मुंबई : आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्भया फंडातून प्राप्त वाहनांचे लोकर्पण केले. ४० चारचाकी वाहने आणि २०० मोटर सायकली मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यातील निर्भया पथकाकरीता वाटप केले आहे. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा व सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव (गृह) हे उपस्थित होते. तसेच विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, देवेन भारती, विशेष पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, सत्यनारायण, पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ, पोलीस सहआयुक्त, वाहतूक, अभिनव देशमुख, अपर पोलीस आयुक्त, दक्षिण प्रादेशिक विभाग हे हजर होते.
बीट मार्शल अधिक सक्षम होणार : निर्भया पथकासाठीच्या वाहन लोकार्पण सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नवीन वाहने नव्याने मुंबई पोलीस दलात दाखल झाल्याने निर्भया पथक व बीट मार्शल अधिक सक्षम होणार आहेत. मुंबई पोलीस दलातील सर्व वाहनांवर Vehicle Tracking System (VTS) बसविण्यात आली आहे. सर्व वाहनांचे मुख्य व प्रादेशिक नियंत्रण कक्ष मॉनेटरींग करणार आहे. त्यामुळे सर्व वाहने प्रभावीपणे गस्त घालून गुन्हेगारीवर प्रतिबंध घालणार आहेत.
तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर : महाराष्ट्र पोलिस दलाला अधिक समृद्ध करा आणि नावलौकिक आणखी वाढवा. आज स्पर्धा मोठी आहे, आपल्याला सर्वोत्तम रहावेच लागेल आणि त्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा लागेल. प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा आपण पोलिसिंग केले आहे. येथील चर्चा येथेच थांबून उपयोग नाही तर त्याचे प्रतिबिंब खालपर्यंत कसे जाईल, याचे नियोजन झाले पाहिजे. वरिष्ठ अधिकारी आणि सर्वात खालची व्यक्ती यात अधिक संवाद असला पाहिजे. ऑफिसच्या बाहेरच्या जगाशीसुद्धा आपला संपर्क असला पाहिजे. चांगल्या संकल्पनांना ओनरशिप असली पाहिजे. गुन्हे आणि पोलिस कार्यपद्धती दोन्ही सातत्याने बदलत आहे. अशात पोलिस कार्यपद्धती बदलली नाही तर आपण मागे पडू. प्रशिक्षणावर भर द्यावाच लागेल. ज्यावर चर्चा झाली, त्यावर कृती आराखडा तयार झाला पाहिजे. त्याच्या अंमलबजावणीचा दर तीन महिन्यांनी महासंचालकांनी आढावा घेतला पाहिजे.
हेही वाचा -
- Nirbhaya Squad Saved Girl: शाब्बास पोलिसांनो! निर्भया पथकाच्या 'त्या' महिला कॉन्स्टेबलमुळे वाचला मुलीचा जीव
- Purnia Gangrape Agttempt : धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, पीडितेने बसमधूनच घेतली उडी, गंभीर जखमी
- Chitra Wagh In Kolhapur सुप्रियाताई सुळेंनीही निर्भया पथकातील गाडी वापरली चित्रा वाघ यांची टीका