय आहेत. गणपतीमध्ये संसदेचं अधिवेशन कशासाठी असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
INDIA Alliance Meeting Mumbai : इंडियाच्या लोगोचे अनावरण का झाले नाही? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती - इंडिया आघाडी बैठक मुंबई
Published : Sep 1, 2023, 7:55 AM IST
|Updated : Sep 1, 2023, 5:57 PM IST
17:56 September 01
इंडियाच्या लोगोचे अनावरण का झाले नाही? उद्धव ठाकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
17:40 September 01
भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसची भीती वाटते-राहुल गांधी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष टिळक भवनमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. यावेळी राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसमध्ये दम नव्हता, तर भाजपाचा कर्नाटकमध्ये पराभव कसा झाला? महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. कारण काँग्रेस हा विचारांचा पक्ष आहे. इंग्रजांना काँग्रेसमुक्त भारत करता आला नाही. मग मोदींना ते कसे शक्य होईल? काँग्रेसला कोणीही संपवू शकणार नाही. काँग्रेस ही बब्बर शेरची पार्टी आहे. त्यात वाघीणदेखील आहेत. आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा पराभव होणार आहे. भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसची भीती वाटते, असा आरोप खासदार गांधी यांनी केला.
17:28 September 01
वन नेशन, वन इलेक्शन हा केवळ लक्ष वळविण्यासाठी उडविण्यात आलेला फुगा-काँग्रेस नेत्याचा आरोप
इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते म्हणाल्या, इंडिया आघाडीची रॅली लवकरच आयोजित केली जाणार आहेत. 'वन नेशन, वन इलेक्शन' या विषयावर काँग्रेस नेत्या म्हणाल्या, लक्ष वळवण्यासाठी हा फुगा उडवण्यात आला आहे.
17:27 September 01
देशाला परत जोडायचे आहे-मल्लिकार्जुन खरगे
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भारत आघाडीच्या बैठकीच्या समारोपानंतर मुंबईतील टिळक भवन काँग्रेस कार्यालयात पोहोचले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले, द्वेष सोडून एकत्र काम करायचे आहे. देशाला परत जोडायचे आहे. भ्रष्टाचाराविरोधात लढणाऱ्यांचा आवाज दाबला जात आहे, असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केलाय.
15:39 September 01
आपण विरोधक म्हणून एकत्र नाही, तर देशप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत-उद्धव ठाकरे
इंडिया आघाडीची पत्रकार परिषद सुरू आहे. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, लोकसभा एकत्रित लढविण्याचा ठराव करण्यात आला. इंडियाच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहेत. आपण विरोधक म्हणून एकत्र नाही, तर देशप्रेमी म्हणून एकत्र आलो आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
15:06 September 01
राहुल गांधी लोकलनं प्रवास करणार?
राहुल गांधी मुंबईची लाइफ्लाईन लोकल ट्रेनने सांताक्रूझ ते प्रभादेवी असा प्रवास करण्याची शक्यता आहे. राहुल गांधी यांचे सुरक्षा अधिकारी या संदर्भात आढावा घेत आहेत. टिळक भवन येथे राहुल गांधी यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राहुल गांधी हे परेल येथील काँग्रेस कार्यालयात जाणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व बाबी जुळून आल्यास राहुल गांधी लोकलनं प्रवास करणार आहेत.
14:43 September 01
इंडिया आघाडीचे असणार १३ सह समन्वयक, महाराष्ट्रातील 'या' दोन नेत्यांचा समावेश
इंडिया आघाडीनं आज १३ सह समन्वयकांची नियुक्ती जाहीर केलीय. यात महाराष्ट्रातील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा समावेश आहे.
13:49 September 01
मल्लिकार्जुन खर्गेंची पंतप्रधान मोदींवर टीका
-
Congress President Mallikarjun Kharge during the INDIA meeting in Mumbai said, "The success of both our meetings, 1st in Patna and 2nd in Bengaluru can be measured by the fact that the PM in his subsequent speeches has not just attacked INDIA but has also compared the name of our… pic.twitter.com/QiqCjPBpw4
— ANI (@ANI) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress President Mallikarjun Kharge during the INDIA meeting in Mumbai said, "The success of both our meetings, 1st in Patna and 2nd in Bengaluru can be measured by the fact that the PM in his subsequent speeches has not just attacked INDIA but has also compared the name of our… pic.twitter.com/QiqCjPBpw4
— ANI (@ANI) September 1, 2023Congress President Mallikarjun Kharge during the INDIA meeting in Mumbai said, "The success of both our meetings, 1st in Patna and 2nd in Bengaluru can be measured by the fact that the PM in his subsequent speeches has not just attacked INDIA but has also compared the name of our… pic.twitter.com/QiqCjPBpw4
— ANI (@ANI) September 1, 2023
आमच्या दोन्ही बैठकांनंतर पंतप्रधान मोदी यांनी 'इंडिया'वर टीका केली. मात्र, मोदींनी 'इंडिया'वर नाही तर आपल्या भारत मातेवर टीका केली असल्याचा टोला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लुकार्जुन खर्गे यांनी लगावला आहे.
12:50 September 01
केंद्र सरकार आता घाबरलेल्या अवस्थेत - पृथ्वीराज चव्हाण
-
#WATCH | Mumbai: Former Maharashtra CM and Congress leader Prithviraj Chavan on the special session of Parliament and speculation of the agenda of the session says, "One thing is clear...the government is now in panic mode. These things are happening to divert the attention. What… pic.twitter.com/l4Z0EDM4Rp

">#WATCH | Mumbai: Former Maharashtra CM and Congress leader Prithviraj Chavan on the special session of Parliament and speculation of the agenda of the session says, "One thing is clear...the government is now in panic mode. These things are happening to divert the attention. What… pic.twitter.com/l4Z0EDM4Rp
— ANI (@ANI) September 1, 2023#WATCH | Mumbai: Former Maharashtra CM and Congress leader Prithviraj Chavan on the special session of Parliament and speculation of the agenda of the session says, "One thing is clear...the government is now in panic mode. These things are happening to divert the attention. What… pic.twitter.com/l4Z0EDM4Rp
— ANI (@ANI) September 1, 2023
एक गोष्ट स्पष्ट आहे... सरकार आता घाबरलेल्या अवस्थेत आहे. लक्ष वळवण्यासाठी वेगवेगळे विषय काढत आहे. गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान हे विशेष अधिवेशन बोलवण्याची काय गरज आहे? केंद्र सरकार हिंदूंच्या भावनांबाबत अनभिज्ञ आहे का? असा सवाल काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
12:14 September 01
'इंडिया' आघाडी नेत्यांचं फोटोसेशन
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांनी बैठकीपूर्वी फोटोसेशन केले. यात अनेक ज्येष्ठ नेते दिसत आहेत.
12:13 September 01
'इंडिया' आघाडीकडून इस्रोचं अभिनंदन
'इंडिया' आघाडीकडून इस्रोचं अभिनंदन करण्यात आलं आहे. चंद्रयान 3 मिशन यशस्वी केल्याबद्दल इंडिया आघाडीनं इस्रोचं अभिनंदन केले.
11:56 September 01
'इंडिया' आघाडीच्या नेत्यांचे फोटोसेशन
'इंडिया' आघाडीची बैठक सध्या सुरू आहे. बैठकीपूर्वी विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांनी हॉटेल ग्रँढ हयातमध्ये फोटोसेशन केलं. यावेळी सर्वच ज्येष्ठ नेते हजर होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत, नाना पटोले, सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, नितीशकुमार, अरविंद केजरीवाल, भगवंत मान, ममता बॅनर्जी, डी राजा असे सर्वच नेते या बैठकीला हजर आहेत.
11:30 September 01
सोनिया गांधी, राहुल गांधी बैठकीला पोहचले
सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे बैठकीसाठी हॉटेल ग्रँड हयातमध्ये दाखल झाले आहेत.
11:13 September 01
'इंडिया' आघाडीचा लोगो आज जाहीर होणार नाही; एकमत होत नसल्याची माहिती
'इंडिया' बैठक सुरू झाली आहे. मात्र, आजच्या बैठकीत लोगोचे अनावरण केले जाणार नसल्याची माहिती मिळत आहे. लोगोवर एकमत होत नसल्यानं यावरील निर्णय आता होणार नसल्याची माहिती मिळत आहे.
10:48 September 01
बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहचले
बैठकीसाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ग्रँड हयात हॉटेलमध्ये पोहचले आहेत. अनेत नेतेही बैठकीसाठी हॉटेलमध्ये दाखल होत आहेत.
10:32 September 01
'इंडिया' आघाडीची ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक सुरू
'इंडिया' आघाडीची ग्रँड हयात हॉटेलमध्ये बैठक सुरू झाली आहे. आगामी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. सर्व नेते ग्रँड हयात हॉटेलमध्ये दाखल झालेत.
09:31 September 01
भाजपा फसवणूक करणारा पक्ष- सीपीआय
-
#WATCH | Mumbai: Binoy Viswam, Secretary, CPI National Council says, "...BJP is a party of deceit, a party of cheating the people and a party that is committed only to support the looters of the country like Adani and it is now known to the people. That's why the people want a… pic.twitter.com/9Ct7odOQOj

">#WATCH | Mumbai: Binoy Viswam, Secretary, CPI National Council says, "...BJP is a party of deceit, a party of cheating the people and a party that is committed only to support the looters of the country like Adani and it is now known to the people. That's why the people want a… pic.twitter.com/9Ct7odOQOj
— ANI (@ANI) September 1, 2023#WATCH | Mumbai: Binoy Viswam, Secretary, CPI National Council says, "...BJP is a party of deceit, a party of cheating the people and a party that is committed only to support the looters of the country like Adani and it is now known to the people. That's why the people want a… pic.twitter.com/9Ct7odOQOj
— ANI (@ANI) September 1, 2023
भाजपा हा लोकांची फसवणूक करणारा पक्ष आहे. अदानीसारख्या देशाच्या लुटारूंना पाठिंबा देण्यासाठी कटिबद्ध असलेला पक्ष हा भाजपा आहे. हे आता जनतेने ओळखले आहे. त्यामुळेच लोकांना बदल हवा आहे, अशी प्रतिक्रिया सीपीआय नॅशनल कौन्सिलचे सचिव बिनॉय विश्वम यांनी दिली.
08:05 September 01
'ग्रँड हयात' हॉटेलबाहेर मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स
-
VIDEO | Poster of Maharashtra CM Eknath Shinde reading put up outside Grand Hyatt, Mumbai where the two-day INDIA alliance meeting is being held. pic.twitter.com/nWBmmebzaA
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">VIDEO | Poster of Maharashtra CM Eknath Shinde reading put up outside Grand Hyatt, Mumbai where the two-day INDIA alliance meeting is being held. pic.twitter.com/nWBmmebzaA
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2023VIDEO | Poster of Maharashtra CM Eknath Shinde reading put up outside Grand Hyatt, Mumbai where the two-day INDIA alliance meeting is being held. pic.twitter.com/nWBmmebzaA
— Press Trust of India (@PTI_News) September 1, 2023
'इंडिया' आघाडीची बैठक सुरू असलेल्या 'ग्रँड हयात' हॉटेलबाहेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला पोस्टर लावण्यात आलाय. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलंय.
06:29 September 01
'इंडिया' आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस
मुंबई - INDIA Alliance Meeting Mumbai : 'इंडिया' आघाडीची सध्या बैठक सुरू आहे. आज(1 सप्टेंबर) या बैठकीचा दुसरा दिवस आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर असे दोन दिवस ही बैठक होत आहे. देशातील विरोधी पक्षाचे सर्वच ज्येष्ठ नेते 'इंडिया'च्या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.
संयोजक निवडीबाबत आज घोषणा होण्याची शक्यता - संयोजक निवडीवर चर्चा सुरू असल्याचं ऐकलं आहे. त्याबाबत आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत कदाचित घोषणा केली जाऊ शकते. लोगोही आज जाहीर होऊ शकतो. आज पुन्हा एकदा बैठक आहे. त्यामुळे सर्वकाही आजच्या पत्रकार परिषदेत समजेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी दिली.
महायुतीची मुंबईत बैठक - 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी राज्यातील 'एनडीए' पक्षांचीही बैठक सुरू आहे. 31 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी पहिली बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी 'डिनर'चं आयोजन केलं होतं. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रमुख नेते या बैठकीला हजर होते. येत्या लोकसभा निवडणुकीला एकत्रितपणे सामोरे जाण्याची रणनीती या बैठकीत ठरवली जात आहे. राज्यात विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीपेक्षा जास्त जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी नक्की काय रणनीती आखावी यावर या बैठकीत चर्चा होत आहे.
हेही वाचा -
- Lalu Prasad Yadav on INDIA Alliance : देशातील लोकशाही वाचवण्यासाठी विरोधकांनी अहंकार सोडून एकत्र यावं - लालू प्रसाद यादव
- Devendra Fadnavis On India Alliance : देश वाचवण्यासाठी नाही तर...देवेंद्र फडणवीसांची इंडिया आघाडीवर टीका
- Rajnath Singh on INDIA : 'इंडिया' आघाडीची राजनाथ सिंह यांनी उडविली खिल्ली, म्हणाले...