ETV Bharat / state

Touts Terror On Mumbai Airport : विमानतळ परिसरात टाऊटसची दहशत; सुरक्षा रक्षकाला मारहाण तर सीआयएसएफ जवानांशी हुज्जत - goons drivers assaulted security guard

छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ परिसरात गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांची (टाऊटस) दादागिरी (Touts Terror On Mumbai Airport) दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची ते फसवणूक करत असून सुरक्षा यंत्रणांनी अटकाव केल्यास ते दादागिरी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी काही टाऊटसने सेक्युर-१ या सुरक्षा सर्व्हिसेस कंपनीच्या एका सुरक्षा रक्षकाला मारहाण (goons drivers assaulted security guard) केल्याची घटना घडली.

Touts Terror On Mumbai Airport
Touts Terror On Mumbai Airport
author img

By

Published : Oct 22, 2022, 3:09 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरदेशीय विमानतळ परिसरात गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांची (टाऊटस) दादागिरी (Touts Terror On Mumbai Airport) दिवसेंदिवस वाढू लागली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची ते फसवणूक करत असून सुरक्षा यंत्रणांनी अटकाव केल्यास ते दादागिरी करत असल्याचे चित्र दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी काही टाऊटसने सेक्युर-१ या सुरक्षा सर्व्हिसेस कंपनीच्या एका सुरक्षा रक्षकाला मारहाण (goons drivers assaulted security guard) केल्याची घटना घडली. यासोबतच चालकांनी सीआयएसएफ जवानाशी हुज्जतबाजी (goons drivers clashed with CISF) केली.

गुंड प्रवृत्तीच्या चालकांचे कंबरडे मोडले - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात काही गुन्हेगारी वृत्तीच्या चालकांचा सुळसुळाट वाढत आहे. देशी आणि परदेशी प्रवाशांची दिशाभूल करून त्यांची ते शिताफीने आर्थिक फसवणूक करतात. याची गंभीर दखल घेत सहार पोलिसांनी गुंड प्रवृत्तीच्या चालकांचे कंबरडे मोडले. परिणामी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून त्या टाऊसनी काढता पाय घेतला. त्यांनी आता विमानतळ परिसरात दादागिरी आणि प्रवाशांची लुटमार करण्यास सुरूवात केली आहे.

गुंड चालकाची सुरक्षा रक्षकाला मारहाण- दोन दिवसांपूर्वी असे करण्यापासून त्यांना विमानतळ परिसरात सुरक्षेचे काम पाहणाऱ्या सेक्युर १ या सुरक्षा कंपनीच्या आकाश गुत्तेदार या सुरक्षारक्षकाने रोखले असता चार पाच जणांनी मिळून त्यांना शिविगाळ केली. एवढेच नव्हे तर धक्काबुक्की करत मारहाण देखील केली. याशिवाय काही टाऊटस सीआयएसएफच्या जवानांशी देखील हुज्जत घालतात. अशाप्रकारे टाऊटसचा दहशत वाढत असून त्यांची दादागिरी देखील वाढू लागली आहे. गुंडगिरी करून उलट तेच सुरक्षा रक्षकांविरोधात पोलिसात खोटी तक्रार देण्यासाठी जात असल्याचे चित्र असल्याचे काही चालकांनी सांगितले. दहा टाऊसविरोधात गुन्हे तसेच अखलपात्र गुन्ह्यांची देखील नोंद आहे. अशा टाऊटसमुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अन्य चालकांना देखील त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टाऊटसचा बंदोबस्त करा, पोलिसांना पत्र : अशा गुन्हेगारी वृत्तीच्या टाऊटसवर कायदेशीर कडक कारवाई करावी, असे लेखी पत्र पोलिसांना दिले असल्याचे सेक्युर १ चे अश्विन मोरे यांनी सांगितले. तसेच अदानी समुहाच्या वतीने देखील टाऊटसविरोधात कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून प्रवाशांची फसवणूक होणार नाही आणि त्यांना सुरक्षित वातावरणात ये-जा करता येईल, असे लेखी पत्र स्थानिक पोलीसांना दिले गेले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.