ETV Bharat / state

चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड - MAHARASTRA ASSEMBLY ELECTION 2019

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आयकर विभागाने अशाप्रकारे उमेदवारांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कंपन्यावर धाडी टाकणे चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित रिटर्ननिंग ऑफिसरची कोणतीही परवानगी घेतली नाही, असा दावा ठाकूर यांनी केला.

अबुल हसन खान
author img

By

Published : Oct 9, 2019, 8:33 PM IST

मुंबई - येथील अबुल हसन खान यांच्या पाच कंपन्या आणि चांदिवली येथील निवडणूक प्रचार कार्यालयावर आज आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. खान हे चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची धास्ती सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर आयकर विभागाची धाड

हेही वाचा- ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे दीर्घ आजाराने निधन

आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचे कर भरले आहे. त्यासाठीची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. मात्र, असे असताना आज आयकर विभागाकडून धाडी टाकून दबावतंत्र केले जात आहे. त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे ठाकूर म्हणाल्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आयकर विभागाने अशाप्रकारे उमेदवारांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कंपन्यावर धाडी टाकणे चुकीचे आहे. त्यासाठी त्यांनी संबंधित रिटर्ननिंग ऑफीसरची कोणतीही परवानगी घेतली नाही, असा दावा ठाकूर यांनी केला.

हेही वाचा- नोबेल २०१९ : जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो ठरले रसायनशास्त्रातील नोबेलचे पारितोषिक विजेते!

वंचितचे सरचिटणीस व नेते डॉ. ए.डी. सावंत म्हणाले की, आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचा कर भरला आहे. त्याची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये आयकरने धाडी टाकून पुन्हा एकदा वंचितला रोखण्याचा प्रयत्न सरकारच्या दबावाच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांनी आपण सर्व प्रकारचा कर भरला असल्याचे सांगत आपल्यावर टाकण्यात आलेल्या धाडी या केवळ दबावाचा भाग असल्याचा दावा केला. त्यांना यापूर्वी आयकर विभागाकडून कोणतीही नोटीस आली नाही. मात्र, आता मी निवडणुकीच्या मैदानात उभा असल्याने आपल्यावर दबावाचे राजकारण केले जात असल्याचा दावाही खान यांनी माध्यमांशी बोलताना केला.

Intro:चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सच्या धाडी, भाजपकडून दबावतंत्र केले जात असल्याचा वंचितचा आरोप

mh-mum-01-bva-rekhathakur-byte-7201153

mh-mum-01-bva-dr-adsavant-byte-7201153

mh-mum-01-bva-abulkhan-byte-7201153

(यासाठीचे सर्व फीड मोजोवर पाठवले आहे)

मुंबई, ता. ९ :

चांदिवली विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांच्या पाच कंपन्या आणि चांदिवली येथील निवडणूक प्रचार कार्यालयावर आज इन्कम टॅक्स धाडी टाकल्या आहेत. त्यामुळे या परिसरात मोठी खळबळ निर्माण झाली असून वंचित बहुजन आघा डीच्या उमेदवाराची धास्ती सत्ताधारी भाजपाने घेतली आहे. त्यामुळेच त्यांचा आवाज दाबण्यासाठी अशा प्रकारचे कृत्य केले जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या रेखा ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचे इन्कम टॅक्स भरले असून त्यासाठीची कागदपत्रे त्यांच्याकडे आहेत. मात्र अशा असताना आज इन्कम टॅक्स कडून धाडी टाकून दबावतंत्र केले जात आहे. त्याचा आम्ही निषेध करत असल्याचे ठाकूर म्हणाल्या. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची सर्व प्रक्रिया सुरू असताना इन्कम टॅक्सने अशाप्रकारे उमेदवारांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कंपन्या धाडी टाकणं चुकीचे असून त्यासाठी त्यांनी संबंधित रिटर्ननिंग ऑफीसरची कोणतीही परवानगी घेतली नाही, असा दावा आहे ठाकूर यांनी केला. तर वंचितचे सरचिटणीस व नेते डॉ. ए.डी. सावंत म्हणाले की, आमच्या उमेदवाराने सर्व प्रकारचे इन्कम टॅक्स भरला असून त्याची कागदपत्रे आमच्याकडे उपलब्ध आहेत. अशा स्थितीमध्ये इन्कम टॅक्स ने धाडी टाकून पुन्हा एकदा वंचितला रोखण्याचा प्रयत्न सरकारच्या दबावाच्या माध्यमातून केला जात असल्याचा आरोप डॉ. सावंत यांनी केला. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अबुल हसन खान यांनी आपण सर्व प्रकारचे इन्कम टॅक्स भरला असल्याचे सांगत आपल्यावर टाकण्यात आलेल्या धाडी या केवळ दबावाचा भाग असल्याचा दावा केला. त्याला यापूर्वी इन्कम टॅक्स विभागाकडून कोणतीही नोटीस आली नाही, मात्र आता मी निवडणुकीच्या मैदानात उभा असल्याने आपल्यावर दबावाचे राजकारण केले जात असल्याचा दावाही खान यांनी माध्यमांशी बोलताना केला.Body:चांदिवलीतील वंचित उमेदवाराच्या कार्यालयावर इन्कम टॅक्सच्या धाडी, Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.