मुंबई : आयआयटी बॉम्बे येथे प्लेसमेंट सीझन 2022-23 चा टप्पा-1 हा 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू ( IIT Mumbai Recorded More Salary in Research Sector ) झाला. पुढे 16 डिसेंबर 2022 पर्यंत वाढवला. प्री-प्लेसमेंट ऑफरसह, संस्थेने फेज-1 मध्ये स्वीकारलेल्या नोकरी-ऑफरची संख्या उच्च राहिली ( This year Salary in IT Sector has Decreased ) आहे. या वर्षी एकूण 1431 विद्यार्थ्यांना 293 कंपन्यांमध्ये स्थान देण्यात आले ( Salary has Increased in IIT Research Development ) आहे. गेल्या तीन वर्षांत प्राप्त झालेल्या आणि स्वीकारल्या गेलेल्या ऑफरची तुलना खाली दिली आहे.
तब्बल 63 आंतरराष्ट्रीय ऑफर स्वीकारण्यात आल्या आतापर्यंत 63 आंतरराष्ट्रीय ऑफर स्वीकारण्यात आल्या आहेत. त्यापैकी 25 प्रतिवर्षी 1 कोटींपेक्षा जास्त होत्या. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ऑफरसाठी CTC आधारावर सर्वाधिक वार्षिक वेतन अनुक्रमे 23 कोटी 67 लाख आणि 1 कोटी 31लाख होते. आयआयटी बॉम्बेमध्ये स्वीकारल्या गेलेल्या सर्व ऑफर लक्षात घेता, या वर्षी पहिल्या टप्प्यासाठी सरासरी वार्षिक पगार 23 कोटी 26 लाख इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत, वित्त आणि R&D क्षेत्रातील सरासरी पगारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, तर IT अर्थत सॉफ्टवेअरमधील वेतनात घट झाली आहे.
पीएचडी स्कॉलर्सच्या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक उच्चांकी 36 ऑफर या वर्षाच्या पहिल्या टप्प्यात आयआयटी बॉम्बे येथे पीएचडी स्कॉलर्सच्या प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक उच्चांकी 36 ऑफर स्वीकारल्या गेल्या आहेत. ज्यात दरवर्षी सरासरी 16 लाख CTC पॅकेज आणि आणि सर्वाधिक पगाराचे पॅकेज प्रतिवर्ष 229 लाखांपर्यंत पोहोचले आहे. टप्प्याटप्प्याने PhD साठी नोकरीच्या ऑफरची भरीव संख्या दिसत आहे. तसेच, R&D संशोधन आणि विकास क्षेत्रातील पगारात झालेली वाढ हे यातून दिसून येते की, IIT बॉम्बे ही नियुक्ती करणार्यांची पहिल्या पसंतीची संस्था आहे. केवळ पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठीच नाही तर तिच्या PhD विद्वानांसाठीदेखील ही ऑफर असणार आहे.
आयआयटी मुंबईमध्ये चांगल्या सुविधा "आयआयटी मुंबई जसे संशोधन आणि विकाससंदर्भात नावाजलेली आहे. तसेच, अधिकाधिक वार्षिक भरघोस पगार देणारी संस्थादेखील आहे. मात्र, सामान्य घरातून येथे विद्यार्थ्यांना पोहचणे अवघड असते. आयआयटी मुंबईमध्ये चांगल्या सुविधा आहेत.आनंद आहे. मात्र, संशोधन आणि विकास याबाबत भारत जगाच्या तुलनेत अद्याप मागास आहे. त्याला भारताचे कोणतेही क्षेत्र अपवाद नाही. त्याबाबत शासनाने खास प्रयत्न केले पाहिजे, असे आयआयटीमध्ये शिकणारे विद्यार्थी अक्षय पाटील (नाव बदलले आहे) यांनी सांगितले."