ETV Bharat / state

बेकायदेशीर मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशींना अटक! मुंबई गुन्हे शाखेची कारवाई - illegal stay in mumbai

Mumbai Crime : बेकायदेशीरपणे मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशी स्थलांतरितांविरोधात मुंबई गुन्हे शाखेनं गेल्या चार दिवसांत चार आरोपींना अटक केली आहे. चौथ्या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावलीय. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या रॅकेटची माहिती युनिट 6 ला मिळाल्यानंतर सर्वप्रथम गुरुवारी दोन बांगलादेशींना अटक करण्यात आली होती.

in mumbai four illegal bangladeshi arrested by Crime Branch
बेकायदेशीर मुंबईत राहणाऱ्या चार बांगलादेशींना अटक
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 11, 2023, 7:18 AM IST

Updated : Dec 11, 2023, 3:33 PM IST

मुंबई Mumbai Crime : गुन्हे शाखेनं शनिवारी (9 डिसेंबर) बांगलादेशी नागरिक अबुशाहीद अब्दुल हमीद आलमिया (वय 26) याला नवी मुंबई येथून अटक केली. काही वर्षांपूर्वी आलमियाचे आई-वडील बेकायदेशीरपणे भारतात आले होते. तसंच त्याचा जन्मही मुंबईतच झाला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, काही वर्षांसाठी आलमिया पुन्हा बांगलादेशात गेला होता. मात्र, तेथे पाचवीपर्यंतचं शिक्षण घेऊन तो बेकायदेशीरपणे भारतात परतला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

आरोपीच्या वकिलाचं काय आहे म्हणणं : आलमियाला रविवारी (10 डिसेंबर) न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडी सुनावली. आलमियाचे वकील अटल बिहारी दुबे यांनी न्यायालयाला सांगितलं की, त्याचा जन्म भारतात झालाय. त्यामुळं त्याला बांगलादेशी नागरिक म्हणता येणार नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनं सांगितलं की, त्याचे आई-वडील बेकायदेशीरपणे भारतात आले होते. तसंच बांगलादेशमध्ये राहणारा शरीफ उल नामक व्यक्तीच्या सांगण्यावरुन आलमिया येथे राहत असलेल्या बांगलादेशी लोकांकडून पैसे घेत असे. दरम्यान, शरीफ उल कोण आहे? यासंदर्भात पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दोघांना अटक : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर गुन्हे शाखा कारवाई करत आहे. युनिट 6 ने शिवडी रेल्वे स्थानकाजवळ सापळा रचून पहिला आरोपी अक्रम नूरनबी शेख (वय 26) याला अटक केली. त्यानंतर तपासात उघड झालं की, शेख हा मूळचा बांगलादेशी नागरिक असून त्यानं भारत-बांगलादेश सीमा बेकायदेशीरपणे ओलांडली होती. त्यानंतर पोलिसांनी 26 वर्षीय लीना शाजन हलदर या बेकायदेशीर स्थलांतरित महिलेला नवी मुंबईतील कोपरखैरणे येथून अटक केली. या प्रकरणी दोघांना कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना 12 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

तिसऱ्या आरोपीला अटक : शनिवारी (9 डिसेंबर) तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात आली. मोनजी खातून शेख (वय 35) असं आरोपीचं नाव आहे. अक्रम नूरनबी शेख याला सीमा ओलांडण्यास मदत केल्याप्रकरणी मोनजीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली होती.

आधारकार्ड बनवणाऱ्याचा तपास सुरू : दरम्यान, एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, या प्रकरणात अटक करण्यात आलेला अक्रम नावाचा आरोपी बांगलादेशातून अवैधरित्या भारतात येणाऱ्या लोकांना त्याच्या सोयीसाठी मदत करत असे. तसंच चौथा आरोपी आलमियाचे आधारकार्ड कोणी बनवले यासंदर्भात चौकशी सुरू आहे.

हेही वाचा -

  1. ATS Arrested Bangladeshi Nationals : एटीएस पथकाकडून सात बांगलादेशी नागरिकांना अटक; बलात्काराच्या वॉन्टेड आरोपीचाही समावेश
  2. Three Bangladeshis Arrested : बलात्काराच्या आरोपाखाली तीन बांगलादेशींना अटक
  3. अवैधरित्या सीमा ओलांडणाऱ्या ३ बांगलादेशींना बीएसएफकडून अटक

Last Updated : Dec 11, 2023, 3:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.