ETV Bharat / state

India Alliance 4th meeting: इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीच्या ठिकाणावरून मतभेद, काँग्रेसचा मात्र इन्कार - इंडिया आघाडीची चौथी बैठक

मोदी सरकारला सत्तेतून पाय तयार करण्यासाठी स्थापन झालेल्या इंडिया आघाडीची चौथी बैठक कुठल्या शहरात आयोजित करायची यावरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. तसेच काँग्रेस इतर घटक पक्षांवर आपली मते लादत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे काही माध्यमांच्या टीव्ही अँकरवर बहिष्कार घालण्याच्या मुद्द्यावर संयुक्त जनता दल व समाजवादी पक्षाने वेगळी भूमिका घेतली असल्याकारणाने इंडिया आघाडीमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.

India Alliance 4th meeting
India Alliance 4th meeting
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 29, 2023, 9:19 PM IST

मुंबई - २०२४ च्या वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये मध्य प्रदेश व छत्तीसगड यांचाही समावेश आहे. याच कारणाने इंडिया आघाडीची चौथी बैठक भोपाळ येथे घेण्यात यावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. तर दुसरीकडे समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याचबरोबर संयुक्त जनता दल व इतर काही पक्षांनी ही बैठक दिल्लीत व्हावी यासाठी हट्ट धरला आहे. तसेच काँग्रेस हा जुना पक्ष असल्याकारणाने त्यांनी मोठ्या भावाची भूमिका घेण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्लाही घटक पक्षातील काही पक्षांनी दिला आहे.

इंडिया आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. पटना, बंगळूर, मुंबई व त्यानंतर आता चौथ्या बैठकीसाठी शहर निश्चित केले जात आहे. पटना येथील बैठकीचे संयोजन बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केले होते. तर त्यानंतर कर्नाटक मधील बंगळूर येथे दुसरी बैठक झाली होती तर मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी व अत्यंत महत्त्वाची बैठक झाली होती.

अंतिम निर्णय हा लवकरात लवकर काँग्रेसचे महासचिव, माजी उपमहापौर राजेश शर्मा म्हणाले की, आमच्यामध्ये कुठल्याही मुद्द्यावर मतभेद नाहीत. मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी पहिल्यांदा मोठ्या प्रमाणामध्ये २८ विरोधी पक्षांची एकजूट झाली आहे. त्यात अजून भर पडत असल्याने त्याचा धसका भाजपा तसेच त्यांच्या मित्रपक्षांनी घेतला आहे. भोपाळ येथे इंडिया आघाडीची चौथी बैठक घेण्यासाठी चर्चा झाली होती. परंतु ते ठिकाण अंतिम करण्यात आले नाही नव्हते. इंडिया आघाडीची चौथी बैठक त्याचप्रमाणे इंडिया आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या रॅली संदर्भामध्ये चर्चा सुरू आहे.

११ घटक पक्षांच्या सदस्यांची जी समिती तयार केली आहे ती या संदर्भामध्ये अंतिम निर्णय हा लवकरात लवकर घेतला जाईल. त्याचप्रमाणे काही माध्यमांच्या अँकरवर टाकलेला बहिष्कार या संदर्भात बहुतेक पक्षांचे एकमत झाल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आल्याचंही राजेश शर्मा यांनी सांगितलं आहे. तसेच आघाडीतील मतभेदासंदर्भामध्ये भाजपकडून जाणीवपूर्वक प्रचार केला जात आहे-काँग्रेसचे महासचिव राजेश शर्मा

काँग्रेससाठी महत्त्वाची बैठक- मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसनं मागच्या विधानसभा निवडणुकीत विजय संपादन केला होता. परंतु वर्षभरातच ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखालील पक्षाच्या आमदारांनी पक्ष सोडल्यानं व भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेथे भाजपाचं सरकार स्थापन झाले. मुंबईत इंडिया आघाडीची तिसरी बैठक झाली. त्यानंतरची बैठक भोपाळमध्ये घेण्यात येण्यावर जवळपास सर्वांचे एकमत झालं होतं. परंतु शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी समन्वय समितीच्या बैठकीनंतर आघाडीतील घटक प्रमुख पक्षांनी पुकारलेल्या सनातन धर्मावरील प्रचंडवादाच्या पार्श्वभूमीनंतर भोपाळची बैठक रद्द करण्यात आली. भोपाळमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली तर त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो, या अनुषंगाने भोपाळमधील बैठक ही काँग्रेससाठी महत्त्वाची मानली जात आहे. परंतु भोपाळमध्ये बैठक घेण्यास काही घटक पक्षांचा विरोध असल्याने इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीविषयी अजूनही अनिश्चितता आहे.

हेही वाचा-

  1. AAP will Not leave INDIA Alliance : आम आदमी पार्टी INDIA साठी वचनबद्ध - केजरीवाल
  2. Anurag Thakur on India Aghadi : सनातन धर्म संपवण्याचा प्रयत्न करणारे संपले, अनुराग ठाकूरांचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.