मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून मुंबईतील विविध ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 73 ग्राम मेफेद्रोण, 17 एलएसडी ब्लॉट्स, 10 ग्राम चरस जप्त करण्यात आले आहे.
हेही वाचा - लशीचा तुटवडा असेल तर केंद्राशी संवाद साधा; केवळ माध्यमांशी बोलून हात झटकू नका
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईतील डोंगरी परिसरात मोहम्मद शोएब हैदर खान या आरोपीच्या घरी छापा मारला. घटनास्थळाहून अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. मोहम्मद हैदर खान हा अमली पदार्थ तस्करी प्रकरणी कुप्रसिद्ध असून 2018 व 2019 मध्ये त्याला वडाळा टी टी पोलिसांनी व गावदेवी पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली होती व त्यानंतर तो जामिनावर सुटून आला होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून डोंगरी परिसारातील इक्रा अब्दुल गफार कुरेशी या महिलेच्या घरी छापा मारण्यात आला. येथून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 52 ग्राम मेफेद्रोण हा अमली पदार्थ जप्त केला आहे. नागपाडा पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ तस्करी संदर्भात या महिलेवर या अगोदरच गुन्हा दाखल आहे. याबरोबरच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या एका गुन्ह्यामध्ये ही महिला आरोपी फरार म्हणून दाखवण्यात आले आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रिजवान इस्माईल खान नावाच्या आरोपीलाही चिंचबंदर येथून अटक केली असून त्याच्या ताब्यातून 10 ग्राम चरस हे अमली पदार्थ जप्त केले आहे.
हेही वाचा - दहावी-बारावीची परीक्षा ऑफलाईन घ्यावी; ग्रामीण विद्यार्थ्यांची मागणी