ETV Bharat / state

पश्चिम रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या तिकीटदरात वाढ; 'असे' आहेत दर - मुंबई

२५ जून २०१८ पासून भाडेवाढ करण्यात येणार होती. मात्र, ६ महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून भाडेवाढ होण्याची शक्यता होती. अखेर या एसी लोकलचे १ जूनपासून १.३ पटीने तिकीट दर वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.

फाईल फोटो
author img

By

Published : Jun 1, 2019, 11:12 AM IST

मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात आजपासून दरवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एसी लोकलचे तिकीट प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांपेक्षा १.२ पटीने आकारले जात होते. आजपासून हे दर १.३ पटीने आकारण्यात येणार आहे.

गेल्या २५ डिसेंबर २०१७ ला पश्चिम उपनगरीय मार्गावर देशातील पहिली एसी लोकल सुरू झाली होती. एसी लोकलचे पहिल्या ६ महिन्यांसाठीचे किमान तिकीट जीएसटीसह ६० रुपये, तर कमाल तिकीट २०५ रुपये ठेवण्यात आले होते. २५ जून २०१८ पासून भाडेवाढ करण्यात येणार होती. मात्र, ६ महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासून भाडेवाढ होण्याची शक्यता होती. अखेर या एसी लोकलचे १ जूनपासून १.३ पटीने तिकीट दर वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.

आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एसी लोकलमुळे १९ कोटी रुपयांचा महसूल पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेला आहे, तर यंदा एप्रिल महिन्यात १ कोटी ८४ लाखांचा महसूल एसी लोकलमुळे प्राप्त झाला आहे. पश्चिम रेल्वेवर १ नोव्हेंबर २०१८ पासून लागू करण्यात आलेल्या नविन वेळापत्रकात एसी लोकलच्या थांब्यात वाढ केलेली आहे. त्यामध्ये मरिन लाईन्स, चर्नी रोड, ग्रॅण्ट रोड, दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा स्थानकांचा समावेश आहे. एसी लोकलच्या थांब्यात वाढ केल्यामुळे अधिक महसूल रेल्वेला मिळालेला आहे.

अशी आहे भाडे वाढ

रेल्वे स्थानक जुने दर नवीन दर

  1. मुंबई सेंट्रल ६० ६५
  2. दादर ८५ ९०
  3. बांद्रा ८५ ९०
  4. अंधेरी १२५ १३५
  5. बोरिवली १६५ १८०
  6. वसई रोड १९५ २१०
  7. विरार २०५ २२०

Intro:मुंबई - पश्चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकिट दरात आज 1 जूनपासून वाढ लागू झाली आहे.याआधी एसी लोकलचे तिकीट प्रथम श्रेणीच्या तिकीट दरांपेक्षा 1.2 पटीने आकारले जात होते ते आजपासून 1.3 पटीने आकारण्यात येणार आहे.Body:25 डिसेंबर 2017 ला पश्चिम उपनगरीय मार्गावर देशातील पहिली एसी लोकल सुरु झाली. एसी लोकलचे पहिल्या सहा महिन्यांसाठीचे किमान तिकिट जीएसटीसह 60 रुपये तर कमाल तिकिट 205 रुपये ठेवण्यात आले होते. 25 जून 2018 पासून भाडेवाढ करण्यात येणार होती. मात्र तेव्हादेखील 6 महिन्यांसाठी भाडेवाढ पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे गेल्या डिसेंबर महिन्यापासुन भाडेवाढ होण्याची आवश्यकता होती.अखेर या एसी लोकलचे 1 जूनपासून 1.3 पटीने तिकीट दर वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
2018-19 या आर्थिक वर्षात एसी लोकलमुळे 19 कोटी रुपयांचा महसुल पश्चिम रेल्वेच्या तिजोरीत जमा झालेला आहे. तर यंदा एप्रिल महिन्यात 1 कोटी 84 लाखांंचा महसुल एसी लोकलमुळे प्राप्त झाला आहे.Conclusion:पश्चिम रेल्वेवर 1 नोव्हेंबर 2018 पासुन लागु करण्यात आलेल्या नविन वेळापत्रकात एसी लोकलच्या थांब्यात वाढ केलेली आहे.त्यामध्ये मरिन लाईन्स,चर्नी रोड,ग्रण्ट रोड,दहिसर,मीरा रोड,नायगाव आणि नालासोपारा स्थानकाचा समावेश आहे. एसी लोकलच्या थांब्यात वाढ केल्यामुळे जादा महसुल रेल्वेला मिळालेला आहे.

अशी आहे भाडे वाढ
जुने दर नवीन दर
मुंबई सेंट्रल = 60 65
दादर = 85 90
बांद्रा = 85 90
अंधेरी = 125 135
बोरिवली = 165 180
वसई रोड = 195 210
विरार = 205 220
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.