ETV Bharat / state

वाहनविक्रीला दसरादिवाळीची साथ, तब्बल 2500 कोटींचा महसूल प्राप्त

राज्यातील वाहनविक्रीत वाढ झाली आहे. यंदा एप्रिल ते १४ नोव्हेंबर या कालावधित एकूण ७ लाख ६५ हजार ९२७ वाहनांची नोंदणी झाली. दसरा आणि दिवाळीला वाहनांच्या विक्रीत विक्रमी वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी लॉकडाऊनमुळे वाहन विक्रीला बसलेला फटका आता दूर झाला आहे.

वाहन विक्रीत वाढ
वाहन विक्रीत वाढ
author img

By

Published : Nov 20, 2020, 12:28 PM IST

Updated : Nov 20, 2020, 3:51 PM IST

मुंबई - करोना संक्रमणामुळे राज्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यानंतर अनेक छोट्या-मोठ्या व्यवसायांचे उत्पादन थांबले. मोठ्या आर्थिक नुकसानाचा फटका देखील यावेळी सहन करावा लागला. मात्र, आता राज्यात सर्वत्र अनलॉक करण्यात आले. त्यामुळे हळू-हळू व्यवसाय पूर्वपदावर येत आहेत. वाहनविक्रीसारख्या क्षेत्रात राज्यभरात मोठी तेजी आल्याचे निदर्शनास आले आहे. दसरा, दिवाळी दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहनविक्री झाली. यामुळे परिवहन विभागाला मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळाला आहे.

वाहन विक्रीत वाढ

वाहनविक्रीला तेजी येण्याची 'ही' आहेत कारणे-

कोरोना काळात अनलॉक करत असताना वाहनविक्रीला परवानगी मिळाली होती. त्यामुळे ग्राहकांनी जुलैपासून गाडी खरेदीला पसंती दिली. ५ महिन्यांतील गाड्यांच्या स्टाॅकमुळे वेगवेगळ्या शो-रूमध्ये ग्राहकांना ॲान-डिमांड गाडी मिळत असल्याने विक्री वाढली आहे. यापूर्वी ग्राहकांना नवीन गाडी घरी येण्यासाठी प्रतिक्षा यादीत वाट बघावी लागत होती. आता लगेच गाडी घरी येत असल्याने ग्राहकांनी वाहन खरेदीला पसंती दिलेली आहे.

परिवहन खात्याच्या तिजोरीत २ हजार २६८ कोटींचा महसूल-
गेल्या काही महिन्यांपासून वाढलेली वाहन नोंदणी आणि अन्य करांतून आरटीओच्या तिजोरीत २ हजार ७६८ कोटी रुपयांची भर पडली आहे. विशेष म्हणजे, यापैकी ९० टक्के महसूल हा वाहन नोंदणीतून मिळाला. यंदा एप्रिल ते १४ नोव्हेंबर या कालावधित एकूण ७ लाख ६५ हजार ९२७ वाहनांची नोंदणी झाली. तब्बल ७ लाख ३० हजार ५५ खासगी गाड्यांची नोंदणी झाली आहे. तसेच आतापर्यंत ३५ हजार ८८२ व्यावसायिक गाड्यांची नोंदणी झाली असून या नोंदणी झालेल्या गाड्यांच्या माध्यमातून राज्याला २ हजार ७६८ कोटी रुपये मिळाले आहेत.

केवळ २० ते ३० टक्के विक्रीची होती अपेक्षा
लाॅकडाऊन काळात जवळपास ३ महिने ॲाटो मोबाईल इंडस्ट्री पूर्णत: बंद होती. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी फक्त २० ते ३० टक्के वाहनांची खरेदी होईल, असा अंदाज बांधला जात होता. पण सणांच्या तोंडावर वाहन खरेदी-विक्री अनलाॅक केल्याने वाहनांची खरेदी थेट ५० ते ६० टक्क्यांवर पोहचली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये फटका बसलेल्या ऑटो इंडस्ट्रीजला नवसंजिवनी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये विक्री वाढली

या संदर्भात वाहतूक विभागाचे सहआयुक्त राजेंद्र पाटील म्हणाले, की गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन विक्रीची संख्या जरा कमी होती. पण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात वाहनांची विक्री वाढल्याचे दिसून येते. आता कोरोनाचा वाहन विक्रीवरील परिणाम कमी होत असल्याचे दिसून येते. पुढेही वाहन विक्री वाढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दुचाकी आणि चारचाकी खासगी वाहनांची विक्री वाढत असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा- शिवसेना नेत्याने कराची बेकरीचे नाव बदलले, संजय राऊत म्हणाले हे निरर्थक

हेही वाचा- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : भाजप नेत्यांचे शिष्टमंडळ राज्यात दाखल

Last Updated : Nov 20, 2020, 3:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.