ETV Bharat / state

पाण्यासाठी सांगलीतील विद्यार्थ्यांचे मुंबईत 'भजन-किर्तन' आंदोलन

जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याबाबत सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला गेला. पण सरकार याकडे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील लहान मुले आणि त्यांचे पालक आंदोलन करत आहेत.

'भजन-किर्तन' आंदोलन करताना विद्यार्थी
author img

By

Published : Jun 20, 2019, 5:07 PM IST

मुंबई - सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या गावात सध्या दुष्काळ पडला आहे. त्यामुळे येथील आझाद मैदानात सध्या लहान मुलांचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन सुरू आहे. हे विद्यार्थी पाण्याच्या मागणीसाठी शाळा सोडून आंदोलन करत आहेत. विशेष म्हणजे 'भजन कीर्तन' करत सरकारला आपल्या जिल्ह्याला पाणी द्या, अशी मागणी हे विद्यार्थी करत आहेत.

पाण्यासाठी सांगलीतील विद्यार्थ्यांचे मुंबईत 'भजन-किर्तन' आंदोलन

जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याबाबत सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार केला गेला. पण, सरकार याकडे लक्ष देत नाही. त्यामुळे, सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेंतर्गत येणाऱ्या गावातील लहान मुले आणि त्यांचे पालक आंदोलन करत आहेत. गावात पाणी नाही त्यामुळे, मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. सरकारने शेजारी असलेल्या तलावांमधून आमच्या गावांची पाण्याची सोय करावी, अशी मागणी करत मुले शाळा बुडवून मुंबईतील आझाद मैदानात पारंपरिक 'भजन कीर्तन' करत सरकारला पाणी द्या तरच जाऊ, असे सांगत आहेत.

Students while doing 'bhajan-kirtan' andolan
'भजन-किर्तन' आंदोलन करताना विद्यार्थी

मायकल कॅनॉलपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व्यासपीठ तलावात कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात यावे. त्यामुळे शेजारील सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. व्यासपीठ तलाव ते गुड्डापूर तलाव फक्त अडीच किलोमीटर कॅनॉलचे काम केल्यास गुड्डापूर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी, गोंधळवाडी, संघ, भिवर्गी व ओढा पात्र पाण्यात जाऊन सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल. त्यामुळे तशी उपाययोजना करावी.

तसेच कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत कॅनॉलद्वारे पाणी पोहोचवल्यास आसंगी, मोठेवाडी, कागनगरी पांडोझरी, पारधी, करेवाडी या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकेल. मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. पण, पिण्यास पाणी नसल्यामुळे मुले शाळेत तरी कसे जाऊ शकतात? त्यामुळे आधी पाणी द्या, नंतरच शाळेत जाऊ अशी, मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे केली आहे.

पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झालेली आहे. सांगली जिल्ह्यातील हे विद्यार्थी आपली शाळा बुडवून आजाद मैदान येथे पाण्याच्या प्रश्नासाठी आलेले आहेत. त्यामुळे आता सरकार या लहान मुलांच्या आंदोलनाकडे कसे बघते? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:शाळा बुडवून सांगलीतील मुलांचे पाण्यासाठी आझाद मैदान भजन कीर्तन करत आंदोलन

आझाद मैदान येथे वर्षाच्या बारा महिने विविध संघटना विद्यार्थ्यांपासून महिलां ते वृद्ध नागरिक लोक आपल्या विविध प्रश्नांसाठी आझाद मैदान येथे लोकशाहीने पद्धतीने आंदोलन करत असतात. हे काही नवं नाही. परंतु आता आझाद मैदानात सध्या एक अनोख लहान मुलांचं पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यातील शाळा सुरू झालेल्या आहेत, सर्व लहानगे शाळेत जाताना दिसतायेत. परंतु सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होणाऱ्या जिल्हायातील लहान मुलं सध्या आजाद मैदान येथे गावात दुष्काळ पडलाय, त्यामुळे पाण्याच्या मागणीसाठी शाळा सोडून आंदोलनाला आलेले आहे .भजन कीर्तन करत सरकारला आपल्या जिल्ह्यातील पाण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातील हे लहान मुलं सरकारला पाणी द्या अशी विनंती सध्या आझाद मैदानात करताना दिसत आह.

Body:सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागातील म्हैसाळ योजनेपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याबाबत सरकारला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील सरकार याकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे,सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ योजनेअंतर्गत येणाऱ्या गावातील लहान मुलं व त्यांचे वडील सध्या आझाद मैदान येथे आंदोलनाला आलेले आहेत .ही लहान मुलं गावात पाणीच नाही, त्यामुळे मोठ्या संकटाला सामोर जावं लागतं आहे.त्यामुळे सरकारनी शेजारीच असलेल्या आजूबाजूच्या तलावा मधून, आमच्या काही गावांची पाण्याची सोय करावी व पाणी द्यावं या मागनी करता मुलं शाळा बुडवून मुंबईत आझाद मैदानात पारंपरिक भजन कीर्तन करत सरकारला पाणी द्या तर जाऊ असे सांगणे करत आहेत.

या मागण्या करत पाण्याची सोय होऊ शकते त्यामुळे गावकऱ्यांनी व लहानग्यांनी केलेल्या मागण्या
मायकल कॅनल पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या व्यास्पीठ तलावात कॅनल द्वारे पाणी सोडण्यात यावे त्यामुळे शेजारील सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न सुटेल.

व्यासपीठ तलाव ते गुड्डापुर तलाव फक्त अडीच किलोमीटर कॅनल चे काम केल्यास गुड्डापुर तलावातील पाण्याचा उपयोग आसंगी, गोंधळवाडी, संघ ,भिवर्गी व ओढा पात्र पाण्यात जाऊन सर्व गावांचे पाण्याचा प्रश्न सुटतील त्यामुळे तशी उपाययोजना करावी

तसेच कर्नाटकातील कनमडी तलावातून सिद्धनाथ तलावापर्यंत चॅनल द्वारे पाणी आल्यास आसंगी ,मोठेवाडी, कागनगरी पांडोझरी ,पारधी ,करेवाडी या गावांनाही ओढा पात्रातून पाणी जाऊ शकेल .असा सांगली जिल्ह्यातील पाण्याचा मोठा प्रश्न घेऊन लहांगे व त्यांचे वडील सध्या मुंबईत आझाद मैदान येथे आंदोलनाला आलेले आहेत. मुलांच्या शाळा सुरू झालेले आहेत. परंतु पिण्यास पाणी नसल्यामुळे मुलं शाळेत तरी कसे जाऊ असा समोरच्याने शाळेत नाही गेलात हे विचारल्यास विचारतात त्यामुळे आधी पाणी द्या नंतरच शाळेत जाऊ अशी त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Conclusion:पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी काही दिवसांपूर्वीच शाळा सुरू झालेले आहेत .सांगली जिल्ह्यातील ही लहानगी मुलं आपली शाळा बुडवून आजाद मैदान येथे पाण्याच्या प्रश्नासाठी आलेले आहेत .त्यामुळे आता सरकार या लहान मुलांच्या आंदोलनाकडे कसे पाहताय हे पाहणे गरजेचे आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.