ETV Bharat / state

पहिल्या टप्प्यातील ७ मतदारसंघात ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात - लोकसभा

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारिख २८ मार्च होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.

निवडणूक आयोग
author img

By

Published : Mar 29, 2019, 12:49 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत राज्यातील ७ मतदारसंघात १४७ नामनिर्देशन पत्रे वैध ठरली होती. त्यापैकी ३१ उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली आहेत. तर ११६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती १४७ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारिख २८ मार्च होती. या मुदतीत १४७ पैकी ३१ उमेदवारांनी माघार घेतली.

मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या

वर्धा लोकसभा मतदारसंघात १४, रामटेक मतदारसंघात १६, नागपूर मतदारसंघात ३०, भंडारा-गोंदिया मतदारसंघात १४, गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ५, चंद्रपूर मतदारसंघात १३, यवतमाळ- वाशीम मतदारसंघात २४

दुसऱ्या टप्प्याअंतर्गत २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १० मतदारसंघात छाननीअंती २७८ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून, आज दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

Intro:Body:
MH_EC_Phase1_29.3.19
लोकसभा निवडणूक-2019
पहिल्या टप्प्यातील 7 मतदारसंघात 116 उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा निवडणूक 2019 अंतर्गत राज्यातील पहिल्या टप्प्याअंतर्गत सात मतदारसंघात नामनिर्देशनपत्रे वैध ठरलेल्या 147 पैकी 31 उमेदवारांनी आपली नामनिर्देशनपत्रे मागे घेतली असून, 116 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.

पहिल्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रांच्या छाननीअंती 147 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली होती. या टप्प्यासाठी नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी 3 वाजेपर्यंत होती. या मुदतीत 147 पैकी 31 उमेदवारांनी माघार घेतली. मतदार संघनिहाय निवडणूक रिंगणातील उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : वर्धा लोकसभा मतदार संघ 14, रामटेक मतदार संघात 16, नागपूर मतदार संघात 30, भंडारा-गोंदिया मतदार संघ- 14, गडचिरोली- चिमूर मतदार संघात 5, चंद्रपूर मतदार संघात 13 आणि यवतमाळ- वाशीम मतदार संघात 24 उमेदवार निवडणूक लढवीत आहेत.

*दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध*
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदार संघात छाननीअंती 278 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली असून उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्रे मागे घेता येणार आहेत. त्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यातील नामनिर्देशन पत्रे वैध ठरलेल्या उमेदवारांची मतदारसंघनिहाय संख्या पुढीलप्रमाणे : बुलढाणा- 13, अकोला 12, अमरावती 34, हिंगोली 34, नांदेड 55, परभणी 21, बीड 53, उस्मानाबाद 20, लातूर 12 आणि सोलापूर 24.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.