ETV Bharat / state

मुलुंड रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे झाले उद्घाटन, फलाटावर वेळेत पोहचण्यास होणार मदत

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूलाचे शनिवारी उदघाटन करण्यात आले.

मुलुंड रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे उद्घाटन, फलाटावर वेळेत पोहचण्यास होणार मदत
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:18 PM IST

मुंबई - मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूलाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते या पूलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे हा पूल आता प्रवाशांना वापरता येणार आहे. 74 मीटर लांब व 6 मीटर रुंद असलेल्या या पुलामुळे प्रवाशांना फलाटावर वेळेत पोहचण्यास मदत होणार आहे.

मुलुंड रेल्वे स्थानकातील नवीन पादचारी पुलाचे उद्घाटन, फलाटावर वेळेत पोहचण्यास होणार मदत

मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील हा पादचारी पूल माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. या पादचारी पूलासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हा नवीन पादचारी पूल मुलुंड पश्चिममधील पार्किंगच्या जागेपासून सुरू होतो आणि प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3 आणि 4 ला जोडतो आणि मुलुंड पूर्वेला बाहेर पडतो, अशा प्रकारे मुलुंड पूर्व ते पश्चिम पर्यंत प्रवास करणाऱया प्रवाशांसाठी हा पादचारी पूल वरदान ठरणार आहे.

यावेळी मुलुंडमधील भाजप नगरसेवक, वरिष्ठ रेल्वे अधिकारी डीसीएम पंवार, डीसीएम कोंडिया, वरिष्ठ डीईएम आणि मुलुंड स्टेशन मास्टर जी. डी. बरनवाल उपस्थित होते.

Intro:मुलुंड रेल्वे स्थानकात नविन पादचारी पुलाचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते उदघाटन

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकात आज नविन पादचारी पूलाचे उदघाटन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले.आज पासून हा पादचारी पूल प्रवाश्यांना वापरता येणार आहे.74 मीटर लांब व 6 मीटर रुंद असलेल्या या पुलामुळे प्रवाश्याना फलाटावर वेळेत पोहचण्यास मदत होणार आहेBody:मुलुंड रेल्वे स्थानकात नविन पादचारी पुलाचे खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते उदघाटन

मध्य रेल्वेच्या मुलुंड रेल्वे स्थानकात आज नविन पादचारी पूलाचे उदघाटन ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी केले.आज पासून हा पादचारी पूल प्रवाश्यांना वापरता येणार आहे.74 मीटर लांब व 6 मीटर रुंद असलेल्या या पुलामुळे प्रवाश्याना फलाटावर वेळेत पोहचण्यास मदत होणार आहे.

मुंबईची जीवनवाहिनी अशी मुंबईच्या रेल्वेची ओळख आहे.या रेल्वेने रोज लाखो प्रवाशी प्रवास करत असतात.वाढत्या प्रवासी संख्येने रेल्वे व रेल्वेच्या प्राथमिक सुविधांवर ताण येतो त्यामुळे रेल्वे परिसरातील
पादचारी पूल जीर्ण व धोकादायक असल्याने काही दुर्घटनाही घडल्या आहेत. रेल्वे कडून नवीन पादचारी पुलाचे विक्रोळी, कंजूरमार्ग रेल्वे स्थानकात काम चालू आहेत. रोजच्या वाढत्या रेल्वे प्रवाशी संख्याच्या पुढे पादचारी पूल कमी पडत असल्याने इतर पादचारी पुलावंर ताण येतो आहे. धोकादायक पादचारी पुलाचे आडीट करून तो राहदरीसाठी बंद करून त्या जागेवर नवीन पूल बांधले जात आहेत. मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील हा पादचारी पूल माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कार्यकाळात मंजूर करण्यात आला होता. आजच्या उदघाटनला किरीट सोमय्या उपस्थित नव्हते त्यामुळे कुठेतरी किरीट सोमय्या यांची कमी मुलुंडकर यांना जाणवत होती. सोमय्या यांनी आपल्या खासदार पदाच्या कार्यकाळात प्रथम प्राधान्य रेल्वेच्या फलाटची रुंदी, उंची,स्थानकातील सरकते जीने ,व पादचारी पूल यांना दिली होती.

मुलुंड रेल्वे स्थानकातील हा पादचारी पूलासाठी सुमारे 4 कोटी रुपयांचा खर्च आला आहे.हा पूल 74 मीटर लांब व रूंदी 6 मीटर आहे. हा नवीन पादचारी पुल मुलुंड पश्चिम मधील पार्किंगच्या जागेपासून सुरू होतो आणि प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3 आणि 4 ला जोडतो आणि मुलुंड पूर्व ला बाहेर पडतो. अशा प्रकारे मुलुंड पूर्व ते पश्चिम पर्यंत प्रवास करणार्या प्रवाशांसाठी हा पादचारी पूल प्रवाश्यांना वरदान ठरणार आहे.

या पादचारी पुलाच्या उदघाटन वेळी बोलताना ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक म्हणाले रेल्वेची सेवा प्रवाश्याची आधीक सुलभ होण्यासाठी माजी खासदार किरीट सोमय्या यांनी चांगले विकासाचे एक मॉडेल ईशान्य मुंबईत बनवले आहे. त्यामुळे मंजूर केलेले रेल्वेचे विकास कामे पूर्ण करण्यासाठी माझे सर्वोत्तपरी प्रयत्न आहेत.

उद्घाटन समारंभात भाजपचे मुलुंड मधील नगरसेवक , वरिष्ठ रेल्वे अधिकारी डीसीएम पंवार, डीसीएम कोंडिया, वरिष्ठ डीईएम आणि मुलुंड स्टेशन मास्टर जी. डी. बरनवाल उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.