मुंबई : मुंबई, नवी मुंबई, विरार, वसई आणि पनवेल, उरणमधील शाळांना ख्रिसमसच्या सुट्ट्या सुरू झाल्या (christmas vacation) आहेत. लग्न, गावाकडील यात्रा, निवडणूक व इतर कारणांमुळे हजारो चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. तर काही हौशी सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठीही बाहेर जात आहेत. प्रत्येक वर्षी मे महिन्याप्रमाणे या कालावधीमध्ये चोरी आणि घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असते. सोशल मीडियावर पडणाऱ्या अपडेटनुसार काही चोरटे बंद घरांवर पाळत ठेवतात आणि घर रिकामे (christmas vacation going for tourism) करतात.
सुरक्षेविषयी उदासीनता : या सुट्ट्यांमध्ये गावी अथवा बाहेरगावी फिरायला जाताना नागरिकही पुरेशी काळजी घेत नाहीत. सुरक्षारक्षक असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बंद घरांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. बाहेरगावी जाताना नागरिकांनी शेजाऱ्यांना माहिती देणेही आवश्यक आहे. वाहने शक्यतो रोडवर उभी करू नयेत. वाहनतळावर सुरक्षितपणे वाहने उभी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. मात्र, नागरिक सुरक्षेविषयी उदासीनता दाखवत असल्यामुळे चोरट्यांना संधी मिळत आहे. अनेक नागरिक देखील सुट्ट्यांमध्ये कुठे चाललो आहोत, याची सोशल मीडियावर माहिती टाकतात. ती माहिती चोरट्यांना मिळते. त्यानुसार घरफोड्या आणि दरोड्यांचा प्रमाण सुट्ट्यांच्या कालावधीत बरेच वाढते. त्यातच काहींच्या घरांची कडी, कोयंडी चांगल्या दर्जाचे नसतात. दोन मिनिटात चोरटे दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत आहेत. रोडवर उभ्या वाहनांच्या सुरक्षेसाठी कोणतीच सुरक्षेची उपकरणे वापरली जात नाहीत. यामुळे वाहनांची चोरी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. पोलिसांनी देखील सुट्ट्यांच्या काळात शहरामधील गस्त वाढविली (Christmas holidays) पाहिजे.
चोरीच्या घटना केव्हा घडतात : शहरामध्ये दिवसा व रात्री घरफोड्या होत असतात. एकाच इमारतीत एकापेक्षा जास्त घरे बंद असल्यास दिवसाही घरफोड्या होत असतात. रात्रीच्या वेळी नागरिक कुलर, पंखा लावून गाढ झोपलेले असतात. त्यावेळी घरे, बंगल्याचा मागचा दरवाजा फोडून चोरीच्या घटना घडतात. मौल्यवान वस्तू चोरण्यासोबत नागरिकांनी विरोध केल्यास हत्याराने जीवे मारण्याचा प्रयत्न होतो. ग्रामीण भागात मध्यरात्री चोरीच्या घटना घडत (increase in thefts and burglaries) असतात.
घरफोडीची शक्यता : नागरिकांकडून सुट्ट्यांमध्ये घर बंद करून बाहेर जाताना घरातील ऐवज सेफ्टी लॉकरमध्ये अथवा बँकेत ठेवला जाणे आवश्यक आहे. मात्र, तसे न करता अनेक जण महागडे दागिने घरात ठेवून सुट्टीवर जातात. अशावेळी त्यांच्यावर पाळत ठेवून असलेल्या गुन्हेगाराकडून घरफोडीची शक्यता असते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुरक्षेची अनेक उपकरणे बाजारात आहेत. त्यामध्ये सीसीटीव्हीसह सेन्सर अलार्मचाही समावेश आहे. त्याद्वारे घर बंद असताना आतमध्ये कसलीही संशयास्पद हालचाल झाल्यास अलार्म वाजून मोबाइलवर देखील त्याची माहिती मिळू शकते. मागील काही दिवसात पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यात घरफोडी व चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचाही समावेश आहे. मात्र गुन्हेगारांवर पोलिसांकडून कारवाया होत असल्या तरीही नागरिकांकडून देखील स्वत:च्या ऐवजाची काळजी घेतली जाणेही तितकेच महत्त्वाचे (thefts and burglaries during Christmas holidays) आहे.
नुकत्याच झालेल्या घरफोडी : नालासोपारा येथे घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. प्रगती नगर येथील साईराज अपार्टमेंट मध्ये राहणाऱ्या विकास राऊत (४३) यांच्या घरी बुधवारी पहाटे चोरट्यांनी किचनच्या खिडकीवाटे आत प्रवेश करत घरातील मोबाईल व रोख रक्कम असा ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. बुधवारी तुळींज पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला (hefts and burglaries) आहे.
पेल्हार येथे लाखोंची घरफोडी : पेल्हार येथे एका घरात लाखो रुपये किमतीच्या मुद्देमालाची घरफोडीची घटना घडली आहे. जामा मशीदीच्या बाजूला रहिमी मंजिल येथे राहणाऱ्या साजीद दावा (२८) याच्या घरी १८ ते २१ डिसेंबर दरम्यान ते मुळगावी गुजरात येथे कार्यक्रमासाठी गेले असताना चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. ४५ हजाराची रोख रक्कम, सोन्याचा कानातील साखळी, झुमके, मंगळसूत्र, नाकातील नथनी असा एकूण ३ लाख ६५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. बुधवारी पेल्हार पोलिसांनी आरोपीं विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला (christmas vacation going for tourism) आहे.
मोलकरणीने केली चोरी : नालासोपारा येथे एका महिला वकिलाच्या घरात घरकाम करणाऱ्या महिलेने लाखोंच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दुबे इस्टेट येथे राहणाऱ्या नेहा दुबे (३८) यांच्या घरी मंगळवारी घरकाम करणारी महिला अस्मिता घाणेकर हिने घरातील सोन्याची चैन, सोन्याची पेंडल, सोन्याची अंगठी, कानातील टॉप्स असा एकूण ४ लाख ४१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. बुधवारी तुळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर आरोपी महिले विरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा पुढील तपास तुळींज पोलीस करीत (thefts and burglaries) आहेत.