हे काय नवलच.. केडीएमटीचा बस चालक डोक्यावर छत्री धरून चालवतोय बस; व्हिडिओ व्हायरल
ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन सेवेतील एका बसमध्ये बस चालक चक्क छत्री धरून बस चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे याच बसमध्ये प्रवास करणारे इतरही प्रवासीही आपल्या अंगावर पावसाचे पाणी पडू नये, म्हणून छत्री उघडून प्रवास करत होते. वाचा सविस्तर...
..यामुळे सामन्यादरम्यानच भिडले अफगाण-पाकचे समर्थक, स्टेडिअमबोहर केली तोडफोड
नवी दिल्ली/लीड्स - आयसीसी विश्वकरंडकातील अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यादरम्यान हेडिंग्ले मैदानाच्या वरून एक विमान गेले. या विमानातून 'जस्टिस फॉर बलुचिस्तान' आणि 'हेल्प एण्ड एन्फोर्स्ड डिसअॅपिअरन्स इन पाकिस्तान' असे मोठ्या अक्षरात लिहिलेले बॅनर्स सोडण्यात आले होते. यानंतर अफगाण-पाक संघांचे चाहते मैदानाबाहेरच एकमेकांशी भिडले. या हाणामारीत दोन्ही देशाच्या चाहत्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानही झाले. वाचा सविस्तर...
पुणे दुर्घटना : संरक्षक भिंत कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर
पुणे - कोंढवा परिसरात निर्माणाधीन इमारतीची संरक्षक भिंत कोसळून मलब्याखाली दबल्याने १५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यामध्ये भिंत कोसळल्यामुळे पार्किंग मधील एक चारचाकी वाहन खाली पडल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर...
यवतमाळमध्ये वीज अंगावर पडून तिघांचा मृत्यू
यवतमाळ : जिल्ह्यातील नेर, दिग्रस आणि उमरखेड तालुक्यात आज (शनिवार) सायंकाळच्या सुमारास वीज अंगावर पडून तीघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, नेर आणि उमरखेड तालुक्यात सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वाचा सविस्तर...
हजारो कोटी खर्चूनही ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ला पावसाचा फटका, प्रेक्षक गॅलरीला तळ्याचे स्वरुप
नवी दिल्ली - जगातला सर्वात भव्य पुतळा असलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या गॅलरीला पहिल्या पावसाळ्यातील पहिल्याच पावसात गळती लागली आहे. या गॅलरीत पावसाच्या पाण्याचं तळं झालं आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले नेते सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा पुतळा आहे. ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी या पुतळ्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. पुतळा तयार करण्यासाठी तब्बल २ हजार ९८९ कोटींचा खर्च आला आहे. पुतळ्याच्या गॅलरीत गळती लागल्याने पर्यटकांमध्ये नाराजी आहे. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वाचा सविस्तर...
बातमी, सर्वांच्या आधी
www.etvbharat.com/marathi/maharashtra